Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Genelia Deshmukh : ‘वेड २’ चित्रपटाबद्दल जिनिलिया वहिनींनी दिली अपडेट!
मराठी चित्रपटसृष्टीचं २०२३ हे वर्ष बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘वेड’… रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं… इतकंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून जिनिलियाचा प्रवास सुरु झाला होता… आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रितेश-जिनिलियाची कॅमिस्ट्री पाहायला मिळणार असून स्वत: जिनिलियाने ‘वेड’ चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे…

दरम्यान, जिनिलियाने तब्बल १० वर्षांनी बॉलिवूडमध्ये आमिर खान सोबत सितारे जमीन पर या चित्रपटात काम केले असून सध्या त्याच्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुरु असलेल्या एका मुलाखतीमध्ये जिनिलियाने वेड चित्रपटाबद्दल एक सिक्रेट सांगितलं आहे… ‘मिरर’ सोबत संवाद साधताना जिनिलिया म्हणाली की,‘वेड २’वर काम सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येईल”… पुढे ती म्हणाली की, “सध्या मी आणि रितेश… आम्ही दोघंही आमच्या वैयक्तिक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहोत. पण वेळ मिळाल्यावर आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करू. ‘वेड २’ ठरलेलंच आहे! त्याला थोडा वेळ लागू शकतो, कदाचित एक किंवा दोन वर्ष. पण प्रेक्षक सतत याबद्दल विचारत असतात; त्यामुळे हा चित्रपट नक्की होणार.”
================================
हे देखील वाचा: Salman Khan लग्न करणार होता पण नेमकी माशी शिंकली कुठे?
=================================
दरम्यान, वेड चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘मजिली’ (Majili) या तेलुगु चित्रपटाचा रिमेक आहे… वेड चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केसी होती… इतकंच नाही तर अनेक पुरस्कारही या चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत…त्यामुळे आता जिनिलियाने दिलेल्या इंसाईडर माहितीमुळे लवकरच प्रेक्षकांना ‘वेड २’ पाहायला मिळणार यात शंका नाही… शिवाय, ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) या आगामी भव्य ऐतिहासिक चित्रपटातही जिनिलिया आणि रितेश यांची जोडी झळकणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi