Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Ramayana Movie : ७ ऑस्कर पुरस्कार जिंकणारे नमित मल्होत्रा आहेत तरी कोण?
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रामायण (Ramayana) चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आलीच… उत्कृष्ट ग्राफीक्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रेक्षकांना नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा हजारोवर्ष मागे नेणार आहेत.. रामायण हा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देताना आपली संस्कृती पुरेपुर जपण्याचा प्रयत्न देखील हे दोन मेकर्स करतील सा अंदा सध्या तरी आला आहे… ऑस्कर विजेते डेंग व्हिएफएक्स स्टुडिओ, प्राइम फोकस स्टुडिओ आणि अभिनेता यश याच्या मॉन्स्टर माईंड क्रिएशन यांची एकत्रित भव्य कलाकृती असणाऱ्या रामायण चित्रपटाचा भरभक्कम पिलर नमित मल्होत्रा आहे तरी कोण?(Bollywood News)

तर, चित्रपट निर्माते नरेश मल्होत्रा यांचे चिरंजीव आणि सिनेमॅटोग्राफर एमएन मल्होत्रा यांचे नातू आहेत नमित मल्होत्रा… विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या रंगीत चित्रपटांपैकी एक चित्रपट ‘झांसी की रानी’ (१९५३) यात एमएन मल्होत्रा यांनी काम केलं होतं. त्यामुळे घरातूनच नमित यांना सिनेमॅटिक वारसा लाभला आहे. नमित यांचा जन्म मुंबईचा…वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी कॉम्प्युटर ग्राफिक्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर वडिलांच्या गॅरेजमध्ये ‘व्हिडिओ वर्कशॉप’ नावाचा एक एडिटिंग स्टूडिओ सुरू केला.हा स्टुडिओ उभारण्यात त्यांच्या ३ ग्राफिक्स शिक्षकांचा हातभार होता. कालांतराने, नमित यांनी ‘व्हिडिओ वर्कशॉप’ हा स्टुडिओ त्यांच्या वडिलांच्या ‘व्हिडिओ वर्क्स या कंपनीत विलीन केला.वडिलांची व्हिडिओ वर्क्स ही कंपनी त्याकाळी चित्रपटांसाठी लागणारी उपकरणं भाड्यानं देण्याचा व्यवसाय करत होती.(Entertainment Tadaka)

नमित यांनी नंतर २०१४ मध्ये नव्या प्राइम फोकस वर्ल्ड या कंपनीला लंडनमधील व्हिज्युअल इफेक्ट्स स्टूडियो डबल नेगेटीव्ह कंपनीसोबत मर्ज केलं. यानंतर या कंपनीचं नाव DNEG असं केलं गेलं. नमित मल्होत्रा हे DNEG चे सीईओ असून याच कंपनीनं सर्वोकृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स विभागात आतापर्यंत ७ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. इंसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’, ‘एक्स मशीना’, ‘ब्लेड रनर 2049’, ‘फर्स्ट मॅन’, ‘टेनेट’ आणि ‘ड्यून’ या ७ चित्रपटांसाठी नमित यांच्या कंपनीला ऑस्कर मिळाले आहेत… त्यामुळे नक्कीच ऑस्कर प्राप्त टॅक्नोलॉजी संस्था ‘रामायण’ चित्रपटाच्या पाठीशी उभी असेल तर नक्कीच एक अद्भूत अनुभव प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे…(Bollywood And Hollywood News)
================================
हे देखील वाचा: Jarann : अमृता-अनिताच्या चित्रपटाने २४ दिवसांत केला रेकॉर्ड; कमावले ‘इतके’ कोटी!
=================================
दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, काजल अग्रवाल, विवेक ऑबरॉय, रकूलप्रीत सिंग, आदिनाथ कोठारे, अजिंक्य देव अशी भली मोठी स्टारकास्ट असणार आहे… २०२६ आणि २०२७च्या दिवाळीत रामायण चित्रपटाचे दोन्ही भाग प्रदर्शित होणार आहेत…(Ramayana movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi