Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दि गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी मधील थॅनॉसची मुलगी… गमोराचा आज वाढदिवस.

 दि गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी मधील थॅनॉसची मुलगी… गमोराचा आज वाढदिवस.
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

दि गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी मधील थॅनॉसची मुलगी… गमोराचा आज वाढदिवस.

by सई बने 19/06/2020

जोई सालदाना…. हॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री… एक उत्तम अभिनेत्री आणि तेवढीच उत्तम बॅले डान्सर… जोईनं आत्तापर्यंत चाळीसहून अधिक हॉलिवूडपटात काम केलं आहे. जोईचं वैशिष्ट म्हणजे तिने केलेल्या भुमिका विज्ञानावर आधारीत चित्रपटातील भूमिका आहेत. तिने स्टार ट्रेक आणि अवतारमध्ये केलेल्या भुमिकांमुळे जोईच्या चाहत्यांच्या संख्येत लाखोंची भर पडली आहे. कधी आपल्याला हिरव्या रंगाच्या आवरणात तर कधी निळ्या रंगात रंगून घेणारी जोई आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेते… अर्थात त्यामुळेच तिला हॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे.

जोई चा जन्म 19 जून 1978 रोजी अमेरिकेतील एका प्रांतात झाला. दोन बहिणी आणि एक भाऊ असलेल्या जोईच्या वडिलांचे ती नऊ वर्षाची असतांना एका अपघातात निधन झाले. त्यानंतर जोईच्या आईनं आपल्या मुलांना मोठ्या हिमतीनं वाढवलं. वडिलांपासून दुरावलेली जोई बॅले नृत्यामध्ये रमली. तिच्यासाठी तिची आई रोल मॉडेल होती. उंच आणि शिडशिडीत बांध्याची जोई बॅले नृत्यामध्ये निपुण झाली. ती स्टेजप्रोग्रॅमही करत असे. यातूनच तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. तिला लॉ अॅण्ड ऑर्डर या मालिकेत काम मिळालं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2000 साली जोईला सेंटर स्टेज हा चित्रपट मिळाला. त्यात जोईनं एवा रोड्रिग्ज या बॅले डान्स शिकणा-या विद्यार्थिनीची भूमिका केली आहे. त्यानंतर जोईला काही हॉलिवूड चित्रपटात भूमिका मिळाल्या. तिचा 2009 साली अवतार हा चित्रपट आला. जेम्स कॅमरॉन हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक. टायटॅनिक आणि दि टर्मिनेटर सारखे हीट चित्रपट जेम्स यांनी हॉलिवूडला दिले आहेत. अवतार म्हणजे फॅन्टसीचे जग… सोबत भरपूर अॅक्शन… कितीतरी मोठे कल्पनाविश्व…. या चित्रपटात सॅम आणि जोई हे प्रमुख भुमिकेत आहेत. एका दुस-या ग्रहावर किंमती असा धातू आहे. त्याची किंमत करोडोमध्ये आहे. हा धातू मिळवण्यासाठी या ग्रहावर जाणे गरजेचे असते. पण तिथे रहाणारी विशिष्ट जमात या सर्वांच्या विरोधात आहे. यामुळे लढाई चालू होते. या चित्रपटा जोई सालडानाने नेयटरी ची भूमिका केली आहे. नेय़टरी ही या कबिल्याच्या सरदाराची मुलगी. आपण प्रत्यक्षात ज्या गोष्टींचा विचार करु शकत नाही, अशा सर्व गोष्टी अवतारमध्ये बघायला मिळतात… त्यात जोईनं केलेली भूमिकाही तेवढीच लाजवाब ठरली. अवतारला ऑस्करमध्ये तब्बल नऊ मानंकनं मिळाली. जगभरात हा चित्रपट पाहिला गेला. आणि जोईच्या लोकप्रियतेत भर पडली. टायटॅनिक चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर केलेला कमाईचा रेकॉर्ड अवतार या चित्रपटानं मोडला. या चित्रपटाचे एकूण चार भाग येणार आहेत. मध्यंतरी दुस-या भागाचे काही प्रोमो आल्याच्या बातम्याही आल्या. पण त्यात फक्त अवतार – 2 या पोस्टर पलीकडे काहीही नव्हतं. तरीही या प्रोमोला लाखो प्रेक्षकांनी भेट दिल्याचे समजले…. यावरुनच अवतारची लोकप्रियता किती हे जाणवते. या आगामी भागात आता जोई कुठली साहसी दृष्य साकारणार याचीही चर्चा अधिक आहे. अर्थात या चित्रपटात जोईचा मेकअप हा चर्चेचा विषय ठरला होता. निळ्या रंगात दिसणा-या जोईला मेकअप करतांना काही तास स्तब्ध बसावे लागे. अवतारमध्ये स्पेशल इफेक्टचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे नवं तंत्र शिकून त्यानुसार स्टिल कॅमे-यासमोर अभिनय करण्याची कलाही जोईला शिकावी लागली. अर्थात तिच्या या सर्व मेहनतीचे फळ तिला मिळालं. अवतारला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले… शिवाय अब्जांमध्ये कमाई झाली तो भाग वेगळाच.

जोईचा आणखी एक गाजलेला चित्रपट म्हणजे दि गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी… या मार्वल पटात जोईन थॅनॉसच्या मुलीची, गमोराची भूमिका केली आहे. ही गमोराही खूप लोकप्रिय झाली. अगदी तिच्यासारखी बाहुलीही निघाली. यातही जोईचा मेकअप हटके होता… हिरव्या रंगाचा… अगदी तिची लिपस्टीकही हिरव्या रंगाची होती. अनेक तास हे हिरव्या रंगाचे थर आपल्या अंगावर ती चढवत असे… आणि त्यानंतर अॅक्शन सीन… ही सगळी कसरत करतांना त्रस्त झालेल्या जोईची गमोरा प्रचंड लोकप्रिय ठरली. स्टार ट्रेक या चित्रपटामध्ये तर जोईनं कमाल केलीय. मानव जातीच्या रक्षणासाठी चाललेल्या युदधात जोईनं न्योता ओहारा या मुलीची भूमिका केली आहे. या चित्रपटानं तब्बल 385.7 दशलक्ष कमाई केल्याची चर्चा आहे. मार्वलपटांची जोई ही आवडती अभिनेत्री ठरली आहे. दि लुझर्समध्ये जोई आयेशा नावाच्या मुलीच्या भुमिकेत आहे. हा परफेक्ट हॉलिवूड पट. भरपूर मारामारी… यात क्रिस इव्हान्स, जेफ्री मॉर्गन तिचे सहकलाकार आहेत.

दि टर्मिनल हा चित्रपट जोईच्या इतर चित्रपटांतील भूमिकांपेक्षा थोडा वेगळा आहे. यात टॉम हॅन्स तिचा सहकलाकार आहे. तीन मुलांची आई असलेल्या जोईनं आत्तापर्यंत चाळीसहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. वयाची चाळीशी ओलांडलेली ही अभिनेत्री आजही साहसपटांमध्ये तेवढ्याच चपळपणे काम करते. याचं सर्व श्रेय मात्र ती तिच्या बॅले नृत्याला देते. आता या कोरोनाच्या काळात जोई आपल्या आगामी चित्रपटातील अॅक्शन सीनवर काम करीत आहे. अर्थात सर्वांनाच तिच्या नव्या अवताराची उत्सुकता आहे….

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Cinema Entertainment Hollywood model Movie Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.