Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

धर्मेंद्र हेमाच्या प्रेमासाठी करत होता वाट्टेल ते….

 धर्मेंद्र हेमाच्या प्रेमासाठी करत होता वाट्टेल ते….
बात पुरानी बडी सुहानी

धर्मेंद्र हेमाच्या प्रेमासाठी करत होता वाट्टेल ते….

by धनंजय कुलकर्णी 28/09/2022

सिनेमाच्या रुपेरी पडल्यावर ‘रिल लाईफ’मध्ये प्रेमप्रसंग रंगवताना ‘रियल लाईफ’मध्ये देखील काही कलाकार प्रेमाच्या नात्यात गुंफले जातात आणि मग रिल लाईफ आणि रियल लाईफ एक होऊन जाते. प्रत्येक दशकामध्ये भारतीय चित्रपटात वेगवेगळ्या रोमँटिक जोड्यांची आवक होत होती. 

पन्नासच्या दशकामध्ये राज कपूर- नर्गिस, दिलीप कुमार- मधुबाला, देव आनंद- सुरैय्या, गुरुदत्त – वहिदा रहमान नंतर साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये शम्मी कपूर – शर्मिला टागोर, राजेश खन्ना- मुमताज, अमिताभ बच्चन – जया भादुरी, ऋषी – कपूर नीतू सिंग या आणि अशा अनेक जोड्यांनी रुपेरी पडदा प्रेमाच्या रंगात रंगून गेला. यातील काही जोड्या विवाह बंधनात अडकल्या. तर काही ‘अधुरी एक कहाणी….’ म्हणून प्रकरण संपून गेले. 

सत्तरच्या दशकामध्ये धर्मेंद्र – हेमा मालिनी ही जोडी रसिकांच्या आवडीची होती. खरंतर धर्मेंद्र हेमा मालिनी (Dharmendra Hema Malini) पेक्षा दहा वर्षे आधी सिनेमामध्ये आला होता. तो हेमाच्या प्रेमात पडला. त्यावेळी तो खरं तर विवाहित होता. पण प्रेमात पडल्यावर या गोष्टींचा विचार कोण करतो? १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुम हसीन मै जवान’ या भप्पी सोनी दिग्दर्शित चित्रपटापासून ही जोडी रुपेरी पडल्यावर चमकू लागली. त्यानंतर नया जमाना, सीता और गीता, दोस्त, पत्थर और पायल, जुगनू  या चित्रपटातून हे दोघे एकत्र येत होते. 

प्रत्येक चित्रपटागणिक धरम – हेमाच्या (Dharmendra Hema Malini) जास्त जवळ जात होता. पण तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता.  हेमा मालिनीवर जान कुरबान करणारे काही कमी नव्हते. जितेंद्र, संजीव कुमार हे त्यात आघाडीवर होते. पण बाजी मारली धर्मेंद्रनेच. रमेश सिप्पी  यांच्या गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या वेळचा हा किस्सा आहे. माणूस प्रेमात पडल्यानंतर किती ‘पागल’ होतो आणि आपल्या प्रेमिकेसोबत जास्तीत जास्त वेळ कसा काढता येईल यासाठी काय काय क्लुप्त्या शोधून काढतो हे यातून दिसते. ‘शोले’ चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी असलेल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला गेला आहे. 

या चित्रपटात धर्मेंद्र हेमामालिनीच्या (Dharmendra Hema Malini) जास्तीत जास्त सहवासात कसे राहता येईल हे पाहत होता. या दोघांचे रोमँटिक सीन तसे या  चित्रपटात कमी आहेत कारण चित्रपट हा ॲक्शन जॉनर मुव्ही असल्यामुळे दोघांत अतिशय कमी प्रेमप्रसंगाचे शॉट या दोघांच्या वाट्याला आले होते. यातील धर्मेंद्र हेमा मालिनीला (Dharmendra Hema Malini) बंदूक चालवायला शिकवतो हा शॉट तुम्हाला अजून आठवत असेल. या प्रसंगात धर्मेंद्र हेमा मालिनीला मागून मिठी मारून तिच्या हातात बंदूक देऊन तिला बरोबर निशाणा कसा साधायचा हे सांगत असतो. हा शॉट घेताना त्याला हेमाचा भरपूर सहवास लाभत होताच शिवाय मिठीचे स्पर्श सुख देखील मिळत होते. हे ‘आणखी’ मिळावे म्हणून त्याने एक ‘आयडिया’ केली.

धर्मेंद्रने सिनेमाचे शूटिंग करणाऱ्या एका लाईटमन चक्क पटवले. त्याला सांगितले, “प्रत्येक शॉटच्या वेळी तू मुद्दाम काही तरी चूक करत जा. त्यामुळे पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावा लागेल.”  यातून धरमचा हेतू हेमा मालिनीला जास्तीत जास्त वेळी मिठी मारता येईल हाच होता. धर्मेंद्रने त्या लाईटमनला प्रत्येक चुकीसाठी शंभर रुपये द्यायचे कबूल केले.  यांनतर लाईटमन देखील तयार झाला. 

======

हे देखील वाचा : अभिनेता धर्मेंद्रने असे पूर्ण केले बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न… 

======

लाईटमन प्रत्येक शॉटच्या वेळी मुद्दाम चूक करायचा. कधी रिफ्लेक्टर चुकीचा लावायचा, तर कधी ट्रॉलीची स्पीड कमी करून शॉट मध्ये दिरंगाई करायचा… यामुळे व्हायचं काय प्रत्येक वेळी दिग्दर्शक ‘कट’,’ कट’ म्हणून ओरडायचा आणि पुन्हा तो शॉट चित्रित केला जायचा. दिवसभर या शॉटचे चित्रीकरण चालू होते. या लाईटमनने दिवसभरात तब्बल वीस वेळा चुका केल्या. संध्याकाळी शूटिंग संपले त्यावेळी या लाईटमनच्या खिशात धर्मेंद्रने दोन हजार रुपये कोंबले. ही रक्कम त्या काळातली मोठी रक्कम होती. अशाप्रकारे धरम आणि हेमा यांच्या प्रेम प्रकरणाचा बहर ‘शोले’च्या वेळी दिसून आला. युनिट मधील लोकांना हे सर्व समजत होते, पण म्हणतात ना ‘प्रेमात आणि युध्दात सारं क्षम्य असतं… 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Celebrity Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.