वनिता आणि ओंकारची ‘लकडाऊन’ डायरी २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
नाटक, सिनेमा किंवा मालिका या तिन्ही माध्यमांना उत्तम आणि होतकरू कलाकार घडवून देण्याचे काम एकांकिका हे माध्यम गेली अनेकवर्षं सातत्याने करत आहे. हतबल न होता परिस्थितीशी झगडत हे कलाकार मनोरंजन सृष्टीत पुन्हा नव्याने उभे राहत आहेत. कलाकृती कोणतीही असो व कोणतेही माध्यम, एकांकिका करणाऱ्या या कलाकारांनी नेहमीच सगळ्यांना भुरळ पाडली. वनिता खरात आणि ओंकार राऊत ही दोन नाव प्रामुख्याने या संदर्भात घेतली जातात.
एकांकिका विश्वात आपली छाप पडल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसत आहेत. आता पुढचा टप्पा गाठत हे दोघेही ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटात दिसून येणार आहेत.
संतोष मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाने सज्ज असा ‘लकडाऊन’ हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. वनिता खरात आणि ओंकार राऊत या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या दोघांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी याच्या सोबत हे दोघे तरुण कलाकार झळकणार आहेत.
‘लकडाऊन’ हा चित्रपट विनोदी आणि त्याच बरोबर कौटुंबिक चित्रपट असून ओंकार यात अंकुश चौधरी यांच्या लहान भावाची भूमिका साकारत आहे. तर वनिताच्या भूमिका ही अजून गुलदस्त्यात आहे. वनिता आणि ओंकार हे दोघेही एकांकिका माध्यमाशी संलग्न असून या चित्रपटाच्या निमित्ताने दोन एकांकिका रंगकर्मींना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने वनिता आणि ओंकार दोघें ही तब्बल महिनाभर जुन्नर येथे होते.
पहिल लॉकडाऊन उघडतातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळत या चित्रपटाच चित्रीकरण पार पडल. चित्रीकरणाच्या दरम्यान शुभा खोटे यांचा एक भाग चित्रित केल्यानंतर ज्या वेळी त्या बाहेर एका खोली बाहेर पडत होत्या त्यावेळी त्या धडपडल्या आणि त्यावेळी तिथे असलेला ओंकार राऊत यांनी त्यांना आधार दिला, त्याच मनगट घट्ट धरत स्वतःला सावरत शुभा खोटे ओंकार राऊतला म्हणाल्या “शेवटचा असा हात मी देवानंद यांचा धरला होता” अशी एक आठवण आयुष्यभर सोबत राहील अशी ओंकारला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली.
====
हे देखील वाचा: तू तेव्हा तशी मालिकेत अभिज्ञा भावे निभावणार महत्वपूर्ण भूमिका
====
या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे या चित्रपटात अंकुश, प्राजक्ता, वनिता आणि ओंकार सोबत तब्बल १२ नामवंत कलाकार असणार आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचे साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केले आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केले आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.