Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…

 जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…
नाट्यकला मिक्स मसाला

जेव्हा बाळासाहेबांनी दिली होती गलगलेंना दाद…

by रश्मी वारंग 16/07/2020

काही नाटकं कालातीत असतात. कितीही वेळा पाहिली तरी तोच आनंद देतात. भरत जाधव अभिनीत केदार शिंदे दिग्दर्शित ‘सही रे सही’ नाटक याच कॅटेगरीतलं. या नाटकाच्या आठवणीसुद्धा तितक्याच सही आहेत.

 २००२ साली ‘सही रे सही’ रंगमंचावर आलं. केदार आणि भरत या दोघांचंही त्या आधीचं नाटक फारसं चाललं नव्हतं. एका नव्या धमाकेदार नाटकाच्या दोघंही शोधात होते. सही रे सहीच्या रूपाने त्यांना यशाचा मार्ग मिळाला. भरत जाधवच्या चौरंगी भुमिकांनी या नाटकात नुसती धमाल केली होती. मदन सुखात्मे, रंगा ड्रायव्हर, दामू आणि गलगले ह्या चारही भूमिका भरत इतक्या जबरदस्त वठवत होता की या नाटकाला रिपीट ऑडीयन्स मिळत राहिला. पहिल्या वर्षी ३६५ दिवसात या नाटकाने विक्रमी ५६८ प्रयोग केले. लता नार्वेकर यांनी निर्माता म्हणून हे नाटक रंगभूमीवर आणलं  होतं पण काही वादांमुळे त्या बाहेर पडल्या. आणि नव्या रुपात नव्या निर्मिती संस्थेसह “पुन्हा सही रे सही” अवतरलं. गेली १८ वर्षं या नाटकाने प्रेक्षकांना हसवत ठेवलं आहे.

 या नाटकाला अनेक मान्यवरांची दाद मिळाली शिवसेना वर्धापनदिनाच्या एका भाषणात उल्लेख करताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ” कराचीला बसने लालुप्रसादना पाठवण्याऐवजी आमच्या गलगलेंना पाठवा. बोलून बोलून अर्ध्याहून अधिक लोकांना गारद करतील.” भरतच्या गलगलेंना मिळालेली ती दाद होती. तर या नाटकात भरत एंट्री आणि एक्झीटची तारेवरची कसरत कशी सांभाळतो या कुतुहलापोटी राज ठाकरेंनी प्रत्यक्ष विंगेत उभं राहून हे नाटक पाहिलं होतं.

 नाशिकला या नाटकाचा प्रयोग असताना बाल्कनीतल्या एका प्रेक्षकाला चुकून दोन तिकीटं आली. पण तिकीट परत करण्यासाठी खाली उतरायचा त्याने कंटाळा केला. नाटक संपल्यावर मात्र या प्रेक्षकाने अधिकच्या तिकीटाचे पैसे आवर्जून देऊ केले कारण कलाकारांनी घेतलेली मेहनत पाहिल्यावर ते फुकटचं तिकीट त्याला टोचू लागलं आणि त्याने ते तिकीटाचे पैसे देऊ केले .

या नाटकाने भरत जाधव या नावाला एक ग्लॅमर दिलं आणि त्याची जाणीव ठेवून भरतनेही आपल्या सहकलाकारांची नेहमी काळजी घेतली. या नाटकाचे प्रयोग जोरदार चालू होते तेव्हा भरतचं एका सिनेमाचं बॅंकॉकला ४० दिवसाचं शुटींग लागलं. शुटींगला जाण्याआधी भरतने नाटकाशी निगडीत सर्व २७ जणांना बोलावून त्यांच्या हातात   मानधन ठेवलं. आपल्या शुटिंगमुळे सहीचे प्रयोग होत नसले तरी नाटकातील मंडळींचं आर्थिक नुकसान होऊ नये ही कळकळ त्यामागे होती. या सच्च्या प्रेरणेनेच या नाटकाला घवघवीत यश दाखवलं असावं.

सध्याच्या काळात सर्वच नाटकांचे प्रयोग बंद आहेत. मात्र या नंतर जेव्हा कधी नाट्यगृहं खुली होतील तेव्हा सलग १८ वर्षं सगळ्या अडीअडचणींवर मात करत सुरू असलेलं हे नाटक  पुन्हा दिमाखात ‘सही’ घोडदौड करेल यात शंकाच नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Drama Entertainment Marathi Natak Natak
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.