Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

 करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं
मिक्स मसाला

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

by रसिका शिंदे-पॉल 19/02/2026

बऱ्याच दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अर्थात दोघांनी किंवा त्यांच्या टीम्सने याबद्दल अधिकृत माहिती दिली नसली तरी एअरपोर्ट किंवा काही सोहळ्यांमध्ये त्या दोघांचं एकत्र दिसणं आणि सोशल मिडियावरील काही फोटो नक्कीच त्यांचं लग्न लवकर होणार या बातमीवर शिक्कामोर्तब करत आहेत. शिवाय, काही दिवसांपूर्वी उदयपूर पॅलेस त्यांच्या लग्नासाठी सजवत असल्याचे फोटो, व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे आता विजयआ णि रश्मिकाच्या लग्नाला काहीच दिवस उरल्याचं जवळपास फिक्स झालं आहे. अशातच आता विजयचं हैदराबादमधील घरावर रोशनाई लागली असून सनईचे सुर वाजायला सुरुवात झाली आहे. (Vijay Devarkonda & Rashmika Mandanna)

दरम्यान, विजय देवरकोंडाचं हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आल्याचे व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले आहेत. घराबाहेर सुंदर फुलांची सजावटही करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी घर सजवण्याची ही लगबग पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय आणि रश्मिका दोघे साऊथधील लोकप्रिय कलाकार असून त्या दोघांची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची मैत्री झाली होती. मात्र, तेव्हा रश्मिकाने अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. परंतु, त्यांचा साखरपूडा काही कारणामुळे मोडला आणि दोघांच्या वैयक्तिक वाटा कायमस्वरुपासाठी वेगळ्या झाल्या. याचवेळी विजयने रश्मिकाला मानसिक आधार दिला आणि त्यातूनच त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगितलं जातं. (Vijay & Rashmika Marriage)

तसेच, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिके आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका व विजय यांचं २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न होणार आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असून ते राजस्थानमधील उदयपूर येथे संपन्न होईल. लग्नात पाहुण्यांसाठी ‘नो फोन पॉलिसी’ असून लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ मीडीयात किंवा सोशल मिडियावर लीक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लग्नाचे शूटिंग करणाऱ्या टीमनेही फोटो व व्हिडीओ लीक करू नये यासाठी कायदेशीर करार केल्याचं देखील म्हटलं जातंय. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna वरच्या प्रेमाची कबुली?

================================

२६ फेब्रुवारी २०२६ ला जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अगदी खाजगीत लग्न झाल्यानंतर ४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील ‘ताज कृष्णा’ हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाणार असल्याचं एक पत्रक देखील समोर आलं आहे. या सोहळ्याला दाक्षिणात्य आणि बॉलीवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या ‘इन्व्हिटेशन हॅम्पर’ मध्ये विजयाच्या ‘Rowdy’ ब्रँडचा पिवळा टी-शर्ट, काजूचा बॉक्स आणि ‘नॅशनल क्रश’ नावाचे परफ्युम अशा हटके वस्तू पाठवण्यात आल्या आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (Tollywood)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Rashmika Mandanna South films Tollywood vijay and rashmika marriage vijay devarkonda
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.