जेंव्हा परवीन बाबी जिना लोलोब्रिजिडा यांच्यात चांगलीच जुंपली!
बॉलीवूडपेक्षा हॉलीवुड आणि इतर पाश्चात्य देशातील चित्रपटात काम करून ज्या अभिनेत्याने आपल्या कर्तृत्वाची दखल जगभरात घ्यायला लावली तो अभिनेता म्हणजे कबीर बेदी (Kabir bedi). सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात पदार्पण केलेल्या कबीर बेदी यांची भारतीय चित्रपटातील कारकीर्द फारशी बहरली नाही पण भारताबाहेर मात्र त्यांनी आपल्या अभिनयाचा एक उत्तम ठसा उमटवला.
अलीकडेच कबीर बेदी यांनी आपले आत्मचरित्र Stories I must tell: The emotional life of an actor प्रकाशित केले. या पुस्तकात अनेक खळबळ जनक घटनांचा उल्लेख आहे.अभिनेता कबीर बेदी आणि अभिनेत्री परवीन बाबी यांचे अफेअर फार काळ जरी चालले नसले तरी त्या काळात परवीन बाबी कबीर बेदी (Kabir bedi) यांच्या प्रेमात पूर्णपणे पागल झाली. हा किस्सा साधारणतः १९७६ सालचा आहे तेव्हा कबीर बेदी इटलीमध्ये त्यांच्या The black corsair या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत परवीन बाबी देखील इटलीमध्ये आली होती.
त्या काळात एकदा इटालियन अभिनेत्री जिना लोलोब्रिजिडा हिने कबीर बेदीला आपल्या घरी पार्टीसाठी बोलावले. वाचकांना आठवत असेल जिना ही त्या काळातली खूप मोठी अभिनेत्री होती. ‘कम सप्टेंबर’ हा तिचा अतिशय गाजलेला सिनेमा. जिना हिच्या घरी कबीर बेदी परवीन बाबीला घेऊन गेला. परवीन बाबीला आपल्या घरी आलेले पाहिल्यावर जिनाच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तिने परवीनला इग्नोर करायला सुरुवात केली. ती फक्त लाडे लाडे कबीर बेदीसोबतच बोलत होती. ती परवीनशी बोलणे सोडाच तिच्याकडे ढुंकून पहात देखील नव्हती.
परवीनला हा खूप अपमान वाटत होता. पण कबीर बेदी ह्याने तिला डोळ्यानेच शांत राहायला सांगितले होते. परवीन देखील आतल्या आत आपला संताप गिळून टाकत होती. पण जिना वारंवार तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचा अपमान करतच होती. नंतर जीनाने कबीर बेदीला एका हॉटेलमध्ये संध्याकाळी डिनरला बोलावले. संध्याकाळी पुन्हा कबीर बेदी (Kabir bedi) परवीनला घेऊन त्या हॉटेलवर पोहोचला. इटलीमधील ते प्रख्यात हॉटेल होतं. तिथला ॲम्बिअन्स खूप चांगला होता. मंद प्रकाश होता. बॉल डान्सचे म्युझिक चालू होते. जिनाने कबीर बेदीचे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे परवीनकडे दुर्लक्ष केले. ती कबीर बेदींला डान्स फ्लोअरवर घेऊन गेली आणि त्याच्यासोबत डान्स करू लागली.
परवीनचा आतल्या आत नुसता तिळपापड होत होता. डान्स झाल्यानंतर पुन्हा दोघे खाली आले. तेव्हा जीनाने आपले मौन सोडले आणि तिने कुत्सितपणे परवीनला विचारले ”तू इथे काय करते आहेस? इथे काय तारे मोजायला आली आहेस?” आता मात्र कबीर बेदीला (Kabir bedi) वाटले आता मोठा स्फोट होणार आणि राडा होणार पण परवीन बाबीने शांतपणे उत्तर दिले, ”नाही डियर, मी माझ्या मित्रासोबत इथे आले आहे आणि फॉर्च्यूनेटली मला जिवलग मित्र आहे. तुला नाही.” एवढे तिखट उत्तर देऊन परवीन कबीरला घेऊन हॉटेलच्या बाहेर पडले. कबीरने मोठा सुटकेचा निश्वास सोडला. या आत्मचरित्रात कबीर वेदीने सांगितले की मोठ्या चलाखीने परवीन बाबीने सिच्युएशन हाताळली आणि कटू प्रसंग टाळला!
=======
हे देखील वाचा : लता दीदी आणि दिलीप यांची ‘ही’ भेट ठरली शेवटची
=======
जाता जाता: थोडंसं कबीर बेदी या अभिनेत्याबद्दल. खरंतर भारतापेक्षा जगभर त्याने त्याच्या कर्तृत्वाने जबरदस्त नाव कमवले. बॉलीवूड, हॉलीवुड आणि युरोप या तिन्ही कॉन्टिनेन्टल्समध्ये त्याने मूव्ही, थिएटर आणि टीव्ही या माध्यमातून आपले कला कौशल्य दाखवले. कबीर बेदी (Kabir bedi) यांनी रेडिओसाठी देखील भरपूर काम केले. तसेच व्हाईस ओवर आर्टिस्ट म्हणून देखील त्यांनी देशात आणि परदेशात आपल्या बुलंद आवाजाचा परिचय दिला.
कबीर बेदी यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरील भूमिकांना प्रिंट आणि डिजिटल मीडियातून भरपूर मागणी असते. जेम्स बॉण्डच्या ‘ऑक्टोपसी’ या सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी आजवर चार लग्ने केली असून त्यांच्या पहिल्या पत्नी प्रोतिमा बेदीपासून झालेली पूजा बेदी एकेकाळी टॉपची मॉडेल होती!