Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Virajas kulkarni : विराजस कुलकर्णीने त्याच्या ‘दत्तक बाळाबद्दल’ शेअर केली खास पोस्ट
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार केली आहे. आईचा मृणाल कुलकर्णी यांचा अभिनयाचा वारसा यशस्वी पुढे नेणाऱ्या विराजसने अभिनयासोबतच, दिग्दर्शन आणि लेखक म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले आहे. नाटक, मालिका, जाहिराती, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट आदी मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा विराजस नेहमीच चर्चेत असतो.(Virajas kulkarni)
सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसणारा विराजस सध्या त्याच्या एक सुंदर पोस्टमुळे खूपच गाजताना दिसत आहे. विराजसने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘वरवरचे वधू-वर’ (Varvarche Vadhu-Var) हे नाटक रंगभूमीवर खूपच गाजत आहे. प्रेक्षकांचा कमालीचा प्रतिसाद नाटकाला मिळत असतानाच, दुसरीकडे या नाटकाला अनेक पुरस्कार देऊन सन्मानित देखील जात आहे.(Marathi Entertainment News)
वरवरचे वधू-वर नाटकाला मिळणाऱ्या या सर्व प्रेमाने भावुक झालेल्या विराजसने सोशल मीडियावर एक कृतज्ञतापूर्ण पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विराजसने नाटकाबद्दल आणि कलाकारांबद्दल आपल्या भावना व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. शिवाय त्यानं त्याच्या या ‘वरवरचे वधू – वर’ या नाटकाला ‘दत्तक बाळ’ असे संबोधले आहे. विराजसने नक्की काय लिहिले पाहू या.(Virajas kulkarni Post)

“लेखक आपलं स्क्रिप्ट कलाकारांच्या स्वाधीन करतो तेव्हा, आपलं मूल दत्तक देत आहे अशी काहीशी भावना असते. तुमच्या संस्कारात वाढलेलं ते पोरगं आता त्याच्या नवीन आई बाबांबरोबर वावरायला लागतं… तुम्ही काढलेल्या चित्रात ते त्यांच्या पॅलेट मधले रंग भरणार असतात आणि मग ते नव्याने रंगवलेलं चित्र लोकांसमोर येणार असतं आणि त्या चित्रानुसार तुमचं मूळ Sketch कसं होतं ते ठरतं. त्यामुळे तुम्ही कुणाबरोबर Collaborate करता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. (Marathi Top Stories)
============
हे देखील वाचा : geet gaata chal : गीत गाता चल ओ साथी गुनगुनात चला….
============
पण कधीतरी आकाशातले ग्रह तारे अशा पद्धतीने Align होतात की अत्यंत समविचारी, बऱ्यापैकी समवयस्क, आणि काही अर्थाने समदुःखी असे कलाकार, तंत्रज्ञ, सहकारी, आणि मित्र एकत्र येतात, आणि मग एक वेगळं बाळ जन्माला येतं… एक नवीन बाळ… एक Super बाळ. (Enetertainment Mix Masala)
असंच एक Super duper बाळ म्हणजे आमचं ‘वरवरचे वधू-वर…’ दोन तासात सुचलेलं, आणि पाच दिवसात लिहिलेलं हे बाळ आणि याचं पालन पोषण करणारे याचे दत्तक आई बाबा – सुव्रत जोशी आणि सखी गोखले… एकविसाव्या शतकातली अजरामर साहित्य कलाकृती देडपूल (इ.स. २०१६) यातली एक ओळ इथे आठवल्याशिवाय राहत नाही… “Your crazy matches my crazy”… या वाक्याला साजेशी ही crazy माणसं… लिहिताना मनात जी वाक्य ऐकू येतात त्यांना माझ्या कल्पनेपेक्षा विनोदी, माझ्या अपेक्षेपेक्षा संवेदनशील, आणि माझ्या अंदाजापेक्षा खूप खूप जास्त relatable करून कागदावरच्या ‘मिस्टर आणि मिसेस मोहित माने’ यांना खऱ्या अर्थाने जिवंत केलं.
फक्त उत्तम नाटक नाही, तर एक उत्तम theatre industry निर्माण व्हावी यासाठीचे प्रयत्न करणारा कलाकारखाना, त्याच बरोबर शांताईचे आमचे देवेंद्र राव sir, कलाकारखानाचे दोन भक्कम खांब जयंत आणि विनया गोडबोले, अत्यंत मन लावून नाटकाचा तांत्रिक भाग सांभाळणारी, आणि तेवढ्याच उत्साहाने reels मध्ये सहभाग घेणारी आमची संपूर्ण team यांच्या शिवायही हे चित्र पूर्ण झालं नसतं, हे super बाळ उडू शकलं नसतं.(Marathi News Update)
मागची चौदा वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना अनेक घट्ट मित्र झाले आहेत. त्यांच्या बरोबर आयुष्यभर काम करायचं आहे. त्याचं पहिलं पाऊल या नाटकात सूरज पारसनीसला कास्ट करून टाकलं. एरवी दिग्दर्शक म्हणून मला नाचवणाऱ्या सूरजला अभिनेता म्हणून नाचवायचा, आणि त्याच्या खूप मोठ्या Professional कारकिर्दीची सुरुवात करण्याचा मान मिळाला. आता रंगभूमी त्याची आहे. या अधिक कौतुक केलं तर सुव्रत-सखी रागावतील, पण बक्षिस लेखनाचं मिळालं आहे, So लिहिणं भाग होतं. Cheers.”(Sakhi Gokhle and Suvrat Joshi)
============
हे देखील वाचा : vinod khanna : आणि इम्रान खान यांच्या सिंथॉल साबणाच्या या जाहिराती आठवतात का?
============
वरवरचे वधू – वर या नाटकामध्ये अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांचे काम प्रेक्षकांना कमालीचे आवडत असून, हे नाटक देखील खूपच गाजताना दिसत आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे विराजस खूपच गाजला. या मालिकेनंतर त्याने अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केले. त्याच्या अनेक सुंदर जाहिराती देखील खूपच लोकप्रिय झाल्या. (Social News)