‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एका मराठी माणसाने धर्मेंद्रला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.
आयुष्याच्या वळणावर एखाद्या छॊट्या व्यक्तीने केलेली मदत देखील भाग्योदय करून टाकणारी असते. अभिनेता धर्मेंद्र च्या बाबतीतला हा किस्सा आहे आणि एका मराठी कलाकाराने त्याला मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला. १९६०सालच्या ’दिल भी तेरा हम भी तेरे’ पासून अभिनयाची यात्रा चालू झाली. रमेश सैगल यांच्या ’शोला और शबनम’ (१९६१) चं शूटींग चालू होतं. धर्मेंद्र आता मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळेल का हे शोधत होता. त्याच वेळी त्याला बिमल रॉय त्यांच्या आगामी ’बंदिनी’ करीता एका नव्या चेहर्याकच्या शोधात आहेत असे समजले.तो तडक बिमलदा यांना जावून भेटला. बिमलदांनी त्याचं काम अजून पाहिलं नव्हतं.त्यांनी धर्मेंद्रला ’तू सध्या काम करीत असलेल्या सिनेमाचे काही सीन्स आणून दाखव ते काम बघून मगच मला विचार करता येईल’ असं सांगितले. धरम रमेश सैगलकडे गेला व शूट झालेल्या एक दोन रिळांची मागणी केली. त्या वेळी रमेश सैगल भडकले ते म्हणाले बिमलदा कितीही मोठे असले तरी मी कुणी ऐरागैरा नाही. सिनेमा इंडस्ट्रीत माझीही एक पोझिशन आहे. माझ्या अंडर प्रॉडक्शन सिनेमाची रिळे मी कुणालाही दाखवत नाही. देणार तर मुळीच नाही! झालं…धर्मेंद्र निराश झाला. रडकुंडीला आला. आता बिमलदांना काय दाखवायचे? कुठेतरी आशेचा एक किरण दिसत होता तो देखील लुप्तझाला. दु:खी मनाने तो स्टुडिओच्या बाहेर पडत असताना एक हात त्याच्या पाठीवर पडला. तो हात रमेश सैगलच्या ’शोला और शबनम’ चे संकलक अनंत आपटे याचा होता. तो धरमला म्हणाला तू अजिबात काळजी करू नको. मी संकलक असल्याने सर्व रिळे माझ्या ताब्यात असतात. त्यातली काही रिळे कुणालाही कळू न देता मी तुला देतो. ती तू बिमलदांना दाखव. असं म्हणत त्याने ती रिळं गुपचूप पणे धरमला दिली. बिमलदांनी बघितली आणि..
रेस्ट इज हिस्ट्री! हा अनंत आपटे म्हणजे मराठी सिनेमात तोतरे बोलून हसविणाऱ्या मधू आपटेचा भाऊ होता.
त्या अर्थाने अनंत आपटे धरमचा भाग्यविधाता ठरला!
-धनंजय कुलकर्णी