Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

Yere Yere Paisa 3 : ५ करोड आणि विनोदाचा ब्लास्ट, टीझरमध्ये आहे तरी काय?
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये या ‘ये रे ये रे पैसा’ (Yere Yere Paisa) चित्रपट आला होता आणि त्याच्या दुसऱ्या भागानेही धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘ये रे ये रे पैसा 3’ (Yere Yere Paisa 3 ) १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. (Marathi film update)
‘ये रे ये रे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसतं की, बबली, सनी आणि आदित्य यांना पैशांनी भरलेली एक बॅग सापडते ज्यात ५ करोड रुपये असतात. आता ती बॅग कुणाची आहे? त्या पैश्यांचं काय होणार? हे आता लवकरच ‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये उलडगणार आहे. महत्वाचं म्हणजे तिसऱ्यांही भागात संजय नार्वेकर अर्थात अण्णा यांचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. हास्याचा धमाका उडवून देणाऱ्या ये रे ये रे पैसा ३ मध्ये पाच कोटींचा काय घोळ असणार आणि नवा ट्विस्ट काय असेल ते आता चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. (Film teaser)

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन्स मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटाच्या आधीच्या दोन भागांना मिळालेलं यश तिसऱ्याही भागाला मिळावं हीच अपेक्षा.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात की,” ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपट माझ्यासाठी केवळ एक सिक्वेल नाही, तर प्रेक्षकांचे प्रेम आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे चित्रपटाचा तिसरा भागही त्याच तोडीचा असावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल, याची मला खात्री आहे. हा धमाकेदार चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत तयार राहावे.” (Marathi upcoming film)
===========================
हे देखील वाचा: उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्यारवाली लव्हस्टोरी
===========================
‘ये रे ये रे पैसा ३’ सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्यासह संजय नार्वेकर विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून संजय जाधव चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ जुलै २०२५ रोजी ये रे ये रे पैसा ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Entertainment update)