‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

संगीतकार Madan Mohan यांचा कोणत्या जेष्ठ संगीतकाराने चार चौघात पाणउतारा केला होता?
संगीतकार मदन मोहन यांनी अतिशय अप्रतिम संगीत आपल्या चित्रपटातून दिले. विशेषत: गजल हा प्रकार त्यांनी फार नजाकतीने हाताळला. लता मंगेशकर स्वतः मान्य करतात की मदनमोहन इतक्या सुंदर रचना इतर संगीतकारांकडे त्यांनी गायल्या नाहीत. मनमोहन हे कायम चांगलं संगीत जरी देत असले तरी त्यांच्या चित्रपटांना व्यावसायिक यश फार कमी वेळेला मिळाले. त्यामुळे ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ अशी त्यांची ख्याती झाली होती.
अतिशय अप्रतिम संगीत देणाऱ्या मदन मोहन यांना एकदा मात्र त्यांच्या ज्येष्ठ संगीतकारकडून तिखट खडे बोल ऐकून घ्यावे लागले होते. त्या संगीतकाराने मदन मोहन यांचा चार चौघात अपमानच केला होता. पण मदन मोहन यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले आणि त्या संगीतकाराचे समाधान केले. आणि वाद तिथेच संपवला. कोण होता ते संगीतकार आणि त्यांनी चार चौघांमध्ये संगीतकार मदन मोहन यांचा कां पाणउतारा केला होता?

हे संगीतकार होते सज्जाद हुसेन. भारतीय चित्रपट संगीतात अतिशय मोजके काम करून आपले नाव अजरामर करणारे संगीतकार म्हणजे सज्जाद हुसेन. त्यांनी आपल्या ३५ वर्षाच्या उभ्या कारकीर्दीत फक्त १८ चित्रपटांना संगीत दिले. गुणवत्ता आणि दर्जा याच यात कधीही त्यांनी तडजोड केली नाही. सज्जाद स्वत: उत्तम मेंडोलीन वादक होते. त्या काळातील ते भारतातील सर्वोत्कृष्ट मेंडोलीन वादक होते. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी मेंडोलीन वादन केले होते. मेंडोलीन सोबतच वीणा, व्हायोलीन, बासरी, पियानो या वाद्यावर त्यांची हुकुमत होती. अतिशय प्रतिभावान आणि गुणी संगीतकार असलेले सज्जाद हुसेन हे मुळात अतिशय फटकळ रागीट आणि समोरच्याचा तिथल्या तिथे पाण उतारा करणारे संगीतकार म्हणून खूप (कु) प्रसिद्ध होते. काळाशी जुळवून घेणं त्यांना कधी जमलंच नाही. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असा प्रकार झाला.
================================
हे देखील वाचा : Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!
=================================
समोरच्याचा पाण उतारा करताना ते काहीही भीड राखत नसत. लता मंगेशकर यांना एकदा रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांनी “लताजी ठीक तरह से गायी ये हे नौशाद का गाना नही है मेरा गाना है!” असं जाहीर म्हटलं होतं. अर्थात त्यांच्या रागीटपणाच्या काही दंतकथा देखील त्या काळात प्रसिद्ध झाल्या होत्या. मग तलत मेहमूदला गलत मेहमूद संबोधणे असो किंवा किशोर कुमारला शोर कुमार अशी संभावना करणारे विधान असो… यात तथ्याचा भाग किती हे माहित नाही पण या माणसाने आयुष्यभर तडजोड अजिबात स्वीकारलेली नाही. आपल्या मनाला येईल तसे तो वागला. त्यामुळे खरंतर त्यांचेच खूप मोठे व्यवसाय खूप नुकसान झालं. पण याची त्यांना पर्वा नव्हती. असं म्हणतात के असिफ ‘मुगल ए आझम’ चे संगीत सज्जाद कडेच देणार होते पण फटकळ स्वभावाने संधी हिरावली. सज्जाद हुसेन गाजलेली गाणी बरीच आहेत. आज मेरे नसीब ने मुझे रुला दिया (हलचल),बदनाम मुहोब्बत कौन करे (दोस्त), दिल में समा गये सजन, ये हवा ये रात ये चांदनी (संगदिल), ये कैसी अजब दास्तान हो गई है,फिर तुम्हारी याद आई ओ सनम ओ सनम (रुस्तुम सोहराब)

आता येऊन मूळ किस्याकडे. १९५२ साली सज्जाद हुसेन यांनी दिलीप कुमार मधुबाला यांच्या ‘संगदील’ या चित्रपटाला सांगितले होते. या चित्रपटात तलत मेहमूद यांनी एक गीत गायले होते. हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं होतं. या गाण्यांमध्ये मेंडोलीन, सितार आणि सारंगी याचा अतिशय सुंदर वापर केला होता. ‘ये हवा ये रात ये चांदनी तेरी एक अदा पे निसार है…’ हेच ते गाणं होतं. तलतच्या मधाळ स्वरात हे गाणं अतिशय अप्रतिम बनलं होतं. या गाण्याला त्या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सज्ज्जाद यांचे स्वत:चे ते लाडके गीत होते. याच गाण्याला कॉपी करत संगीतकार मदन मोहन यांनी १९५८ साली ‘आखरी दाव’ या चित्रपटात मोहम्मद रफीच्या स्वरात यात चालीवरील एक गाणं गाऊन घेतलं.

गीताचे बोल होते ‘तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है…’ गाण्याच मीटर सेम होतम. हे गाणे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. हे गाणे जेव्हा लोकप्रिय झालं आणि सज्जाद हुसेन यांच्या कानावर गेले त्यावेळेला ते भयंकर चिडले! आपल्या गाण्याची सही सही कॉपी करून कोणी लोकप्रियता मिळवत आहे हे त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी त्याबद्दल जाहीर बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले ,” आजकाल तो हमारी परछांईयां भी चलने लगी है…” नंतर काही दिवसांनी एका कार्यक्रमांमध्ये त्यांची संगीतकार मदन मोहन यांची गाठ पडली.
=================================
हे देखील वाचा : Shamshad Begum : ऑडीशनला गेली आणि बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन करून आली!
=================================
त्यांनी सरळ मदन मोहनला चार चौघांमध्ये या गाण्याबद्दल जाब विचारला आणि “माझे गाणे तू कसे कॉपी केलेस? हे कॉपी करताना तुला काहीच कसे वाटले नाही? मुळात तुझी हिम्मत कशी झाली?” यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांनी सांगितलं,”सज्जाद साहेब मी तुमच्या या गाण्याच्या प्रेमात पडलो होतो मला या गाण्याची ट्यून खूप आवडली. मला तुमच्या पेक्षा मोठा संगीतकार कुणी दिसलाच नाही की ज्याचं गाणं कॉपी करावं. माझ्याकडून अपराध झाला आहे पण गुरूच्या एका चांगल्या रचनेचा मी माझ्या संगीतात वापर केला याचा मला आनंद आहे!” मदन मोहन यांचे उद्गार ऐकून सज्जाद हुसेन यांचे काहीसे समाधान झाले आणि ते शांत झाले. मदन मोहन यांनी पुढे प्रत्येक वेळी या गाण्याचा उल्लेख करताना सज्जाद हुसेन यांच्या गाण्यावरून प्रेरणा घेऊन मी ही चाल बनवली याचा आवर्जून उल्लेख ते करत होते!