Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

 माणसाने माणसाशी माणसासम वागणे
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

by गणेश आचवाल 14/05/2020

ज्या प्रार्थनेच्या बाबतीत हे घडले, ती प्रार्थना म्हणजे ‘उबुंटू’ चित्रपटातील प्रार्थना. पुष्कर श्रोत्री हा अभिनेता ‘उबुंटू’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत होता. या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी कौशल इनामदार यांच्यावर सोपवण्यात आली होती. पुष्कर कौशलला म्हणाला,” या चित्रपटासाठी एक प्रार्थना करायची आहे. शाळेतील मुले प्रार्थना म्हणत आहेत, असा प्रसंग आहे. “गीतलेखन समीर सामंत करणार होते. कौशल, पुष्कर आणि समीर सामंत यांच्यात गप्पा सुरु झाल्या. कौशल समीर सामंत यांना म्हणाला की आधी शब्द लिही, मग मला चाल करायला आवडेल. पुष्करने समीरला सांगितले होते की “प्रार्थनेचे शब्द सोपे हवेत आणि त्यात एखाद्या विशिष्ट देवाचा उल्लेख नको. “गप्पा सुरु असताना समीरला शब्द सुचले, “हीच
आमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे”. शब्द खूपच उत्तम होते. ज्यावेळी प्रार्थना संगीतबद्ध करायची असे ठरले, तेव्हा कौशलने संगीतकार
या नात्याने काय विचार केला हे सांगताना कौशल म्हणाला, “मुळात प्रार्थना म्हटले की त्यात भाव आला तो नम्रतेचा. या दोन ओळीत ‘हीच’ आणि ‘हेच’ अशी शब्दांची पुनरावृत्ती होती. शब्द खूप साधे आणि सोपे होते. इथे संगीतकार म्हणून मी प्रार्थनेतील समर्पणाचा भाव लक्षात घेतला. मी
अनेक चित्रपटातील प्रार्थना  यापूर्वी ऐकल्या होत्या. मग ती उंबरठा मधील ‘गगन सदन तेजोमय’ असेल किंवा ‘अंकुश’ या  हिंदी चित्रपटातील  ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’ ही प्रार्थना असेल. प्रार्थनेला चाल देताना तिथे एखादा संगीतकार कमी दिसला पाहिजे आणि

  • अजित परब
  • मुग्धा वैशंपायन

ज्या व्यक्तिरेखेवर ते गीत चित्रित होत आहे, त्या व्यक्तिरेखा, ती पात्रे दिसली पाहिजेत. तिथे  संगीतकाराचा अहंगंड बाजूला ठेवून पूर्ण महत्व हे शब्द आणि व्यक्तिरेखांना द्यायला हवे. हे समर्पण प्रार्थनेत महत्वाचे आहे. प्रार्थना म्हणणारी मुले शाळेत आहेत, त्यांच्या मनातील, चेहऱ्यावरील निरागसता या भावना सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. कौशलला ही चाल सुद्धा अगदी पटकन सुचली होती. कौशल, पुष्कर आणि समीर यांच्या गप्पातून एक अतिशय उत्तम प्रार्थना रचली गेली. एखादी सोपी चाल करणे हे अधिक कठीण असते, आव्हानात्मक असते, असेही कौशल सांगतो. चालीची गंगोत्री शोधणे कठीण असते आणि आतापर्यंत ज्या प्रार्थना ऐकलेल्या असतात, त्या ऐकण्याचे संस्कार सुद्धा संगीतकाराच्या चालीतून दिसत असतात, हे सुद्धा तो म्हणाला. ‘उबुंटू’ चित्रपटातील ही प्रार्थना अजित परब आणि मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांनी गायली आहे. अनेक शाळेत आणि विद्यापीठात हे अधिकृत प्रार्थनागीत म्हणूनही वापरले जात आहे. मुख्य म्हणजे करोनाच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सुद्धा ही प्रार्थना काही ठिकाणी ऐकवली गेली, असे म्हणतात.

  • 2
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 2
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Movie Marathi songs music Musician
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.