Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

IFFI 2025 मध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला!
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अर्थात IFFI ची सगळेच सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहात असतात… आता लवकरच ५६वा इफ्फी महोत्सव सुरु होणार असून यंदा इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये मराठी चित्रपटांची वर्णी लागली आहे.. जागतिक स्तरावर मराठी चित्रपटांचं कौतुक कायम केलं जातंच आणि त्यात हा फिल्म फेस्टिवल आणखी एक महत्वाची पायरी प्रत्येक मेकर्ससाठी असते… चला तर जाणून घेऊयात कोणत्या मराठी चित्रपटांनी इफ्फीत झेप घेतली आहे… (International Film Festival of India 2025)

तर, ५६व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये ‘गोंधळ’, ‘आता थांबायचं नाय’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’, ‘दृश्य अदृश्य’ हे चार चित्रपट झळकणार आहेत… विशेष म्हणजे जगभरातील २०० हून अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले आणि प्रदर्शित होणार आहेत… शिवाय, फिल्मी इंडस्ट्रीत ५० वर्षांचा यशस्वी पुर्ण करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांचा देखील विशेष सत्कार केला जाणार आहे…(Marathi films 2025)
================================
हे देखील वाचा : Shraddha Kapoor हिचं हॉलिवूडमध्ये पदार्पण!
================================
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत ‘इफ्फी’चा उद्घाटनपूर्व कार्यक्रम संपन्न झाला.. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, यंदा महोत्सवात १३ चित्रपटांचे जागतिक प्रीमियर, ४ आंतरराष्ट्रीय प्रीमियर, ४६ आशियाई प्रीमियर यांच्यासोबतच ८१ देशांचे २४० हून अधिक चित्रपट रिलीज केले जाणार आहेत… तसेच, ‘इफ्फी’मध्ये यंदा वेब आणि स्ट्रीमिंग कंटेंटसाठी ओटीटी पुरस्कार दिले जाणार आहेत.. त्यामुळे जगभरातील विविध भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांचा अनुभव घेण्यासाठी चित्रपटप्रेमी सज्ज झाले आहेत… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi