‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night Stand म्हटलं होतं!
हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अशी ओळख तयार करणारे ऋषी कपूर (Rishi Kapoor) कायमच त्यांच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असायचे… बॉबी या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला होता… या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेले ऋषी कपूर यांचे फिमेल फॉलोईंग फार वाढले होते… एकीकडे चित्रपटांची गाडी सुसाट सुरु असताना ऋषी यांनी नीतू सिंग यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि एक नवा प्रवास सुरु केला… दरम्यान, काही वर्षांपूर्वी नीतू कपूर (Neetu Kapoor)यांनी त्यांच्या एका मुलाखतीत ऋषी कपूर यांचे सगळे अफेअर्स त्यांना माहित होते असं म्हटलं होतं… इतकंच नाही तर त्यात असं देखील लिहिलं होतं की त्या त्यांना One Night Stand असं म्हणायच्या… नेमकं नीतू कपूर काय म्हणाल्या होत्या? जाणून घेऊयात… (Entertainment News)

नीतू कपूर यांनी मुलाखतीत असं म्हटलं होतं की, “मी माझ्या पतीला १०० वेळा फ्लर्ट पकडलं आहे. पण मला माहित होतं की, लग्नानंतर इतर महिलांसोबतचे प्रत्येक नाते ऋषीसाठी वन नाईट स्टँडसारखे होते. खरं तर आधी ऋषी यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी खूप नाराज असायचे आणि त्यांची भांडायचे… पण नंतर मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु लागले आणि ही प्रकरणं कुठवर जातील ते पाहू लागले”… (Rishi Kapoor Affairs)

पुढे नीतू असं देखील म्हणाल्या की, “ऋषी याचं आऊटडोअर शुटींग असलं की त्यांच्या प्रत्येक अफेरबद्दल मला कसं कळतं याचं त्यांना आश्चर्य वाटायचं… शिवाय, त्यांना मला सगळं माहित असूनही मी शांत कशी राहते ही गोष्ट खटकायची… पण नंतर भांडण न करता मी या विषयांवर बोलणं बंद केलं आणि माझं आयुष्य जगू लागले… कारण मला माहित होतं की, ऋषी माझ्याशिवाय राहू शकत नव्हते. काहीही झाले तरी, त्यांना कुटुंबच निवडावं लागणारं होतं”…या मुलाखतीवेळी नीतू यांची पुरुषांच्या स्वभावावर प्रकाशझोत टाकत असं म्हटलं की,“फ्लर्टिंग हा पुरुषांचा मुळ स्वभावच आहे. त्यामुळे त्यांना थोडीफार मोकळीक द्यायला हवी.”
================================
हे देखील वाचा : Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!
================================
दरम्यान, नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना रिधिमा आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अशी दोन अपत्य आहेत.. त्यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, दोघांनी एकत्र ‘धन दौलत’, ‘झुठा कही का’, ‘खेल खेल में’, ‘रफु चक्कर’, ‘पती, पत्नी और वो’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अॅंथनी’, ‘बेशरम’, ‘लव्ह आज कल’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं… (Rishi and Neetu kapoor movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi