बॉलिवूडचे हे १० लोकप्रिय चित्रपट आहेत हॉलिवूड चित्रपटांचे ‘अनऑफिशिअल रिमेक’
सामान्यतः चित्रपटाच्या यशाची चर्चा होते पण सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ती लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या अपयशाची. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच सोशल मीडियावर या चित्रपटाविरोधात ‘बॉयकॉट’ ट्रेंड सुरु झाला होता. प्रेक्षकांनी जाणीवपूर्वक या चित्रपटावर बहिष्कार घातल्याचा चर्चा सध्या रंगल्या आहेत, तर काही समीक्षकांच्या मते ‘बॉयकॉट’ ट्रेंडमुळे नाही, तर चित्रपटातच दम नसल्यामुळे तो फ्लॉप गेला आहे. असो. जे काही असेल ते असेल, पण हा चित्रपट या वर्षीचा आत्तापर्यंतचा ‘बिगेस्ट फ्लॉप’ चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट फॉरेस्ट गंप (Forest Gump) या चित्रपटाचा ऑफिशिअल म्हणजे अधिकृत रिमेक आहे. पण बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहेत, जे हॉलिवूडच्या चित्रपटांचे ‘अनऑफिशिअल रिमेक’ आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी (Unofficial remakes of International movies) –
१. जो जीता वही सिकंदर
१९९२ साली आलेला मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ हा चित्रपट दोन कॉलेजेस आणि त्यामधील दोन ग्रुप्स यांच्यामध्ये असणाऱ्या सायकल रेसिंग स्पर्धेवर आधारित आहे. हा चित्रपट १९७९ मध्ये आलेल्या ‘ब्रेकिंग अवे’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित असल्याचं बोललं जातं. या चित्रपटात आमिर खान, आयेशा झुल्का, दीपक तिजोरी, इ कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
२. बाजीगर
बाजीगर हा चित्रपट ‘ए किस बिफोर डायिंग’ या १९९१ सालच्या थ्रिलरपटावर आधारित होता. ‘ए किस बिफोर डायिंग’ हा चित्रपट इरा लेविन यांच्या कादंबरीवर आधारित होता. हा चित्रपट ‘सुपरफ्लॉप’ ठरला होता. तसंच समीक्षकांनी या चित्रपटावर भरपूर टीकाही केली होती. त्याउलट त्याचा अनधिकृत हिंदी रिमेक असणाऱ्या बाझीगर चित्रपटाने मात्र चांगलं यश मिळवलं.
३. मैं खिलाडी तू अनाडी
समीर मलकान दिग्दर्शित १९९४ सालचा ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा चित्रपट आठवतोय का? हा चित्रपट विशेष लक्षात राहिला तो ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यामुळे. चित्रपटात सैफ अली खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, राजेश्वरी, कादर खान, शक्ती कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९९१ सालच्या ‘द हार्ड वे’चा अनधिकृत रिमेक आहे. (Unofficial remakes of International movies)
४. राझ (Raaz)
विक्रम भट्ट दिग्दर्शित २००२ साली प्रदर्शित झालेला हा हॉरर चित्रपट हॉलिवूडच्या ‘व्हॉट लाइज बिनेथ (What Lies Beneath)’ चित्रपटाचा ‘अनऑफिशिअल रिमेक’ आहे. या चित्रपटात बिपाशा बसू आणि दिनो मोरिया मुख्य भूमिकेत आहेत. एका मुलाखतीत दिनो मोरिया याने सांगितलं होतं, “राझ हा चित्रपट साइन करण्याआधी मी ‘व्हॉट लाइज बिनेथ’ पाहिला होता. कथेचा प्लॉट आणि त्यामधील काही प्रसंग जवळपास सारखेच होते.
५. काँटे
२००२ साली आलेला संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काँटे’ हा चित्रपट ‘रिझर्व्हॉयर डॉग्स’ या चित्रपटावरून प्रेरित होता. या दोन्ही चित्रपटांमधील बहुतांश प्रसंग सारखेच होते. काँटे चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, महेश मांजरेकर, सुनील शेट्टी, लकी अली, कुमार गौरव इशा, कोपीकर, मालिका अरोरा आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. (Unofficial remakes of International movies
====
हे देखील वाचा – छोटी जाहिरात पाहून पाऊल टाकलं अन् ‘प्रतिभा’ बहरत गेली
====
६. ब्लॅक
संजय लीला भन्साळीचा दिग्दर्शित २००५ सालचा हा चित्रपट एक कलात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट केलरचे आत्मचरित्र आणि त्यावर आधारित १९६२ सालच्या ‘द मिरॅकल वर्कर’ या चित्रपटावरून प्रेरित होता. (Unofficial remakes of International movies)
७. डू नॉट डिस्टर्ब
सुष्मिता सेन, रितेश देशमुख आणि गोविंदा अभिनीत, २००९ साली आलेला डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘डू नॉट डिस्टर्ब’ हा विनोदी चित्रपट २००६ साली आलेला फ्रेंच चित्रपट ‘द व्हॅलेट’ या चित्रपटावरून प्रेरित होता.
८. सलाम-ए-इश्क
२००७ सालचा निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘सलाम-ए-इश्क’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘लव्ह ॲक्च्युली’ या, चित्रपटावरून प्रेरित होता. या चित्रपटात सलमान खान, गोविंदा, अनिल कपूर, जुही चावला, अक्षय खन्ना, विद्या बालन महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
९. पार्टनर
डेव्हिड धवन दिग्दर्शित २००७ साली आलेला हा चित्रपट ‘हिच’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. ही गोष्ट डेव्हिड धवन यांनी स्वतः स्पष्ट केली होती. या चित्रपटात गोविंदा, सलमान खान, लारा दत्ता, कटरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. (Unofficial remakes of International movies)
====
हे देखील वाचा – चार दिवस सासूचे: या मालिकेचं नाव चक्क ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात आलं..
====
१०. जय हो
सोहेल खान दिग्दर्शित २०१४ सालचा ‘जय हो’ हा चित्रपट ‘पे इट फॉरवर्ड’ या हॉलिवूडच्या चित्रपटापासून प्रेरित आहे. या चित्रपटात सलमान खान, तब्बू, डेसी शहा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.