Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार नाही’; रुचिता आणि विशालच्या नात्यात दुरावा
बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये आधीच्या सीझनप्रमाणेच लव्ह अॅंगल पाहायला मिळाला. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांनी काही आठवड्यांनंतर दोघे एकमेकांना आवडत असल्याची कबूली त्यांनी दिली होती. मात्र, आता सीझनच्या आठव्या आठवड्यात त्यांच्यात बिननसलं आहे. घरात ३ वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यानंतर ही चक्र फिरल्याचं दिसून आलं.
नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला. यात दिपाली, सागर, रुचिता, प्राजक्ता, प्रभू, संस्कृती आणि तन्वी नॉमिनेट झाले. पॉवर की मुळे रेवा, संकेत आणि विशाल वाचले. तर जबरदस्त खेळी मुळे राकेश, राखी आणि अनुश्री नॉमिनेशनपासून वाचले. यानंतर, विशाल आणि रुचितामध्ये जरा भांडण झालं. पण त्या आधी दीपाली, रुचिताला विशालबद्दल विचारते. विशाल म्हणतो, ‘मला आवडते ती…१५ वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा’ पुढे, रुचितासुद्धा म्हणते, ‘असं नाहीये काही…आम्ही इमोशनली अटॅच आहोत, पण प्रेम असं नाहीये काही’ रेवा, पॉवर की प्राजक्ताकडे देते. अनुश्री, रुचिताला सांगते विशालकडची चावी चोर. रेवा विशालला विचारते, ‘तुला या घरात काय महत्वाचं आहे’ त्यावर विशाल काहीच नाही, असं म्हणतो. रुचिता आणि विशाल ‘पॉवर की’ चा प्लॅन करतात. रुचिता प्लॅनप्रमाणे विशालच्या खिशातून चावी चोरते.

यानंतर संस्कृती जी वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहे ती विशालला म्हणते की, ‘ती २२ आहे, आपण लाईन नाही क्रॉस केली नाही पाहिजे. हे खूप वाईट दिसतंय. यावरुन विशाल रुचिताला म्हणतो, ‘मी तुझ्यासोबत काही मस्ती करतो, त्यावर तू काय रिऍक्ट करशील यावर अवलंबून होतं सगळं. आता, मी काही बोललो तर तू लाजतेस. बाहेर सगळं विचित्र दिसतं. माझी पण फॅमिली आहे, माझं २० वर्षांचं करिअर आहे. तू आता करिअर सुरू केलंयस. तुला आता नाही कळणार, तू खूप लहान आहेस.’
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi 6 : रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!
================================
रुचिता विशालला समजावण्याचा प्रयत्न करते. विशाल, चावी खाली फेकतो. विशाल रुचिताला म्हणतो, ‘आजपासून मी या शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार नाही. या शोमध्ये तुझ्यासोबत बोललो, हीच माझी चूक झाली.’ विशालने असं बोलताच रुचिता तिथून निघून जाते. आता विशाल आणि रुचितामध्ये दुरावा आलेल्या दुराव्याचा दोघांच्या गेमवर परिणाम दिसणार का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. तसेच, या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi