‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

अमीषा पटेलने Akshaye Khanna सोबत डेब्यू का नाकारला होता?
एकूणच सध्याची बॉलिवूड इंडस्ट्री पाहता ९०च्या दशकाती कलाकार आजच्या नवोदित कलाकारांवर भारी पडत आहेत… म्हणजे ‘धुरंधर’चंच (Dhurandhar) उदाहरण घेतलं तर चित्रपटाचा हिरो रणवीर सिंग असूनही चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जून रामपाल, आर माधवन आणि संजय दत्त यांनी कल्लाच केला आहे… तर, दुसरीकडे ‘मिसेस देशपांडे’ या सीरीमधून माधुरी दिक्षीतने (Madhuri Dixit) खतरनाक कमबॅक केलं आहे… एकीकडे ९०च्या दशकातील कलाकार दमदार कमबॅक करत असताना दुसरीकडे जरा त्यांच्या डेब्यु चित्रपटांकडेही एक नजर टाकूयात…
१९९७ मध्ये अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रटात त्याची नायिका अंजाला झवेरी. पण तुम्हाला माहित आहे का त्याची नायिका कदाचित एक वेगळीच अभिनेत्री असती जिने नंतर ह्रतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) धमाकेदार एन्ट्री केली होती… कोण होती ती अभिनेत्री आणि तिने अक्षय खन्नासोबत डेब्यु करायला का नकार दिला होता जाणून घेऊयात…

तर, विनोद खन्ना (Vinod Khanna) यांनी ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून मुलगा अक्षय खन्ना याला लॉंन्च केलं… आणि त्याच्यासोबत अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) हिचा देखील लॉंन्च करण्याची त्याने ऑफर दिली होती… पण तिने या भूमिकेसाठी स्पष्टपणे नकार दिला होता… नुकत्याच एका मुलाखतीत तिनं यामागचे कारण उघड केले. अमीषा म्हणाली की, “जेव्हा मला ‘हिमालय पुत्र’ची (Himalaya Putra) ऑफर मिळाली, तेव्हा मी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होते. मी तेव्हा खूप लहान होते आणि चित्रपटांमध्ये फारसा रस नव्हता. माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावर आणि पुस्तकांवर होतं. मी अभ्यासू मुलगी होते, त्यामुळे माझ्या पालकांनी आणि मी अभ्यासाला प्राधान्य देत हा चित्रपट नाकारला.”

महत्वाचं म्हणजे स्वतः विनोद खन्ना यांनी या चित्रपटासाठी अमीषा पटेलशी संपर्क साधला होता. त्यांना अक्षयसोबत अमीषाला लॉन्च करायचे होते. बॉलिवूडचा इतका मोठा सुपरस्टार स्वतःहून विचारणा करत असला तरी अमीषानं ऑफर नाकारल्यामुळे इंडस्ट्रीतील लोकांच्या भूनय्या उंचावल्या होत्या, परंतु त्यावेळी तिने आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिलं होतं हे देखील तितकंच महत्वाचं होतं… त्यानंतर ३ वर्षांनी म्हणजेच २००० मध्ये ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) चित्रपटात ह्रतिक रोशनच्या अपोझिट भूमिका साकारत अमीषाने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं… (Vinod Khanna and Amisha Patel)

दरम्यान, सध्या अक्षय खन्नाची सगळीकडे चर्चा आहे… त्याचं कमबॅक लोकांनी उचलून धरलं आहे… यावर अमीषा पटेलने देखील त्याचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली की, “लोकं म्हणतात अक्षय रातोरात स्टार झाला, पण हे रातोरात मिळालेलं यश नाही. ही त्याची ३० वर्षांची मेहनत आहे. त्याने कधीही PR चा आधार घेतला नाही, उलट त्याने फक्त त्याच्या अभिनयानं सर्वांना उत्तर दिलं आहे.” (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!
================================
कलांतराने अमीषा पटेलने जाऊन अक्षय खन्नासोबत ‘हमराज’ आणि ‘आप की खातिर’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.. तसेच, सध्या Animal चित्रपटातून बॉबी देओलने केलेलं कमबॅक आणि ‘छावा’ व ‘धुरंधर’मुळे अक्षय खन्नाने केलेला कमबॅक विशेष चर्चेत अक्षय खन्ना, बॉबी देओल आणि अमीषा पटेल यांना एकत्र घेत ‘हमराज २’ बनवावा अशी मागणी सोशल मिडियावर लोकं करत आहेत… आता प्रेक्षकांच्या मागणीला यश येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Amisha Patel Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi