Ashok Saraf : अशोक मामांनी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करण्याचं कारण

Vijay Patkar : कादर खानसोबत शुटींग, आईचं निधन आणि….
ज्यांचा विनोदी अभिनय पाहून चार्लीन चॅप्लिनची आठवण येते अशे स्लॅपस्टिक कॉमेडीचे मराठी चित्रपटसृष्टीतील बादशाह म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर… ४० वर्षांपेक्षा अधिक काळ विजय पाटकर यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्येही गालवला आहे…. विजय पाटकर(Vijay Patkar) यांना अनोख्या अंदाजासाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘क्या कूल है हम’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमाच झोलझाल’, ‘सिंघम’, ‘गोलमाल ३’,’तीस मार खान’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘सिम्बा’, ‘सर्कस’, अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या…. कायम प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कलाकाराच्या आयुष्यात मात्र आपल्या आईला शेवटचं पाहताना आलं नव्हतं.. काय होता तो भावनिक किस्सा वाचा… (Bollywood news)

विजय पाटकर यांनी नुकतीच ‘सुमन मराठी म्युझिक’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आईच्या निधनाची बातमी शुटींग सुरु असताना समजली होती असं सांगितलं…विजय पाटकर म्हणाले की, “चित्रपट किंवा कमिटमेंट म्हटल्यानंतर काही गोष्टी कराव्या लागतात. मी माझा मोठेपणा सांगत नाही पण जे घडलं ते सांगतोय. मी एक हाजमोलाची जाहिरात शूट करत होतो. कादर खान आणि मी त्यामध्ये काम करत होतो. सतीश कौशिक हे दिग्दर्शक होते. शुटींग सुरु असल्यामुळे मोबाईल पाहिला नव्हता.. काही वेळाने पाहिलं तर खूप मिसकॉल्स होते.. जरा २ मिनिटं बाजूला जाऊन फोन केला आणि माझी आई गेल्याची बातमी मला समजली.. सकाळी मी आईशी बोललो. आणि त्यानंतर बारा वाजता माझी आई गेली होती.” (Marathi films)

पुढे ते म्हणाले की, “मी सतीश कौशिकला (Satish Kaushik) म्हटलं पाच मिनिट दे. पाच मिनिट बाहेर गेलो आणि आलो. दीड वाजता माझं शूटिंगचं पॅकअप झालं होतं. माझी आई गेली आहे हे मी बारा ते दीड कोणाला कळूच दिलं नाही. दीड वाजेपर्यंत मी शूटिंग केलं. संजीव शर्मा म्हणून दिल्लीचा दिग्दर्शक होता. त्याला जाणीव झाली की काहीतरी माझं बिनसलं आहे. त्याने मला विचारलं की काही झालं आहे का? मी सांगितलं की,माझ्या आईचं निधन झालं आहे. तो म्हणाला कधी? मी म्हटलं की दीड तासापूर्वी. तो म्हणाला की सांगायचं होतं ना. मी त्याला म्हणालो की सेट लागला आहे, तर मी कसा बोलू. त्यात कादर खान सारखे दिग्गज कलाकार आहेत मी कसं बोलू शकतो… आणि खूप वेळ शूटिंग चालणार असतं तर मी सांगितलं असतं. म्हटलं की मी जोपर्यंत सांभाळू शकत होतो, तोपर्यंत सांभाळलं. त्यावेळी तसा मी नवीन होतो. आपण घाबरत असतो. बोलायची ताकद नसते. त्यातल्या त्यात मॅनेज झालं म्हणून करू शकलो.” (Vijay patkar untold story)
===========================
हे देखील वाचा: विजय पाटकर आणि सुरेखा कुडची दिसणार रोमॅण्टीक अंदाजात…
===========================
विजय पाटकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवरत्यांनी अनेक मराठ नाटक आणि चित्रपटांमध्ये छोटेखानी पण लोकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या….मराठी चित्रपटांमध्ये तर विनोदी भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा होताच.. पण हिंदीतील चित्रपट मेकर्सनाही आपली दखल घ्यायला लावणाऱ्या विजय पाटकर यांनी ‘तेजाब’, ‘मस्ती एक्सप्रेस’, ‘सिंघम’(Singham), ‘गोलमाल’, ‘क्या कुल है हम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली… (Vijay patkar movies)