‘सलीना जेटली’ ही अभिनेत्री चक्क फुलपाखरांना घाबरते!
फुलपाखरू खरंच किती नयनरम्य असते! या फुलपाखरांवर मराठी साहित्यामध्ये तर कितीतरी सुंदर कविता आहेत. ‘धरु नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे’ ही कविता बालभारतीच्या या पुस्तकात फार पूर्वीपासून होती. ‘छान किती दिसते फुलपाखरू’ ही ग. ह. पाटील यांची कविता ‘टाइमपास’ या चित्रपटात वेगळ्या संदर्भात घेतली आहे.हिंदी तही ‘तितली उडी उड जो चली’ हे शारदा ने गायलेलं ‘सूरज’ चित्रपटातील गाणे साठच्या दशकात खूप लोकप्रिय ठरले होते. तरी पण सर्वांनाच फुलपाखरे आवडतातच असे नाही. हिंदी सिनेमाच्या दुनियेत एक अभिनेत्री अशी आहे की, जिला फुलपाखरांची प्रचंड भीती वाटते! (Butterfly Phobia) त्याचाच हा गंमतीदार किस्सा!
अनीस बज्मी यांच्या २००५ सालच्या ‘नो एंट्री’ या चित्रपटाची शूटिंग थायलँड येथे एका डोंगरावर चालू होते. तिथे या अभिनेत्रीला काही फुलपाखरे दिसली. तिच्या मनाचा थरकाप झाला आणि तिने जोरात पळ काढला. डोंगराच्या वरच्या दिशेला ती धावायला लागली. तिच्यात मागे वळून पाहण्याची देखील हिंमत नव्हती. तिला सारखे वाटत होते की फुलपाखरे माझा पाठलाग करीत आहेत. जिवाच्या आकांताने ती अभिनेत्री डोंगराच्या वरच्या बाजूला पळत होती.(Butterfly Phobia) हे दृश्य ‘नो एन्ट्री’ चित्रपटातील तिच्या सह नायिका ईशा देओल आणि लारा दत्त यांनी पाहिले. तिला अचानकपणे पळताना पाहून त्या दोघी खूप घाबरल्या. काय झालं या दोघींना कळेना. त्या दोघी तिच्या मागे पळत पळत जाऊ लागल्या. शेवटी लारा दत्ता ने त्या अभिनेत्रीला जोरात ओढून मागे खेचले. ही अभिनेत्री अजूनही देखील थरथर कापत होती. आणि डोळे बंद करून फुलपाखरांबद्दलच विचारत होती. हे ऐकून लाला दत्ता आणि इशा देओल जोर जोरात हसू लागल्या. पण ही अभिनेत्री मात्र घामाने थबथबलेली होती आणि तिच्या घशाला कोरड पडली होती. युनिटच्या लोकांनी तिला पाणी देऊन शांत केले. (Butterfly Phobia) फुलपाखरांना घाबरणारी ही अभिनेत्री कोण होती माहित आहे का? ही अभिनेत्री होती सलीना जेटली. सलीनाच्या आईने नंतर पत्रकारांना सांगितले “सलीना चार वर्षाची लहान होती त्यावेळी एक फुलपाखरू येऊन तिच्या हातावर/डोक्यावर सारखे बसत होते. त्या बालवयात तिच्या मनात फुलपाखरांच्या बाबत घृणा आणि भीती बसली. त्यावेळेपासून तिला फुलपाखरांची प्रचंड भीती वाटते. (Butterfly Phobia)आणि आता ही भीती फोबियामध्ये परावर्तित झाली आहे.” त्या दिवशी जर लारा आणि इशा सलीनाच्या मागे जाऊन तिला पकडले नसते तर कदाचित मोठी दुर्घटना झाली असती.
सेलेब्रिटी आणि त्यांना असणारा फोबिया हा खरं तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ‘द पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चा अभिनेता जॉनी डेप याला विदूषकाची भीती वाटते. त्याच्या रंगवलेल्या चेहऱ्याची त्याला भीती वाटते.हॉलीवूडचा प्रख्यात दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक याला पांढऱ्या अंड्याची भीती वाटायची. हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन पक्षी आणि झुरळांना घाबरते. तिने अनेकदा तिच्या अतार्किक भीतीबद्दल सांगितले आहे. न्यूयॉर्क मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, तिने सांगितले की, त्यांच्या पंख आणि चोच आणि मला घाबरवतात. हॉलीवूड अभिनेत्री पामेला अँडरसन ही टेलिव्हिजन मालिका बेवॉच आणि होम इम्प्रूव्हमेंटमधील भूमिकांसाठी ओळखली जाते आणि ती प्लेबॉय मासिकाच्या सर्वात प्रिय मॉडेल होती.तिला आरशांची भीती वाटायची.अभिनेता अर्जुन कपूरला छताला लटकणाऱ्या पंख्याची भीती वाटते! आलीया भटला अंधार आणि अंधाऱ्या जागेची भीती वाटते.अजय देवगणला उंचीची भीती वाटते.प्रियांका चोप्राला स्वत:जवळ मोबाईल नसण्याच्या /हरवण्याच्या शक्यतेची भीती वाटते!
========
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमासाठी प्रियांका चोप्राला कसे काय मिळाले सहापट अधिक पैसे?
========
आपल्याकडे नव रसांपैकी एक रस हा ‘भय’ या भावनेशी निगडित आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती ही कायम वाटत असते असं विज्ञान सांगते. याच्यावर वैज्ञानिक संशोधन देखील खूप झाले आहे. लहानपणी कुठल्यातरी गोष्टीची भीती मनाच्या आतल्या कप्प्यात दडून बसली की आयुष्यभर त्याला ती सलत राहते. अर्थात मानसोपचार तज्ञ यावर नक्कीच उपचार करू शकतात.
धनंजय कुलकर्णी