Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘माहेरची साडी’ नंतर काय? उत्तर मिळाले हो…

 ‘माहेरची साडी’ नंतर काय? उत्तर मिळाले हो…
कलाकृती विशेष

‘माहेरची साडी’ नंतर काय? उत्तर मिळाले हो…

by दिलीप ठाकूर 21/04/2023

साॅलीड हिट पिक्चर एका प्रश्नाला जन्माला घालते? पुढे काय? ‘माहेरची साडी'(Maherchi sadi) ( १९९१) नंतर वितरक, निर्माते व दिग्दर्शक विजय कोंडके यांचा पुढील चित्रपट कोणता हाही प्रश्न असाच भारी. अगदी ‘माहेरची साडी२’ असा सिक्वेल अर्थात पुढचा भाग निर्माण पडद्यावर येणार असल्याच्या बातम्या अगदी काही मुलाखतीही आल्या. त्यात पुन्हा रसिकांच्या किमान तीन पिढीत हा चित्रपट उपग्रह वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असल्याने हा चित्रपट आणि असा प्रश्न सतत समोर राहिला. या प्रश्नाला उत्तर मिळालयं, ‘लेक असावी तर अशी.’ विजय कोंडके यांना एका गोष्टींचा असलेला विश्वास खूपच महत्वाचा आहे,
‘माहेरची साडी’चे वलय, लोकप्रियता, अस्तित्व आणि प्रभाव आपल्या ‘लेक असावी’ ला निश्चित सदुपयोग होईल असा त्यांना विश्वास आहे. आता पुन्हा प्रश्न, या चित्रपटात अलका आठल्येची भूमिका आहे का? तर नाही. मग ‘लेक ‘ कोण आहे?
उत्तर, गार्गी दातार. तिच्या जोडीला शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, प्राजक्ता हणमगर, सविता मालपेकर, सुरेखा कुडची, कमलेश सावंत, ओंकार भोजने, अभिजित चव्हाण, नयना आपटे. संपूर्णपणे वेगळा सेटअप. यानिमित्त ‘माहेरची साडी’ची (Maherchi sadi) सगळीकडेच आठवण काढली जातेय आणि तिच ‘लेक’बद्दल उत्सुकता निर्माण करेल, हे असेच असते.

सुरुवातीलाच एक प्रश्न करतो, भाग्यश्री पटवर्धन ‘माहेरची साडी’मध्ये (Maherchi sadi) सोशिक नायिकेच्या भूमिकेत हे काॅम्बिनेशन तुम्हाला पटते? या विजय कोंडके हे आपल्या पहिल्या दिग्दर्शनात भाग्यश्री पटवर्धनच हवी म्हणून भारीच प्रयत्नशील होते. हा १९९१ सालचा चित्रपट आहे. त्या दिवसांत ‘मैने प्यार किया’ (१९८८) खणखणीत यशस्वी चित्रपट होता, भाग्यश्री पटवर्धनची जबरदस्त क्रेझ होती, ती कॅश होईल असा अतिशय धोरणी आणि चित्रपट व्यवसायाची नाडी ओळखलेल्या विजय कोंडके यांना विश्वास असणे स्वाभाविक होतेच. ती ‘नाही’ म्हणाली तर अलका कुबलला विचारु असा त्यांच्याकडे ‘प्लॅन बी’ तयार होताच, तो असावाही लागतो. तिने एन. एस. वैद्य दिग्दर्शित ‘लेक चालली सासरला’ (१९८४) मध्ये साधारण अशीच भूमिका साकारली असल्याने त्यापेक्षा भाग्यश्री पटवर्धनची निवड करुया असा विजय कोंडके यांचा व्यावसायिक दृष्टिकोन होता.

