Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?

 बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
कलाकृती विशेष

बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?

by Team KalakrutiMedia 21/06/2022

बॉलिवुडध्ये मराठी कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मराठी कलाकारांना तिथे फारशी चांगली वागणूक मिळत नाही. अनेक कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसंच ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सारख्या चित्रपटातूनही ही गोष्ट अधोरेखितही करण्यात आली होती. पण आता हळूहळू काळ बदलतोय. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलिवूडची काळी बाजू लोकांसमोर आली आणि त्यानंतर अनेक संदर्भ बदलू लागले. (Where are these Marathi Actresses Now?)

अर्थात बॉलिवूडवर काही मराठी नायिकांनी आपली जबरदस्त छाप सोडली आहे. एक अख्ख दशक बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित ही मराठी होती. तसंच सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रींनीही बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. 

याआधी ९० च्या दशकात वर्ष उसगावकर व अश्विनी यांनीही बलिवूडमध्ये नशीब आजमावायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण पूर्वी नंदा, नूतन, तनुजा, पद्मिनी कोल्हापुरे, स्मिता पाटील यासारख्या अभिनेत्रींनी मात्र आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. पण काही मराठमोळ्या अभिनेत्री बॉलिवूडच्या स्पर्धेत टिकाव धरू शकल्या नाहीत. इतकंच काय तर त्या आता कुठे आहेत, याबद्दलही लोकांना फारशी माहिती नाही. आज आपण अशाच अभिनेत्रींनबद्दल माहिती घेऊया – 

१. शिल्पा शिरोडकर 

९० च्या दशकात शिल्पा शिरोडकर बॉलिवूडमध्ये आली. सुरुवातीला तिला अत्यंत चांगल्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. तिच्या कारकिर्दीत तिने अनिल कपूर, अक्षय कुमार, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती अशा कलाकारांसोबत काम केलं आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र तिचे बहुतांश चित्रपट फारशी कमल दाखवू शकले नाहीत. आणि जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले त्यांचा तिला फारसा फायदा झाला नाही. तसंच या काळात ती बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली गेली. (Where are these Marathi Actresses Now?)

शिल्पा शिरोडकर 

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल संपत नाही म्हटल्यावर २००० साली यूकेस्थित बँकर अपरेश रणजीतशी लग्न करून ती लंडनला निघून गेली. २०१३ साली ती ‘एक मुठ्ठी आसमान’ या मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर ‘ये सिलसिला है प्यार का’ (२०१६) आणि ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ (२०१७-१८) या मालिकांमधून तिने भूमिका साकारल्या. पण सिनेसृष्टीपासून ती दूरच राहिली. शिल्पाला अनुष्का नावाची मुलगी असून ती आता १९ वर्षांची आहे.

२. ममता कुलकर्णी 

‘तिरंगा’ सारख्या सुपरहिट चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये आलेली ममता कुलकर्णी तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त इतर गोष्टींमुळेच चर्चेत राहिली. मग तो ‘स्टारडस्ट’ मासिकाच्या कव्हरवरचा टॉपलेस फोटो असो किंवा अंडरवर्ल्डशी असणारे संबंध. क्रांतिवीर, आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है, बाजी, इ चांगले चित्रपट तिच्या वाट्याला आले होते. इंडस्ट्रीमध्ये ती चांगली स्थिरस्थावर होऊ शकली असती. परंतु आधी टॉपलेस फोटो शूट, मग इस्लाम धर्माचा स्वीकार त्यांनतर ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीसोबतचं अफेअर या साऱ्याचा तिच्या कारकिर्दीवर विपरीत परिणाम झाला. (Where are these Marathi Actresses Now?)

ममता कुलकर्णी 

विकी गोस्वामीशी लग्न करून ती केनियामध्ये स्थायिक झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. परंतु २०१४ साली पोलिसांनी विकी गोस्वामी आणि ममता दोघांनाही अटक केल्याच्याही बातम्या आल्या त्यानंतर मात्र ममताबद्दल विशेष असं काही ऐकिवात आलं नाही. 

टाइम्स ऑफ इंडियामधील आर्टिकलनुसार ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये असून तिने केनियास्थित भारतीय वंशाचा व्यावसायिक उरू पटेल सोबत प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे. यामध्ये असंही म्हटलं आहे की, ममताने तिचे नाव बदललं असून तिची ओळख पटवणंही कठीण आहे. (Where are these Marathi Actresses Now?)

========

हे देखील वाचा – इटलीमध्ये सोनालीचे पैंजण हरवले तेव्हा तिला मिळाला एक सुखद धक्का 

========

३. अंतरा माळी 

रामगोपाल वर्मा कॅम्पमधून बॉलिवूडमध्ये अवतरलेली अंतरा माळी मस्त, कंपनी, रोड, डरना मना है, गायब यासारख्या चित्रपटांमधून झळकळी होती. २०१० सालच्या ‘अँड वन्स अगेन’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र ती स्वतःच कुठेतरी ‘गायब’ झाली आहे. 

प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांची मुलगी असणारी अंतरा माळी सध्या आपल्या संसारात रमली आहे. २००९ साली  तिने GQ मासिकाचे संपादक ‘चे कुरियन (Che Kurrien)’ यांच्याशी लग्न केले. तिची मुलगी आता १० वर्षांची असून अंतरा सध्या सिनेसृष्टी आणि प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणंच पसंत करते. (Where are these Marathi Actresses Now?)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Antara Mali Bollywood Celebrity Celebrity News Entertainment Mamta Kulkarni shilpa shirodkar
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.