‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
शुजित सरकार यांचे नाव आले की हिट चित्रपटांची नावं समोर येतात…
गुलाबो सिताबो चा ट्रेलर पाहिलात का मंडळी. अमिताभसाठी नक्की बघा. या चित्रपटात अमिताभला सर्व बुढाओ म्हणतात. पण या बुढाओचा अभिनय ट्रेलरमध्येच एवढा भारी वाटतोय की, त्यासाठी पूर्ण चित्रपट बघण्याची उत्सुकता लागली आहे. बीग बी अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांच्या गुलाबो सिताबो चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. शुजित सरकार या हिट दिग्दर्शकाच्या या चित्रपटाची खूप उत्सुकता होती. पण कोरोनाचा फटका या गुलाबोलाही बसला आणि एप्रिल, मे अशी वारी करत आता हा चित्रपट 12 जून रोजी रिलीज होत आहे. Amazon प्राइमवर 200 पेक्षा अधिक देशात हा चित्रपट बघता येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन त्याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. त्यात अमिताभचा भारी लूक आणि अभिनय. आणि जोडीला आयुष्मान खुराना त्यामुळे गुलाबो सिताबो हिट होणार हे नक्की…
या चित्रपटाचं शूट झालंय लखनऊ मध्ये एक म्हातारा आणि त्याचा तरुण भाडेकरु यांची तू तू मैं मैं या चित्रपटात आहे. एका जुन्या पुराण्या हवेलीमध्ये रहाणारा म्हातारा थोडा विक्षिप्तच दिसतो. मोठंलं नाक, पाठीत आलेलं पोक आणि डोक्यावर कायम असलेला रुमाल. या म्हाता-या मालकानं एक भाडेकरु ठेवला आहे. नेहमीसारखा भाडेकरु. म्हणजे भाडे थकवणारा, मग हा म्हातारा या भाडेकरुने लावलेले बल्ब गपचूप चोरतो आणि विकतो हा भाडेकरु भिंत तोडतो हा म्हातारा त्याची हवेली विकण्याचा प्रयत्न करतो. या दोघांच्या भांडणात पूराणवास्तू खात्याचे अधिकारी येतात. हवेलीमध्ये खजिना असल्याचा त्यांचा दावा असतो. खडूस म्हातारा आणि त्याचा तेवढाच बेरकी भाडेकरु यांच्या साथीला मिडीया ही सर्व मजेदार भेळ बघायची असेल तर गुलाबो सिताबो बघायलाच हवा…
खरतर गुलाबो सिताबो हा कठपुतलीचा प्रकार. गुलाबो खूब लड़े है सिताबो खूब लड़े है.. म्हणत हा कठपुतलीचा नाच सुरु होतो. मग समजातल्या चांगल्या वाईट गोष्टींची गुंफण या कठपुतलीच्या नृत्यात करण्यात येते. हा धागाच या चित्रपटात पकडण्यात आला आहे. जुही चतुर्वेदी यांची ही कथा आहे. तर रोनी लाहिरी आणि शील कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी चित्रपट रंगतदार केला आहे. अमिताभ यामध्ये प्रकाश नाथ द्विवेदी उर्फ गुलाबो तर आयुष्मान खुराणा सुनील कुमार शुक्ला उर्फ सिताबो च्या भूमिकेत असतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुजित सरकार यांचे दिग्दर्शन. शुजित यांचे नाव आले की एकामागोएक अशी हिट चित्रपटांची नावं समोर येतात. विकी डोनर, मद्रास कॅफे, पिकू, पिंक यातून शुजित सरकार यांनी स्वतःची वेगळी छाप बॉलिवूडवर पाडली आहे. शुजित हे स्वतंत्र विचारसरणीचे दिग्दर्शक… यहां या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. जिम्मी शेरगील, मनिषा लांबा यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. जिम्मी शेरगील आर्मी ऑफीसर तर मनिषा काश्मिरी मुलगी. या दोघांची प्रेमकथा. ‘कभी कभी आसपास चॉंद रहेता है’, हे गुलजार यांच्या लेखणीतून आलेलं अप्रतिम गाणं याच चित्रपटामधील. या चित्रपटासाठी स्टार स्क्रीन तर्फे बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार शुजित यांना मिळाला. त्यानंतर आला आयुष्मान खुराना चा विकी डोनर, मग जॉन अब्रहाम सोबत मद्रास कॅफे, दिपीका पादूकोण आणि अमिताभ बच्चनसह पिकू. शुजित सावकार यांचा प्रत्येक चित्रपट हटके असतो. आता हा गुलाबो सिताबो ही याच रांगेतील. अर्थात त्यासाठी आपल्याला 12 जून पर्यंत वाट पहावी लागेल….