जेव्हा एका चुकीमुळे रवीनाला खंडणीसाठी येऊ लागले फोन..
हिंदी सिनेमातील नायक नायिका आणि त्यांचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळतात. जसपाल भट्टी यांचा पूर्वी दूरदर्शनवर एक कॉमेडी शो असायचा. त्यामधल्या एका भागात त्यांच्या बायकोचा लाडका कुत्रा एकदा हरवतो आणि त्याच्या बायकोची ‘बोलती’ बंदच होते. कुत्रा हरवल्याचे तिला एवढे दुःख होते की, तिला इतरांशी बोलावंसंच वाटत नाही. ती नवऱ्याला कुत्रा शोधण्यासाठी पिटाळते.
जसपाल भट्टी पोलीस स्टेशनला कुत्रा हरवल्याची तक्रार देण्यासाठी जातात. तिथे पोलीस अधिकाऱ्याला सांगतात, “देखो भाई, ये तो बडी अच्छी बात है की मेरी बिवी की ‘बोलती’ बंद हो गई है. लेकिन उसका कारन अगर आपने सोल्व्ह कर दिया तो फिरसे बोलने लगेगी.. ” पोलीस ऑफीसर चक्रावून जातो. त्यावर जसपाल भट्टी म्हणतात, “उसका प्यारा कुत्ता गुम हो गया है, इसकी वजह से बिवी की बोलती बंद हो गई है. आराम से कुत्तेको खोजो. मेरी तरफ से कोई जल्दी नही है….”(Story of missing dog of Raveena Tandon)
रविना टंडनच्या बाबतीतही काहीसा असाच प्रकार घडला होता. अर्थात हा प्रकार ‘कॉमेडी’ निश्चितच नव्हता. अभिनेत्री रविना टंडन हिच्याकडे एक छोटा पामेरियन कुत्रा होता. घरातील सर्वांचा प्रचंड लाडका. घरातील प्रत्येकजण त्याचे लाड करत असत. रेम्बो असं त्याचं नाव होतं. रवीनाचा नोकर रोज सकाळी त्याला बाहेर फिरायला घेऊन जात असे. एकदा दोन बदमाश चोरांनी या पामेरियन कुत्र्याला पळवून नेले. (Story of missing dog of Raveena Tandon)
रेम्बोला कुणीतरी पळवून नेले म्हटल्यावर घरातल्या सर्वांनी सर्व भडास आधी नोकरावर काढली. घरातील लोकांचे चित्त हरवले. रवीनाच्या आईने तर, अन्नपाण्याचा त्याग केला. सर्व घरावर एक दुःखाची छाया पसरली. शेवटी रवीना टंडनने पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. शिवाय तिने वर्तमानपत्रात जाहिरातही दिली. त्यामध्ये जो कोणी तिच्या रेम्बोला शोधून आणेल त्याला इनाम देण्यात येईल, असे जाहीर केले आणि त्याखाली तिने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिला. याचा उलटाच परिणाम झाला. (Story of missing dog of Raveena Tandon)
====
हे देखील वाचा – दिवाना: जेव्हा दिव्या भारती घाबरून तब्बल एक तास गाडीत बसून राहिली…
====
रवीनाच्या चाहत्यांचे तिला अहोरात्र फोन यायला लागले. त्याचबरोबर काही खंडणीखोर लोकांचे देखील तिला फोन यायला लागले. “तुम्हारा रेम्बो हमारे कब्जे मे है अगर उसे जिंदा चाहते हो तो दस लाख रुपये काली कोटी के पीछे ला के दो. पुलीस मे जाने की गलती नही करना वरना रेम्बो कुत्ते की मौत मरेगा..” अशा आशयाच्या फोन कॉल्सनी रविना त्रस्त झाली. पण तिचा कुत्रा काही मिळत नव्हता. रेम्बोच्या गायब होण्यामुळे घरात कोणाला अन्नपाणी गोड लागत नाही. एके दिवशी तर, बक्षिसाच्या आमिषाने एकाने वेगळाच कुत्रा आणून दिला. (Story of missing dog of Raveena Tandon)
एक दिवस मात्र अचानक रेम्बोचा शोध लागला. झालं असं की, त्या दोन चोरांनी या पामेरियन कुत्र्याला वर्सोव्याच्या एका पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानदाराला विकले होते. त्या मालकाने या कुत्र्याला वेगवेगळ्या नावाने बोलवायला सुरुवात केली. बॉबी, टॉमी, मोती… पण तो काही रिस्पॉन्स देत नव्हता. शेवटी त्याने वर्तमानपत्रातील रविनाची बातमी वाचून ‘रेम्बो’ म्हणून त्याला आवाज दिला. त्याने पटकन कान उभे केले. दुकानदाराला लगेच लक्षात आले की, हा रविनाचा कुत्रा आहे. त्याने रविनाला फोन केला आणि तिचा लाडका पामेरियन तिच्या हवाली केला. अशातऱ्हेने रवीनाला तिचा कुत्रा परत मिळाला.(Story of missing dog of Raveena Tandon)