Takumba Marathi Song: सुप्रसिद्ध कोरिओग्राफर Remo D’souza ने केले नोस्टालजिक

बबड्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!
टीव्हीवर लागणाऱ्या अग्गोबाई सासूबाईनं लोकांना वेडं केलंय. आधी आसावरीवर लोक फिदा होते. पण नंतर आता पब्लिकचा डोळा बबड्यावर आहे. बबड्या इतका वेडा कसा.. त्याला का कळत नाही त्याच्या आईची माया.. त्याला बायकोचं प्रेम का कळत नाही.. असे अनेक प्रश्न लोकांना पडतायत. त्यावरून मीम्स बनले.
आता हा बबड्या कोण हे अनेकांना माहीत नाहीय. तो इतका बेमालूम काम करतो की नक्की तो कसा आहे हेच कळेनासं झालंय. पण बबड्याची गंमत आता आपल्याला कळली आहे. बबड्या उर्फ आशुतोष पत्की हा संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला अभिनय करायचा होता. पण त्याच्या आईला मात्र वाटत होतं की मुलानं या इंडस्ट्रीत जाऊ नये. आधी शिकावं. मोठं व्हावं नंतर बघू. त्यानुसार आशुतोषनेही आपलं लक्ष शिक्षणावर दिलं. मग त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं. ते करून त्याला आपलं हॉटेल काढायचं होतं. पण तरी अभिनयाचा कीडा काही त्याला गप्प बसू देईना मग त्याने हा विचार आपले वडील आणि आईला बोलून दाखवला. पोरानं उराशी बाळगलेलं स्वप्नं पाहून पालकांनीही होकार दिला. मग त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. अनुपम खेर इन्स्टिट्यूटमधून त्यानं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मुलगा तयार झाला. पण तरीही त्याने लगेच हीरो होण्याकडे पाय वळवले नाहीत. तर वडिलांनी सांगितल्यानुसार त्याने आधी असिस्टंट म्हणून काम करायला घेतलं. अनेकांना माहीत नसेल पण केदार शिंदे यांच्याकडे आशुतोष असिस्टंट म्हणून लागला. मधु इथे अन चंद्र तिथे ही मालिका त्याने असिस्टंट म्हणून केली. इतकंच कशाला, भरत जाधव यांचा श्रीमंत दामोदरपंत सिनेमा आलेला आठवतोय का.. त्या सिनेमासाठीही आशुतोष असिस्टंट होता.
वडील अशोक पत्की यांच्या समवेत आशुतोष
असं सगळं प्रशिक्षण घेतल्यावर आशुतोषने अभिनय करायचं ठरवंलं. मेंदीच्या पानावर ही मालिका करून मग त्याला मिळाली ती अग्गोबाई सासूबाई ही मालिका. आणि त्याच्या भूमिकेवर लोक प्रेम करतायत. लोक त्या भूमिकेवर टीकाही करतात पण प्रेमाने. अनेकांना माहीत नसेल, पण आशुतोषने उराशी बाळगलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. कष्टाने आणि मेहनतीने त्याने शिकून हा निर्णय घेतला. बबड्या वेंधळा आहे. पण आशुतोष नाही. कळलं का?