बरेच दिवस भाग्यश्रीची वाट पाहून त्यांनी अलका कुबलची निवड केली आणि त्यांचं, सिनेमाचे आणि अलकाचेही ‘भाग्य ‘श्री उजाळले. अण्णासाहेब देऊळगावकर यांची पटकथा आणि संवाद. या चित्रपटाची मूळ कथा केशव राठोड यांची. त्यांच्या ‘माहेरनी चुनरी’ या राजस्थानी सुपर हिट चित्रपटाची ही मराठीत रिमेक. त्याची गुजराती रिमेकही लोकप्रिय. विषय काय? हुंड्यासाठी सासूकडून सूनेचा प्रचंड छळ होतो. इतका की, सासू तिला विहिरीत ढकलून देते आणि त्यात तिचा मृत्यू होतो…दचकून टाकणारे दृश्य. समाजातील हे खूप मोठे वास्तव. वर्षानुवर्षे समाजात हुंडा बळीची सामाजिक समस्या कायम आहे.
यात पती आणि पत्नी ( रमेश भाटकर व अलका कुबल) यांचे लग्न होते. तर सासू ( उषा नाडकर्णी) या सूनेचा जबरा छळ करते आणि त्यातच ती सूनेला विहिरीत ढकलते. प्रेक्षकांची प्रचंड सहानुभूती मिळाली, ओलावा वाढला. मग अंत्यविधी प्रसंगी बॅकग्राऊंडला एक भावनिक गाणे. तेही लोकप्रिय.

या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, चारुशीला साबळे, भालचंद्र कुलकर्णी, अलका इनामदार ( हे दोघे सोशिक नायिकेचे दुर्दैवी माता पिता), राघवेन्द्र कडकोळ, आशा पाटील आणि जयश्री गडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगदीश खेबूडकर यांच्या गीताना अनिल मोहिले यांचे संगीत आहे. यातील ‘सासरला ही बहिण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी’ हे गाणे मग प्रत्येक लग्नाला आवर्जून लाऊडस्पिकरवर लागायचे. तर ‘माझं सोनुलं सोनुलं माझं छकुलं, छकुलं बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं ‘ हे गाणे खेड्यापाड्यातील बारशाला हमखास लावले जाते. हा चित्रपट या गाण्यानीच तळागाळापर्यंत पोहचला. याशिवाय या चित्रपटात आता सांगू कशी सांगा बोलू कशी?, भावासाठी धावा करते पाठीशी राही जागी हो आई, आज लक्ष्मीचं रुप कसं दिसते साजरं चला घालवूया जागर, दुभंगली धरणीमाता फाटते आकाश गं या गाण्यांचा समावेश आहे.

विजय कोंडके यांच्याकडे संपूर्ण राज्यातील सर्व चित्रपटगृहांची खडान खडा माहिती असल्याने आपला हा चित्रपट कशा पद्धतीने रिलीज करत करत जायचे याचे उत्तम प्लॅनिंग होते. आणि त्या काळात विभागवार चित्रपट प्रदर्शित होत. त्यानुसार विजय कोंडके यांनी सर्वप्रथम सांगली शहरात सिनेमा रिलीज केला. तेथे तुडुंब गर्दी झाल्याच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या, त्यामुळे सिनेमाची इतरत्र हवा निर्माण झाली. कुतूहल निर्माण झाले. मग इचलकरंजीच्या थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला. तेथेही हाऊसफुल्ल गर्दी. त्यात एक दृष्टिहीन चाहता सिनेमा ‘ऐकायला’ आला. त्याचा फोटो आणि बातमी सगळीकडे पसरली. तोपर्यंत प्रमोशन शब्द प्रचलित नव्हता. तरी पब्लिसिटी फोकस्ड व प्रभावी होती. मग कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत आणि सातारापासून पुण्यापर्यंत जेथे ‘माहेरची साडी’ लागला रे लागला की प्रत्येक शो हाऊसफुल्ल. काही ठिकाणी तर सकाळी नऊ वाजताचाही शो सुरु केला. दिवसात पाच खेळ आणि सगळे हाऊसफुल्ल. राऊंड शोची हवा व हमी. समाजातील वातावरण एकदम बदलून गेले. आपल्या देशात सुपर हिट पिक्चर फक्त पडद्यावर राहत नाही, तो असा पसरतो. तालुक्यातील ठिकाणच्या ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज केला होता तेथे अगोदर गाडी घ्या असे एस. टी.चे प्रवासी सांगत. खेड्यापाड्यातून अनेक प्रेक्षकांनी सायकल,बैलगाडी,स्कूटर, फोरव्हीलर,सितारा,टमटम,टेम्पो,ट्रक किंवा एस. टी. यापैकी जे मिळेल त्या वाहनाने थिएटरवर जाई आणि पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहत. काही ठिकाणी तर सर्व सीटस भरल्यावर खाली बसून अथवा बाजुला उभे राहून हा चित्रपट पाहिला जाई. एक प्रकारचे हे झपाटलेपण होते.(Maherchi sadi)

