‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सूर डी. एस.पी.चे…
देवी श्री प्रसाद या तेलगू आणि तामिळ चित्रपटातील प्रसिद्ध संगितकाराचा 2 ऑगस्ट रोजी वाढदिवस. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी या गायक आणि संगितकाराने अनेक पुरस्कार आपल्या खात्यात जमा केले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत डीएसपी हे खूप मानाचे नाव आहे. एक जादूई संगीतकार म्हणजे डीएसपी…देवी श्री प्रसाद…डीएसपी किंवा रॉकस्टार म्हणून देवी श्री प्रसाद या संगीतकाराची ओळख आहे. वय अवघं 40…पण या संगीतकाराच्या खात्यात फिल्मफेअर, आयफा असे मानाचे अनेक पुरस्कार जमा आहेत. डीएसपी म्हणजे तामिळ आणि तेलगू चित्रपटांतील हुकमी नाणे आहे.
देवी श्री प्रसाद यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांचे वडील सत्यानंद हे शिक्षक होते. शिवाय त्यांना लेखनाची आवडही होती. शाळेत असतांनाच देवी यांचा संगीताकडे ओढा जास्त होता. शाळेत नृत्य आणि गाण्याच्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये देवी यांनी अनेक बक्षिसे जिंकली आहेत. नीकोसम या 1999 मध्ये आलेल्या चित्रपटापासून देवी यांनी टॉलिवूडच्या संगित विश्वात पदार्पण केलं. देवी प्रख्यात संगीतकार यू. श्रीनिवास यांचे शिष्य आहेत. श्रीनिवास यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. आपल्या गुरुप्रमाणेच देवी यांनी पहिल्याच चित्रपटात आपल्या संगीतची छाप पाडली. त्यानंतर संगीतकार, गीतकार, गायक म्हणून ते तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम करु लागले. देवी हे किती लोकप्रिय आहेत याचा अंदाज त्यांना मिळणा-या पुरस्कारावरुन लागतो. आतापर्यंत त्यांनी नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार, आयफा पुरस्कार यांचाही समावेश आहे. देवी यांनी कुमारी 21एफ या चित्रपटात संगीत, आवाज दिलाच आहे. शिवाय यातील गाण्यांचे नृत्यदिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
मल्टी टॅलेंटेड असणारे देवी जेवढे लोकप्रिय तेवढेच नम्र म्हणून टॉलिवूडमध्ये ओळखले जातात. लाखो फॅन असलेला हा गायक स्वतः इलाईराजा यांचा चाहता आहे. त्यांची अनेक गाणी सूपरहीट गाण्याच्या टॉपटेन लिस्टमध्ये अनेक महिने राहीली आहेत. त्यात 2018 मध्ये आलेल्या रंगस्थलम या तेलगू चित्रपटांतील गाण्यांनी तर कमालच केली आहे. या चित्रपटातील गाणी म्हणजे ग्रामिण वाद्य संगीताचा अपूर्व मेळ आहे. अत्यंत श्रवणीय असलेली ही गाणी अनेक महिने टॉपटेन गाण्यांच्या यादीत होती. एकापेक्षा एक सरस असलेली रंगस्थलमची गाणी अगदी नाचायला लावणारी. गाण्यांमधील बोल समजत नाहीत. पण यातील संगीताच्या जोरावर भाषेचा अडसर आपोआप दूर होतो. याशिवाय सूपर मची, रिंगा रिंगा, डॅडी मम्मी, छोटी छोटी बातें ही देवी यांची गाजलेली गाणी आहेत. देवी यांनी देवी, वसमी, वर्षम, बारीश, थिरुपची, बन्ना, आरु, समथिंग समथिंग, राखी, शेखर दादा जिंदाबाद, तुलसी, नाना वसंथम, जलसा, रेडी, संगमा, किंग, रंगमास्थलम, महर्षी, चित्रलहरी, सॅमी, सॅमी 2, एमसीए, डेंजरस जानबाज, जय लव कुश, पुल्ली अशा अनेक गाजलेल्या तेलगू आणि तामिळ चित्रपटांना संगित दिले आहे.
देवी श्री प्रसाद हे पारंपारिक आणि पाश्चात्य संगीतातही माहीर आहेत. वयाच्या अवघ्या 41 वर्षात अनेक पुरस्कार आपल्या खात्यात त्यांनी जमा केले आहेत. त्यांचा हा संगीत प्रवाह त्यांच्या वयाबरोबरच वृद्धींगत होवो, हिच सदिच्छा…
सई बने…