Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गुलजार आपल्या वडलांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित नव्हते?

 गुलजार आपल्या वडलांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित नव्हते?
बात पुरानी बडी सुहानी

गुलजार आपल्या वडलांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित नव्हते?

by धनंजय कुलकर्णी 30/07/2024

ख्यातनाम दिग्दर्शक गीतकार गुलजार (Gulzar) यांना सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावे लागले होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची काव्याची आवड खूप होती. पण या गोष्टी तुम्हाला दोन वेळचं अन्न देऊ शकत नाही याची जाणीव त्यांना होती. म्हणून मुंबईला आल्यावर ते सुरुवातीच्या काळात ते चक्क एका गॅरेजमध्ये काम करत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे काम करावं लागत होते. अर्थात कुठलाही काळ कधीच टिकून राहत नाही. त्यांच्या प्रतिभेला साजेसं काम त्यांना लवकरच मिळाले.

गुलजार यांना चित्रपटात गाणी लिहिण्याची संधी गीतकार शेलेन्द्र यांच्यामुळे मिळाली आणि त्यांना हवी असलेली वाट सापडली! बिमल रॉय यांना गुलजार यांचे काम एवढे आवडले की त्यांनी गुलजार यांना आपले सहाय्यक म्हणून ठेवून घेतले. गुलजार (Gulzar) यांनी या हाती आलेल्या सुवर्ण संधीचा उपयोग करून घेतला. बिमल दा यांच्याकडून त्यांनी चित्रपटाच्या सर्व बारकाव्यांच्या अभ्यास केला. पदोपदी त्यांचे मार्गदर्शन घेतले.

याच काळात १९६१ साली गुलजार यांच्या वडिलांचे दिल्लीत निधन झाले. घरच्या सर्वांना गुलजार (Gulzar) मुंबईमध्ये करत असलेल्या कष्टाची जाणीव होती. त्यांचा संघर्ष घरच्यांना माहिती होता. त्यामुळे त्यांनी गुलजार यांना वडिलांच्या निधनाची बातमी कळवलीच नाही. घरच्यांना वाटले आता तर याला कुठे काम मिळाले आहे आणि त्यात पुन्हा जर त्यांना बोलावून घेतले तर हाती असलेले काम देखील त्यांच्या हातातून निघून जाईल ! परिस्थिती माणसाला किती बेबस करून टाकते पहा! गुलजार यांना आपल्या वडलांच्या निधनाची बातमी कळवलीच गेली नाही. गुलजार यांचे मोठे बंधू दिल्लीला गेले आणि वडिलांचे सर्व क्रियाकर्म करून टाकले. गुलजार मात्र या सर्व बातमीपासून अनभिज्ञच राहिले.

साधारणता दोन महिन्यानंतर त्यांच्या दिल्लीतील एका मित्राकडून त्यांना ही दुःखद वार्ता कळाली. त्यांना खूप वाईट वाटले. वडिलांच्या अंत्यविधीला आपण उपस्थित राहू शकलो नाही ही सल त्यांच्या मनामध्ये टोचत राहिली. आधी घरच्यांचा राग ही आला. पण त्याच वेळी त्यांनी हा देखील विचार केला आहे की घरच्यांनी आपल्या बाबत योग्यच विचार केला होता जर आपण तिकडे गेलो असतो तर आपल्या हातातली काम निघून गेले असते तर? म्हणून ते त्यांच्या दृष्टीने बरोबर होते. तरी मनामध्ये एक टोचणी होतीच वडिलांचे शेवटच्या दिवसात आपण त्यांची सेवा करू शकणार नाही, ते गेल्यानंतर त्यांचे कुठलेही कार्य आपण करू शकलो नाही, त्यांचे अंत्यदर्शन नाही घेवू शकलो!

गुलजार यांना बिमल दा यांनी या काळात खूप सांभाळून घेतले. गुलजार आता बिमल रॉय यांच्यामध्येच आपल्या वडिलांना पाहत होते. बिमलदा ‘बंदिनी’ नंतर नव्या चित्रपटाच्या तयारीला लागले पण आता तब्येत साथ देत नव्हती. गुलजार (Gulzar) त्यांची हर प्रकारे सेवा करत होते. अक्षरश: त्यांच्या मुलाची भूमिका ते करत होते. ते रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत. दवाखान्यात त्यांच्यासोबत जात.

==========

हे देखील वाचा : ए आर रहमान यांचा पहिला हिंदी सिनेमा: रंगीला

==========

त्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक ‘अमृत कुंभ’ वाचून दाखवत. त्यांच्याशी गप्पा मारत. ८ जानेवारी १९६६ या दिवशी बिमल दा यांचे निधन झाले. गुलजार (Gulzar) यांनी अंत्यविधी आणि इतर कार्यात बिमल दा यांच्या कुटुंबीयांसोबत होते आणि यांच्या मृत्यूनंतरच्या सर्व क्रिया कर्म करताना आपल्या वडिलांचे देखील क्रिया कर्म त्यांनी पुन्हा केली पाच वर्षानंतर त्यांनी आपल्या वडिलांसाठी पिंडदान केले. गुलजार म्हणतात, ”पाच वर्ष मी ज्या तणावाखाली वावरात होतो तो ताण आता संपला होता.” पत्रकार झिया उस सलाम यांनी त्यांच्या ‘हाउसफुल: द गोल्डन एज ऑफ हिंदी सिनेमा’ या पुस्तकात ही भावस्पर्शी आठवण सांगितली आहे.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor bimal roy Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Gulzar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.