मुंबईत तर दादरच्या चित्रा थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल १२५ आठवडे चालला. हादेखील विक्रमच. (आज सुपर हिट चित्रपटही सव्वाशे दिवस ठाम मांडून बसणे अवघड झालयं) संपूर्ण राज्यात मिळून या चित्रपटाच्या तब्बल ५० प्रिन्ट्स प्रदर्शित झाल्या, रेकॉर्ड हो रेकॉर्ड. तो व्हयलाच हवा. मला आठवतय या चित्रपटाचा सुवर्ण महोत्सवी इव्हेन्टस अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगला. खासदार अभिनेते सुनील दत्त व दादा कोंडके खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या काळात मराठी चित्रपटाची अशी विक्रमी पार्टी म्हणजे विशेषच होते.(Maherchi sadi)

या पिक्चरचे यश अलका कुबलला कायमच फळलयं. आजही या पिक्चरने ओळखली जातेय. ती स्टार झाली. अफाट यश मुरते ते असे. त्या काळात ती ग्रामीण भागात कुठेही आपल्या अनेक मराठी चित्रपटाच्या सेटवर असली की तिला पाह्यला गर्दी वाढत जाई. एक प्रकारचे हे प्रेमच असतं. अनेक महिला तिला प्रचंड सहानुभूती दाखवत. आशीर्वाद देत. विचारपूस करत. याचे कारण म्हणजे ते तिला या चित्रपटातील भूमिकेत प्रत्यक्षात पाहत असत. आपल्याकडील चित्रपट रसिकांचा कायमच असा दृष्टिकोन असतो, त्याना पडद्यावरचा कलाकार आणि प्रत्यक्षातील माणूस वेगळा असतो हे लक्षात येत नाही. ही लोकप्रियता आणि रसिकांचे अफाट प्रेम असे असते. पिक्चरच्या यशाची ही सोनेरी किनार आहे. (Maherchi sadi)

======

हे देखील वाचा : हेमा मालिनीचा मेट्रो, रिक्षा प्रवास आणि बरंच काही

======

या पिक्चरची हिंदीत रिमेक झाली. त्या चित्रपटाचे नाव होते, ‘साजन का घर’ आणि सुरेन्द्र बोहरा दिग्दर्शित या चित्रपटात त्यात ऋषि कपूर आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण हा चित्रपट चकाचक झाला. ‘माहेरची साडी’ अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने साकारलेला चित्रपट आहे. त्याचा विषयच जनसामान्यांच्या माहितीतील होता. तो सरळपणे मांडला म्हणूनच धो धो यशस्वी ठरला. आजही या चित्रपटाची आठवण काढली जाते आणि अलका आठल्येला आज बत्तीस वर्षे या चित्रपटाने सोशिक नायिका अशी ओळख मिळवून दिली आहे. ती तिला आजही उपयोगी पडतेय. एक सुपर हिट चित्रपट बरेच काही घडवत असतो ते हे असे.. ‘माहेरची साडी’च्या गुणवत्तेबाबत वाद नक्कीच असतील, पण घवघवीत यशाबद्दल तर नक्कीच नाहीत.
लेक असावी तर अशी’च्या निर्मितीच्या निमित्ताने ‘माहेरची साडी'(Maherchi sadi) वरही फोकस पडतोय, एक भारी हिट अशी दीर्घ काळ साथसंगत करते, हेच तर आपल्या चित्रपट संस्कृतीचे विशेष आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured Maherchi sadi Marathi Movie second part story
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.