‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Jhund चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्याची निर्घृण हत्या
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे… नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Zhund Movie) चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेता प्रियांशु क्षत्रिय अर्थात चित्रपटातील बाबू छत्री याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरमध्ये त्याचा खुन करण्यात आला असून अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता…(Nagraj Manjule movie)

अधिक माहितीनुसार, एका गुन्हेगाराने किरकोळ वादातून प्रियांशुची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.. त्याचे हातपाय बांधुन हत्या करण्यात आली असून अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना प्रियांशु आढळला होता.
================================
हे देखील वाचा : मराठी ‘झुंड’ चालतेय पुढे….
=================================
दरम्यान, प्रियांशुच्या मृत्यु या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात असून या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयित ध्रुवकुमार लालबहादूर साहू हा उत्तर नागपुरातील नारा परिसरात राहणारा आहे… (Marathi Entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi