…जेव्हा पं. नेहरू जगदीपला आपले ‘रिस्ट वॉच’ भेट देतात
काही प्रसंग कलावंत आयुष्यभर विसरू शकत नाही. असंख्य कष्ट, यातना, अपमान, अवहेलना, दु:ख, पराभव, अपयश सहन केल्यावर अनपेक्षितपणे सुखाची पहाट उगवते. अर्थात यावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, याची अनुभुतीही न घेतल्यानं विश्वास बसत नाही. पण आयुष्यात असा ऊन पावसाचा खेळ चालूच रहातो.
विनोदी भूमिका करणारा कलाकार जेव्हा आपली आसवं लपवून प्रेक्षकांना हसवतो तेव्हा तो श्रेष्ठ दर्जाचा विनोद ठरतो. विनोदवीर जगदीप (Jagdeep) याला सिनेमात येण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला. आपल्याला तो ’सुरमा भोपाली’ टाईप भूमिकातूनच माहिती आहे. पण त्यापूर्वी त्याने बालकलाकार म्हणून मोठी हवा निर्माण केली होती.
२९ मार्च १९४० रोजी झांसी जवळच्या दातिया येथे जन्मलेल्या जगदीप (Jagdeep) यांचं खरं नाव होतं सय्यद इश्ताक हुसैन जाफरी. घरात अठरा विश्व दारीद्र्य. लहान वयातच पित्याचे छत्र हरवल्याने आपल्या विधवा अम्मीला घेवून मुंबई गाठली. दहा वर्षाचे हे पोर अठरा अठरा तास मजूरी करू लागलं. नाना तर्हेचे उद्योग केले.
एकदा एका सिनेमासाठी लहान मुलं हवी होती. याची निवड झाली. बी आर चोप्रांच्या ’अफसाना’ (१९५१) करीता पहिल्यांदा तो कॅमेर्यापुढे आला. त्याच्या चुणचुणीत बोलण्याने चोप्रा प्रभावित झाले आणि तिथल्या तिथे त्यांनी त्याला बक्षिस म्हणून दहाची नोट काढून दिली. पण यामुळे काही भटकंती, वणवण थांबली नाही. कुणी गॉडफादर नसल्याने संघर्ष चालूच होता. पण आता मार्ग निश्चित झाला होता.
दादरच्या रणजित स्टुडिओत झिया सरहदीच्या ’फूटपाथ’चे शूटींग चालू होते. तिथे काम मिळेल या आशेने रणरणत्या उन्हात तो रोज तिथे जायचा. शेवटी एक छोटा रोल मिळाला. फूटपाथवरच्या कंगाल मुलाचा. यात एका प्रसंगात दोन दिवसापासून उपाशी असतो व मित्राच्या खांद्यावर डोके ठेवून रडत असतो त्यावेळी दिलीपकुमार ‘क्या बात है मुन्ना, जग्गू रो क्यूं रहा है?’ असे विचारल्यावर तो रडवेल्या चेहर्याने लूक देतो असा सीन होता. कॅमेरा ऑन झाला आणि समोर अभिनय सम्राट दिलीपकुमार असूनही त्याने ग्लिसरीनचा एक थेंबही न वापराता डबडबलेल्या डोळ्याचा असा काय लूक दिला की, दिग्दर्शकाने ओके म्हटल्यावर दिलीपने तिथल्या तिथे त्याला शंभराची नोट बक्षिस दिली.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
पुढे अनेक वर्षांनी जगदीपने एका मुलाखतीत सांगितले की, “या शॉटच्या आधी मी खरोखरच दोन दिवसापासून उपाशी होतो.” बालकलाकार म्हणून त्याला आता भूमिका मिळू लागल्या होत्या. आरपार, अब दिल्ली दूर नही, दो बिघा जमीन, आसमान, धोबीडॉक्टर, मुन्ना, नौकरी.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
१९५७ साली जगदीप (Jagdeep) याचा बालकलाकार म्हणून शेवटचा सिनेमा आला होता ए व्ही एम बॅनरचा ’हम पंछी एक डाल के’. या सिनेमाला राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक मिळाले होते. या बाल कलाकारांचे कौतुक करायला पंतप्रधान पं.नेहरू स्वतः मद्रासला आले होते. प्रत्येक मुलाला त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला. पण मुलांच्या त्या रांगेत सर्वात शेवटी उभ्या असलेल्या जगदीप जवळ जेंव्हा पंडीतजी आले तेव्हा पुष्पगुच्छच संपले होते. त्यावेळी त्यांनी जगदीपला जराही निराश न करता त्याची पाठ तर थोपटलीच;