दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कल्पनेपलीकडल्या जगाचा आरसा दाखवणाऱ्या टॉप 5 Sci-Fi वेबसिरिज
नुकताच प्रदर्शित झालेला दोबारा हा चित्रपट साय – फाय (Sci-Fi – Science Fiction) या प्रकारातला होता. या प्रकारामध्ये अशा काही गोष्टी दाखवल्या जातात ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या असतात. सायन्सने कितीही प्रगती केली तरी या गोष्टींचं गूढ आजवर उकललेलं नाही. कदाचित त्यामुळेच या गोष्टींबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. जगातील अशाच काही अनाकलनीय गोष्टींवर आधारित काही चित्रपट आणि वेबसिरीजही बनल्या आहेत. आजच्या भागात आपण हिंदीमध्ये तयार करण्यात आलेल्या टॉप 5 साय – फाय वेबसिरिजबद्दल माहिती घेऊया (Top 5 Sci-Fi Web series)-
१. डिटेक्टिव्ह बुमराह (Detective Boomrah)
ऑडियो फॉरमॅट मध्ये सुपरहिट झालेल्या ‘डिटेक्टिव्ह बुमराह’ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजच्या स्वरूपात आणण्यात आलं आहे. विचित्र घटनांचा शोध घेणाऱ्या डिटेक्टिव्ह बुमराहच्या शोधांचा प्रवास यामध्ये बघायला मिळेल.
सिरीजमध्ये सुधांशू राय, राघव झिंगरान, अभिषेक सोनपालिया प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज MX प्लेअरवर फ्री मध्ये बघता येईल. IMDB वर या सीरिजला ८.४ रेटिंग देण्यात आलं आहे.
२. जेएल 50 (JL 50)
जेएल 50 (JL 50) ही वेबसिरीज टाइम ट्रॅव्हलच्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. एक ३५ वर्षांपूर्वी विमानतळावरून उड्डाण घेऊन गायब झालेलं विमान क्रॅश होऊन पश्चिम बंगालमध्ये कोसळतं. यानंतर एकामागून एक गूढ गोष्टी समोर येतात. सिरीजबद्दल जास्त काही लिहिलं तर स्पॉईलर ठरेल.
सिरीजमध्ये अभय देओल मुख्य भूमिकेत असून रितिका आनंद, पंकज कपूर, अमृता चट्टोपाध्याय,पियुष मिश्रा, राजेश शर्मा आदी कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. या सीरिजचे एकूण ५ भाग असून सिरीज सोनी Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. IMDB वर या सीरिजला ७.४ रेटिंग देण्यात आलं आहे.
३. पॅरलल (Parallel)
श्रुती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांनी दुखी असते. ती ज्या इमारतीमध्ये राहत असते त्या इमारतीमधील ११ वा मजला ‘पॅरलल युनिव्हर्स’ म्हणजेच ‘समांतर आयाम’मध्ये जाण्याचा रस्ता असतो. श्रुती या मजल्यावरून तिथे जाते आणि बघते तिथलं आयुष्य अगदी परिपूर्ण आयुष्य आहे. ते पाहून तिच्या मनातही तसंच आयुष्य जगायची जिद्द निर्माण होते. पुढे काय होतं हे मात्र सिरीजमध्येच पाहा.
सिरीजमध्ये आलयना दत्ता, अमन जैन, अमन मिश्रा, अन्नू दयाल, साक्षी सिंग, शुमन दास या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिरीज MX प्लेअर वर उपलब्ध असून एकदम फ्रि मध्ये बघता येईल. IMDB वर या सीरिजला ६.७ रेटिंग देण्यात आलं आहे.
४. A.I.SHA माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड (A.I.SHA – My Virtual Girlfriend)
A.I.SHA ही स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची कहाणी आहे. पण.. ही स्त्री सामान्य स्त्री नसून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिम्युलेटेड ह्यूमनॉइड असिस्टंट (A.I.SHA) असते. यापेक्षा अधिक काही सांगितलं तर स्पॉईलर ठरेल. सिरीज पूर्णपणे रहस्यमय सिरीज आहे.
सिरीजमध्ये ऑरित्रा घोष, रघु राम, निमिषा मेहता, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज MX प्लेअरवर उपलब्ध असून एकदम फ्री मध्ये बघता येईल. IMDB वर या सीरिजला ७.४ रेटिंग देण्यात आलं आहे. (Top 5 Sci-Fi Web series)
५. स्काय फायर (SkyFire)
एका झोपडपट्टीतील एक मुलगा गायब होतो. परंतु त्याचा शोध घेत असताना एक इतिहासकार आणि एका पत्रकाराला नैसर्गिक आपत्तीच्या आणि अन्य विचित्र, वरवर असंबंधित भासणाऱ्या घटनांची चाहूल लागते. इतिहासकाराचा आणि पत्रकाराचा या प्रकाराशी नक्की काय संबंध असतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिरीज बघावी लागेल.
सिरीजमध्ये सोनल चौहान, जतीन गोस्वामी, अमित कुमार, प्रतीक बब्बर, जिशू सेनगुप्ता, डेन्झिल स्मिथ आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सिरीजचे एकूण ८ भाग असून सिरीज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. IMDB वर या सीरिजला ५.२ रेटिंग देण्यात आलं आहे. (Top 5 Sci-Fi Web series)
६. पबगोवा (PubGoa)
‘पबगोवा’ ही एक तामिळ वेबसिरीज असूनही या यादीमध्ये एक बोनस म्हणून समाविष्ट केली आहे कारण अत्यंत वेगळ्या विषयावरची ही वेबसिरीज म्हणजे साय-फाय प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.
============
हे ही वाचा: ‘हे’ मराठी चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं ‘असं’ कृत्य की त्याचा त्यांना झाला पश्चात्ताप
============
या सिरीजमध्ये समांतरपणे चालणाऱ्या दोन वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. एक कथा एका महिला पोलिसाची आहे जी गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या नवीन वर्षाच्या रेव्ह पार्टीमध्ये झालेल्या रक्तपात करणाऱ्या गोळीबाराचा तपास करत आहे, तर दुसरी कथा एका माणसाची आहे जो या गोळीबारातून बचावतो आणि नंतर आपल्या हरवलेल्या प्रेयसीचा शोध घेत असतो.
या सिरीजमध्ये संपत राम, देव, विमला रमण, लिओ शिवदास, अन्नय्या सारा, आयरा इ. कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ही वेबसिरीज झी 5 वर इंग्लिश सबटायटलसह पाहता येईल. IMDB वर या सीरिजला ७.९ रेटिंग देण्यात आलं आहे.