‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
कोकीलाबेन आणि रॅप
कल मेरी साडीपर ज्युस गिरा था…
और में दुबारा नहाने गयी थी…
तम चने कुकरमें चढाकर मेरे पास आई थी
तब रसोडेंमे कौन था…
हॉं कौन था…
मै थी… तुम थी… कौन था…
सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही.सध्या कोकिलाबेनचा रसोडें मे कौन था. हा प्रश्न असाच व्हायरल झाला आहे. याला निमित्त झालं ते यशराज मुखाते या हौशी संगीतकारानं रचलेलं एक रॅप सॉंग.यशराजनं हे गाणं रिलीज केलं आणि काही क्षणात लाखाच्या वर त्याला व्हूज मिळाले.अगदी टिव्हीवर होणा-या राजकीय वाद वजा चर्चांमध्येही या गाण्याचा उल्लेख झाला.आहे की नाही कमाल.
छोट्या पडद्यावरील साथ निभाना साथियॉं, ही मालिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या मालिकेचं नाव आलं की पहिली आठवण होते ती कोकिलाबेन आणि गोपी या सासू-सुनेच्या जोडीची. 3 मे 2010 पासून ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली.
23 जुलै 2017 पर्यंत या मालिकेनं छोट्या पडद्यावर आपला दबदबा ठेवला. सर्वात लांबलचक चाललेल्या मालिकांमध्ये या मालिकेचा उल्लेख होतो. राजकोट मध्ये राहणा-या मोदी कुटुंबांची कथा या मालिकेत होती. अहम आणि जिगर ही या कुटुंबातील दोन मुलं,त्यांच्या पत्नी, राशी आणि गोपी आणि या सुनांना कुटुंबाच्या परंपरा शिकवतांना आपल्या तालावर नाचवणारी सासू, कोकिलाबेन मोदी. मोठी टिकली, भरजरी साडी, भरपूर दागिने, मोठ्या डोळ्यात काजळ भरलेली कोकिलाबेन म्हणजे मोदी कुंटुंबातील सर्वेसर्वा कोकिलाबेननं, गोपी बहू राशी असा आवाज दिला की समजावं या दोघींची चांगलीच झाडाझडती होणार याच झाडाझडतीवर यशराज मुखाते यांनी एक अफलातून गाणं बनवलं रातोरात या गाण्याला प्रसिद्धि मिळाली.
या मालिकेत कोकिलाबेनची भूमिका रुपल पटेल यांनी केली आहे. तर गोपी बहू म्हणून जीया मेनक आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी काम केले. राशीच्या भूमिकेत रुचा हसबनीस या अभिनेत्रंनं काम केलं आहे. या सर्व कलाकारांनाही या गाण्यामुळे पुन्हा नव्यानं प्रसिद्धी मिळाली आहे.
खुद्द कोकिलाबेनने म्हणजेच अभिनेत्री रुपल पटेल यांनाही हे गाणं म्हणजे आर्श्चयाचा धक्का होतं. त्याना प्रथम आपण असं काही गाणं म्हटलं का हा प्रश्न पडला होता. पण नंतर यशराजनं आपलेच संवाद वापरुन हे गाणं तयार केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या गाण्यामुळं कोकिलाबेन हे पात्र पुन्हा प्रसिद्ध झालं. त्यामुळं रुपल यांनी यशराजचा नंबर शोधून काढला आणि त्याला फोन करुन त्याचे आभार मानले.
गोपी बहूची भूमिका करणारी जीया मेनकही या गाण्यांमुळं खूष झाली आहे. मालिका संपली की कलाकारांना प्रेक्षक विसरतात…मात्र या गाण्यांनं पुन्हा प्रसिद्धी मिळाल्यानं जीया खूष आहे.
हे रॅप गाणं एवढं लोकप्रिय झालं की त्याची उल्लेख टीव्हीवरील राजकीय चर्चा वजा वादविवादांमध्येही झाला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एका चर्चेत या गाण्याचा उल्लेख केला…आता बोला.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनीसुद्धा यशराजचा हा व्हिडीओ शेअर केला. बॉलिवूडनंही या यशराजच्या कोकिलाबेन गाण्याला पसंती दिली आहे. अभिनेता राजकुमार रावनं यशराजचं कौतुक केलं आहे.
या गाण्यावरुन आता अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. यशराजने याधीही बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचे रिक्रिएशन केले आहे. त्यामध्ये उरी- द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातील हाऊज द जोश या गाण्याचाही समावेश आहे.
इंस्टाग्रामवर या गाण्याला तीन मिलियन व्हूज मिळाले आहेत. यशराजच्या फॉलोअरची संख्या अचानक वाढल्यामुळे त्यालाही आनंद झालाय. स्वतः यशराज मुखाते हा इंजिनिअर आहे. त्याला संगीताची आवड आहे आणि तो उत्तम गायकही आहे.
औरंगाबाद येथे त्याने म्युझिक स्टुडिओ बनवला असून तिथेच तो त्याचे गाण्याचे व्हिडोओ तयार करतो. कोकिलाबेन आणि तिच्या गोपीबहूचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला दोन दिवस लागले. पण आता त्याला मिळणा-या लोकप्रियतेनं तो चांगलाच भारावून गेला आहे.