‘जिलबी’१७ जानेवारीला भेटीला;प्रसाद ओक स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे पहिल्यांदाच एकत्र!
2023ला कोणती फिल्म इंडस्ट्री आपले वर्चस्व गाजवणार?
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील (Tollywood) छुपे युद्ध सुरु होते. बॉक्स ऑफीसवर कोण बाजी मारणार याची चढाओढ चालू असायची. ब-याचवेळा दाक्षिणात्य चित्रपटांची कथा हिंदीमध्ये पुन्हा यायची आणि तो चित्रपट सुपरहिट लेबल लावून चालायचा. मात्र गेल्या दोन-चार वर्षात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. दाक्षिणात्य चित्रपटांनी (Tollywood) भाषेचा टप्पा ओलांडला. हिंदीमध्येही तमिळ, तेलगू, कन्नड चित्रपट डब होऊन यायला लागले आणि या युद्धाचे चित्र पलटले. त्यातच बॉलिवूडमधील अनेक कच्चेधागे प्रेक्षकांसमोर यायला लागले, तिचतिच कथा. संगिताचा एकच ढाचा…साचेबद्ध दिग्दर्शन आदी सर्वांमुळे बॉलिवूडचा प्रेक्षकवर्ग टॉलिवूडकडे (Tollywood) वळला गेला. गेल्या दोन वर्षात तर बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनाही घरी बसायला लागलं आहे. मात्र या नव्या वर्षातून बॉलिवूडला अनेक आशा आहेत. येणा-या वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांकडे (Tollywood) वळलेला हिंदीचा प्रेक्षकवर्ग पुन्हा हिंदी चित्रपटांकडे परत येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती.पण आगामी दाक्षिणात्य चित्रपटांची यादी पाहिली तर ही शक्यता फार क्वचित असेल. कारण या नव्या वर्षात पुष्पा पासून ती ऐश्वर्या आणि मणिरत्नमच्या ps 2 पासून अनेक चित्रपटांची यादी प्रदर्शित झाली आहे. या टॉलिवूडच्या (Tollywood) चित्रपटांची प्रतीक्षा हिंदीमध्येही करण्यात येत आहे. त्यामुळे हे 2023 वर्ष ही बॉलिवूडसाठी कठीण आणि टॉलिवूडसाठी छप्पर तोड कमाईचे असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बॉक्स ऑफिसवर 2023 मध्ये धमाकेदार असे किमान दहा दाक्षिणात्य बिगबजेट चित्रपट येत आहेत. पुष्पा 2, पीएस 2 ते कमल हसनच्या भारतीय ने सुद्धा उत्सुकता वाढवली आहे. या 10 आगामी दक्षिण चित्रपटांचे 2023 मध्ये बॉक्स ऑफीसवर वर्चस्व राहील अशी शक्यता चित्रपट समिक्षकांनी व्यक्त केली आहे.
2022 मध्ये KGF 2, आरआरआर, PS 1 सारख्या चित्रपटांनी बंपर कमाईसह जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली. आता याच चित्रपटांचे पुढचे भाग 2023 मध्ये येत आहेत. या चित्रपटांची कथा, भव्यदिव्य सेट आणि दाक्षिणात्य अक्शनसीन यामुळे प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटांमध्ये पहिला नंबर आहे तो थुनिवू या अजितकुमारच्या चित्रपटाचा. अजित कुमार, मंजू वारियरच्या ‘थुनिवू’ या प्रसिद्ध चित्रपटाची प्रतीक्षा आहे. एच विनोद दिग्दर्शित हा चित्रपट 11 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातून अजित कुमार पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत असणार आहे. ‘थुनिवू’ आणि थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्नाचा ‘वारीसु’ या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफीसवर स्पर्धा रंगणार आहे. ‘वरिसु’ हा वामसी पैडिपल्ली दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. यात थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. याबरोबर शाम, प्रभू, आर. सरथकुमार आणि प्रकाश राज हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘वारीसू’ हा सिनेमा 12 जानेवारीला पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट एनटीआर हा चित्रपटही प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे. आरआरआर नंतर ज्युनियर एनटीआरचा हा बिगबजेट चित्रपट असणार आहे.
सुपस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ चीही खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट 2023 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात शिवा राजकुमार, वसंत रवी, योगी बाबू, रम्या कृष्णन आणि विनायकन सहाय्यक भूमिकेत आहेत. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिती मारन निर्मित नेल्सनचे दिग्दर्शन दिलीप कुमार यांनी केले आहे. रजनीकांत यांचा हा 169 वा चित्रपट आहे. ‘जेलर’ 14 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रजनीकांत यांचा फॅनक्लब बघता हा जेलर सुपरहिट होणार हे सांगण्याची गरज नाही. मणिरत्नमच्या PS 1 ने 2022 साली बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली. आता या चित्रपटाच्या पुढील भागाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय, विक्रम, त्रिशा, शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र PS च्या दुस-या भागात ऐश्वर्या रायची दुहेरी भूमिका आणि त्या भूमिके भोवती असलेले गूढ जाणण्याची उत्सुकता आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
प्रभास स्टारर चित्रपट ‘सालार’ हा देखील वर्ष 2023 मधील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. या चित्रपटात श्रुती हासन आणि जगपती बाबू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्यापडद्यावर दाखल होणार आहे. प्रभासला गेल्या वर्षात फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या या सालारपासून खूप अपेक्षा आहेत.
=======
हे देखील वाचा : 2022 च्या बॉक्स ऑफीसवर बॉलिवूडपेक्षा टॉलिवूडचं वर्चस्व!
=======
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. 2023 च्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान पुष्पा-2 चित्रपटगृहात दाखल होईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटामध्ये रश्मिका च्या ऐवजी दुसरी अभिनेत्री असल्याचीही चर्चा आहे. आर. चंद्रू दिग्दर्शित ‘कब्जा’ हा अॅक्शन चित्रपटही यावर्षी प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटात उपेंद्रसोबतच सुदीपा, श्रिया सरन, कबीर दुहान सिंग आणि कोटा श्रीनिवास राव हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एका प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाभोवती फिरते, जो 1960 ते 1984 या काळात स्वातंत्र्यपूर्व भारतात अंडरवर्ल्डचा राजा बनतो. (Tollywood)
जेष्ठ अभिनेते कमल हासनच्या 1996 मध्ये आलेल्या ‘इंडियन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुस-या भागाची चर्चा सुरु आहे. एस शंकर दिग्दर्शित या अॅक्शन चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कमल हासन व्यतिरिक्त काजल अग्रवाल, गुलशन ग्रोवर, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर, समुथिराकणी, बॉबी सिम्हा, गुरु सोमसुंदरम, दिल्ली गणेश, जयप्रकाश आणि वेनेला किशोर हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट सप्टेंबर 2023 पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी आदिपुरुष हा एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. ‘आदिपुरुष’च्या टीझरवरून बराच वाद झाला होता. या चित्रपटात प्रभास राम, सैफ अली खान रावण आणि क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापेक्षा बॉयकॉट मोहीमे मुळेच अधिक गाजला आणि तसाच वाद त्याच्या प्रदर्शनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. एकूण ही दाक्षिणात्य चित्रपटांची यादी बघितली तर हे वर्षही बॉक्स ऑफीसवर कोणाचा दबदबा राहणार याची कल्पना येते.
सई बने