दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेता गोविंदाला ऑफिसमध्ये कुणी आणि का कोंडून ठेवले होते?
ऐंशीच्या दशकामध्ये रुपेरी पडद्यावर आलेला अभिनेता गोविंदा(Govinda Story) नंतर प्रचंड लोकप्रिय झाला परंतु सुरुवातीला त्याला फार मोठा स्ट्रगल करावा लागला होता. त्याची पार्श्वभूमी जरी सिनेमाची असली तरी त्याला त्याचा काही एक उपयोग झाला नाही. गोविंदाला अक्षरशः या स्टुडिओतून त्या स्टुडिओ अशा चकरा माराव्या लागल्या. कुठेच काम होत नव्हते. पण मनात जिद्द होती; एक दिवस पडद्यावर चमकण्याची! त्या जिद्दीवरच तो महिनोन्महिने मायानगरीत अक्षर भटकत होता. २१ डिसेंबर १९६३ या दिवशी गोविंदाचा जन्म झाला. त्याचे आई-वडील सिनेमाशी संलग्न होते पण त्याच्या वडिलांनी सिनेमामध्ये खूप मोठे अपयश पाहिले होते. या अपयशाने त्यांचे संपूर्ण कुटुंब जणू आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाले होते. त्यांना त्यांचा कार्टर रोड वरील बंगला विकावा लागला होता आणि दूर विरारला शिफ्ट व्हावे लागले होते. अशा परिस्थितीतच गोविंदाचा(Govinda Story) जन्म झाला होता. वर्तक कॉलेज मधून त्याने कॉमर्सची डिग्री घेतली पण गोविंदाचे चित्रपटातच काम करायचे हे पहिल्यापासूनच स्वप्न होतं. मिथुन चक्रवर्तीचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘त्याच्यासारखाच व्हायचं’ असं त्यांना मनोमन ठरवले होते. त्यासाठी त्याचा संघर्ष चालू होता.
त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रवेशाचा किस्सा खूपच इमोशनल असा आहे. एकदा आपले फोटो घेऊन गोविंदा (Govinda Story)प्राणलाल मेहता यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी मेहता ‘लव 86’ या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. मुख्य भूमिकेमध्ये महेंद्र कपूर यांचा मुलगा रोहन कपूर होता. दुसऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांचा शोध चालू होता. ज्यावेळी गोविंदाला ही बातमी कळाली तो ताबडतोब मेहरा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला परंतु तोवर ऑफिस बंद झाले होते आणि वॉचमनने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले. त्याप्रमाणे गोविंदा दुस(Govinda Story)ऱ्या दिवशी मेहरा यांच्या ऑफिसमध्ये हजर झाला. आता ऑफिस ओपन होते परंतु मेहरा साहेब तिथे उपस्थित नव्हते. तिथे केवळ ऑफिस बॉय अशोक उपस्थित होता. मेहरा साहेब ऑफिसच्या जवळच राहत होते. गोविंदाने विनवण्याकरून अशोकला समजावून सांगितले,” कृपया मेहरा साहेबांना फोन करून सांगा मी त्यांना भेटायला आलो आहे.” परंतु ऑफिस बॉय असल्यामुळे तो त्यांना थेट फोन करायला घाबरत होता आणि तो गोविंदाला पुन्हा दुसऱ्या दिवशी यायला सांगत होता. गोविंदा रडकुंडीला आला होता आणि तो सारखा ऑफिस बॉय अशोकला विनंती करत होता.
========
हे देखील वाचा : हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी
========
गोविंदाची दया येऊन अशोक त्याला म्हणाला,” तू इथेच थांब. मी मेहरा साहेबांना सांगून येतो.” परंतु लगेच त्याच्या डोक्यात वेगळीच शंका आली. तो म्हणाला,” तू ऑफिसच्या बाहेर थांब.” त्यावर गोविंदा म्हणाला,” मी काही चोर नाही. मी इथे चोरी करायला आलो नाही. मी इथे काम मागायला आलो आहे. तुला जर याचीच भीती वाटत असेल तर तू ऑफिसला बाहेरून कुलूप लाव आणि मेहरा साहेबांना जाऊन सांग. मी आत थांबतो.” ही आयडिया ऑफिस बॉय अशोकला पटली. त्याने गोविंदाला ऑफिसमध्ये बंद केले आणि बाहेरून कुलूप लावून तो मेहरांच्या घरी गेला. योगायोगाने मेहरा साहेब घरी उपलब्ध होते. त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ देखील तिथे आले होते. ऑफिस बॉय अशोकने सर्व प्रसंग त्यांना सांगितला. मेहरा यांनी कपाळाला हात लावून घेतला आणि म्हणाले ,” अरे असे काय केले तू?” म्हणून ते अशोकला रागावले आणि त्याला गाडीत घालून इस्माईल श्रॉफ सोबत ते तडक ऑफिसवर आले. अशोकने पुढे येऊन कुलूप उघडले. गोविंदा(Govinda Story) आत तसाच उभा होता. तो खाली खुर्चीवर बसला देखील नव्हता.
इस्माईल श्रॉफ आणि प्राणलाल मेहरा हे गोविंदाकडे पाहत राहिले. त्याची काम वरची श्रद्धा पाहून ते दोघे अवाक झाले. त्यांनी त्याची स्क्रीन टेस्ट घेतली आणि अशा प्रकारे गोविंदाचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. सिनेमा फ्लॉप झाला पण गोविंदा क्लिक झाला. त्यानंतर गोविंदाच्या(Govinda Story) चित्रपटांची मोठी रांगच लागली. पण गोविंदाने ऑफिस बॉय अशोकजी जाणीव ठेवली. नंतर त्याने अशोकला आपल्या सोबत ठेवून घेतले!
धनंजय कुलकर्णी