
हेमांचं जितेंद्रंशी जुळलेलं लग्न Dharmendra यांनी कसं मोडलं? जाणून घेऊयात हा खराखुरा फिल्मी ड्रामा
बॉलिवूडचे ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol) यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं… भारतीय चित्रपटसृष्टीचा एक महत्वाचा तारा आज निखळला आणि चित्रपटसृष्टी पोरकी झाली.. विविधांगी भूमिका साकारात आपला चार्म चाहत्यांच्या मनात कायमस्वरुपी उमटवणाऱ्या धर्मेंद्र यांची बऱ्याच नायिकांसोबत ऑनस्क्रिन जोडी जमली… पण ऑन आणि ऑफ स्क्रिन त्यांची जोडी जमली ती हेमा मालिनीसोबत.. २० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकत्र काम केलं… ७०-८०चं दशक धर्मेंद्र यांच्यामुळे फिल्मी दुनियेतचलं सुवर्णदशकं मानलं जातं… आज त्याच दशकातील गाजलेल्या या दिग्गज कलाकाराने इस्लाम धर्म स्वीकारला होता असं म्हटलं गेलं… नेमकं काय होतं ते प्रकरण आणि हेमा यांचं लग्न जितेंद्रशी ठरल्यावर धर्मेंद्र यांनी काय केलं होतं जाणून घेऊयात.. (Dhamrmendra News)

धर्मेंद्र पडद्यावर जितके सुपरहिट ठरले तितकेच वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत राहिले. त्यांची दुसरी पत्नी हेमासोबत विवाह करण्यासाठी त्यांनी थेट इस्लाम कबुल केला होता आणि हेमा यांच्याशी विवाह केला होता. परंतु, आधीच धर्मेंद्रंच लग्न झाल्यामुळे हेमा यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता… इतकंच नाही तर, धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यापासून दुर राहण्यासाठी कुटुंबाने हेमा यांचं लग्न जितेंद्र यांच्याशी ठरवलं होतं.. ते लग्नाच्या तयारीत असतानाच धर्मेंद्र जितेंद्र (Jeetendra) यांची प्रेयसी शोभासोबत हेमाच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचं लग्न थांबवलं होतं… अतिशय फिल्मी पद्धतीने त्यांनी हेमा यांचं होणारं लग्न तोडलं होतं असं सांगितलं जातं… (Hema Malini & Jeetendra Marriage)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन
================================
खरं तर धर्मेंद्र हेमाशी (Hema Malini) लग्न करण्यासाठी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट द्यायला तयार होते पण त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यासाठी तयार नव्हती… त्यामुळे असं म्हटलं जातं की धर्मेंद्र यांनी गुपचुप इस्लाम धर्म स्वीकारत हेमा मालिनींसोबत दुसरं लग्न केलं होतं… यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नावरुन वाद निर्माण झाले होते पण या सगळ्याला न जुमानता धर्मेंद्र यांनी सुखाने दोन्ही पत्नींसोबत संसार केला… हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा (Esha Deol) आणि अहाना या २ मुली असून पहिल्या पत्नीकडून सनी आणि बॉबी देओल (Sunny & Bobby Deol) अशी २ मुलं त्यांना आहेत… शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिन असं बऱ्याचवेळा धर्मेंद्र म्हणाले होते आणि अगदी झालंही तसंच… त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis Movie) येत्या २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi