Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Hema Malini यांना ‘ड्रीम गर्ल’ हे विशेषण कुणी आणि कधी दिले?

 Hema Malini यांना ‘ड्रीम गर्ल’ हे विशेषण कुणी आणि कधी दिले?
बात पुरानी बडी सुहानी

Hema Malini यांना ‘ड्रीम गर्ल’ हे विशेषण कुणी आणि कधी दिले?

by धनंजय कुलकर्णी 05/01/2026

सत्तरच्या दशकामध्ये हेमामालिनी टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या नावाच्या आधी ‘ड्रीम गर्ल’ ही उपाधी लावली जायची. खरोखरच त्या काळात हेमा देशभरातली तरुणाईच्या ‘ड्रीम गर्ल’ होत्या, पण हे नाव त्यांना दिलं कुणी? त्याचा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.  सर्वांना वाटतं की 1977 साली आलेल्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटापासून त्यांना ही उपाधी मिळाली.  पण त्यांना हे विशेषण त्यांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मिळालं होतं. कोणता होता तो चित्रपट आणि काय होतं तो नेमका किस्सा?

हेमामालिनी लहानपणापासूनच भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम या दाक्षिणात्य नृत्य प्रकारामध्ये प्राविण्य मिळवत होत्या. सुरुवातीला दिल्ली आणि नंतर मद्रासमध्ये अनेक नृत्य गुरुंकडून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली.  हा चित्रपट Veniradai, दिग्दर्शक सी व्ही  श्रीधर यांचा होता.  या चित्रपटात दोन नायिका होत्या एक हेमामालिनी आणि दुसऱ्या जयललिता! (ज्या नंतर राजकारणात आल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या) या चित्रपटांसाठी दिग्दर्शकाने हेमामालिनींचे नाव बदलून सुजाता ठेवले होते.  हेमा मालिनी यांना चित्रपट हे माध्यम अजिबात आवडत नव्हते.  त्यांच्या घरात देखील चित्रपटाबद्दल फार चांगले महत्त्व मत नव्हते.  

काहीशा नाखुशीनेच हेमा यांनी चित्रपटात काम सुरू केलं. काही दिवसाच्या शूटिंगनंतर मात्र चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाने हेमा यांना खूपच बारीक आणि अशक्त, तसेच त्या हिरोईन मटेरियल नाही या असल्याकारणाने चित्रपटातून चक्क काढून टाकले.  ज्या प्रकारे त्यांनी हेमा यांना चित्रपटापासून बेदखल केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केले होते. त्यामुळे हेमामालिनी आणि त्यांची आई प्रचंड दु:खी नाराज झाल्या होत्या.  यापुढे चित्रपटात काम करायचं नाही अशी प्रतिज्ञाच हेमा यांनी केली होती.  पण त्यांच्या नशीबात काही वेळच लिहिलेले होते.

मद्रासला एक चित्रपट निर्माते होते के सुब्रमण्यम. ते स्वत:च्या नावाच्या मागे डायरेक्टर हा शब्द हमखास लावायचे.  त्यांना या शब्दाचा खूप अभिमान होता.  डायरेक्टर के सुब्रमण्यम. त्यांची मुलगी होती पद्मा सुब्रमण्यम. ती देखील नृत्यांमध्ये निपुण होती. राज कपूरला नायिका म्हणून तिला साईन करायचे होते. पण तिला सिनेमात अजिबात इंटरेस्ट नव्हता.  तिने चक्क एम जी रामचंद्रन आणि सत्यजित रे यांच्या ऑफर देखील नाकारल्या होत्या असे म्हणतात.  के सुब्रमण्यम पृथ्वीराज कपूर यांचे मित्र होते. साऊथ कडचे आणखी एक निर्माते होते बी अनंत स्वामी.  ते राज कपूरला घेऊन एक चित्रपट बनवत होते आणि नायिकेच्या  शोधात होते. ‘संगम’ नंतर राज कपूरचा हा चित्रपट येणार होता त्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी वैजयंती माला सारखी सुंदर आणि नृत्य निपुण अशी नायिका हवी होती.  योगायोगाने हेमा मालिनींच्या नृत्याचा कार्यक्रम के सुब्रमण्यम यांनी अरेंज केला होता. या कार्यक्रमाला बी अनंत स्वामी देखील उपस्थित होते. त्यांनी हेमा यांना पाहीले आणि लगेच त्यांनी आपल्या नवीन चित्रपटाची नायिका हीच असेल असे ठरवले.

बी अनंत स्वामी हेमांच्या घरी जाऊन त्यांच्या आईला आपला प्रोजेक्ट बाबत माहिती दिली.  एकदा दूध पोळले की माणूस ताक देखील फुंकून पितो त्या पद्धतीने हेमाच्या परिवाराने निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रपटाबद्दल सगळी माहिती घेतली. बी अनंत स्वामी यांनी सांगितले की, आम्ही जरी तुझी निवड करत असलो तरी फायनल डिसिजन राज कपूर घेतील. बी अनंत स्वामी यांनी राज कपूरला हेमामालिनी बद्दल सांगितले.  राजकपूर यांनी के सुब्रमण्यम यांना याबाबत विचारले.  तेव्हा त्यांनी सांगितले, ”हेमा मालिनी सोबत तुम्ही नक्की काम करा ही मुलगी चांगली अभिनेत्री आहे.” त्यावर राज कपूर यांनी विचारले,” पण तिला तर श्रीधर यांनी रिजेक्ट केले होते ना?”  त्यावर सुब्रमण्यम  म्हणाले,” तो त्यांचा निर्णय होता. मी सांगतो ही मुलगी जर सिनेमात फ्लॉप झाली तर मी मा‍झ्या नावाच्या आधीचा डायरेक्टर हा शब्द काढून टाकेन !”. सुब्रमण्यम यांच्या आत्मविश्वासाने राज कपूर देखील खूष झाले.  

================================

हे देखील वाचा : अमिताभने केली चक्क हेमा मालिनीच्या भावाची भूमिका !

================================

राज कपूरने हेमामालिनींना मुंबईला स्क्रीन टेस्ट साठी बोलावले. आर के स्टुडिओमध्ये स्क्रीन टेस्ट झाली आणि त्यात सिलेक्शन झाले. राज कपूर सोबत त्यांना पहिला चित्रपट मिळाला ‘सपनों का सौदागर’. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कौल यांनी केले होते. चित्रपट चालला नाही.  पण हेमामालिनी मात्र प्रचंड सर्वत्र फेमस झाल्या.  या ‘सपनों का सौदागर’ चित्रपटाच्या पोस्टरवर Introducing Raj Kapoor’s Dream girl Hema malini असे लिहिले होते. जाता जाता ज्या श्रीधर या दिग्दर्शकाने हेमा यांना आपल्या सिनेमातून काढून टाकले होते, त्याला १९७३ साली ‘गहरी चाल’ या सिनेमात हेमाला घ्यावे लागले होते! त्यामुळे ड्रीम गर्ल हे विशेषण हेमामालिनी यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी मिळाले आणि ते ही राजकपूरमुळे!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood update dream girl of bollywood Hema Malini hema malini movies Raj Kapoor raj kapoor movies retro bollywood news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.