Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Genelia Deshmukh : लग्नानंतर १० वर्ष अभिनयापासून दूर का होती?
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडचं बबली कपल… दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा फॅन फॉलोईंग बेस तयार करुन जिनिलियाने बॉलिवूड आणि मराठी प्रेक्षकांनाही वेड लावलं… जिनिलियाने बऱ्याच वर्षांनी हिंदीत कमबॅक केलं असून सध्या आमिर खान याच्या सितारे जमीन पर या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे… १२ वर्ष खरं तर जिनिलिया चित्रपटांपासून लांब होती.. याचं खरं कारण आता तिनेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे…

२००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटापासून जिनिलिया डिसोझा हिचा बॉलिवूडमधला अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता… याच चित्रपटावेळी रितेश देशमुखसोबत प्रेमाचे धागे घट्ट होत गेले आणि इंडस्ट्रीला भेटली जिनिलिय देशमुख.. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तेलुगु, तमिळ चित्रपटांमध्ये जिनिलिया कामं करत होती… मात्र, करिअरच्या शिखरावर असताना रितेशशी लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटांमधून ती गायब का झाली या तिच्या चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं आता तिनेच उत्तर दिलं आहे.

२०२२ मध्ये जिनिलियाने बॉलिवूड हंगामाशी याविषयी खुलासा केला होता. यावेळी जिनिलिया म्हणाली होती की, “गेली १० वर्ष मी गृहिणी म्हणून जबाबदारी निभावली. मी बाकी काही काम केलं नाही. मी नात्यांची जबाबदारी सांभाळत होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर तेच माझं आयुष्य होतं. गृहिणी होणं ही खूप कठीण गोष्ट आहे.” अशाप्रकारे जिनिलियाने लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला आणि कुटुंबाकडे लक्ष दिलं. तरीही जिनिलिया जशी संधी मिळेल तशी मराठी चित्रपटांत कॅमिओ करताना दिसली होती. मग तो माऊली चित्रपट असो किंवा मग वेड मध्ये मुख भूमिका असो.. तिने आपल्यातील अभिनय कायमच जपला..
================================
हे देखील वाचा: ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
=================================
दरम्यान, आता तब्बल १० वर्षांनंतर प्रमुख भूमिका म्हणून आमिर खान याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात ती दिसली असून हा चित्रपट २० जून २०२५ रोजी रिलीज झाला आहे…हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असून तारे जमीन पर या चित्रपटाचा दुसरा भाग आहे… या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. तसेच, इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यावर आमिर – जिनिलीया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi