‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ज्युनिअर रफी अशी ओळख…
सोनू निगम…बॉलिवूडचा गोड चेह-याचा गायक…जेवढा दिसायला तो गोड….तेवढचं त्याचं गाणंही गोड…ऐकत रहावं असं…30 जुलै रोजी सोनूचा वाढदिवस…त्यानिमित्त या गायकाच्या संघर्षाचा घेतलेला मागोवा…
ये दिवाना….
गोड चेहरा, कुरळे केस आणि हदयात घर करेल असा आवाज….सोनू निगम या गोड गळ्याच्या आणि तेवढ्याच गोड दिसणा-या गायकानं आपली जागा रसिकांच्या हदयात केली आहे. एकेकाळी ऑक्रेस्ट्रामध्ये सोनू गायचा…नंतर पार्श्वगायक होण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष…ज्युनिअर महमंद रफी हे त्याचे झालेले नाव…आणि या पलिकडे जाऊन त्यांनं निर्माण केलेली स्वतः ओळख…आज बॉलिवूडचा सर्वात यशस्वी गायक म्हणून सोनू निगमची ओळख असली तरी त्यांने हिंदीबरोबरच अन्य भाषांमध्येही तेवढीच गाणी गायली आहेत. सोनूचं गाणं जेवढं श्रवणीय होतं तेवढेच त्याचे बोल हे परखड असतात. एखादी गोष्ट त्याला खटकली तर त्याबद्दल समाजमाध्यमात जाहीरपणे मत व्यक्त करायला तो घाबरत नाही. या त्याच्या परखड स्वभावामुळे सोनू मागे पडला…पण त्याला त्याची फिकीर नाही. आपला आवाज हा सच्चा आहे, तो सच्चेपणा आपल्या मतातही असायलाच हवा…असा त्याचा विश्वास आहे…हे गाणं आणि परखड स्वभाव त्याला त्याच्या पालकांकडून मिळालंय…
निगम कुटुंब हरियाणामधील फरीदाबाद मधील…सोनूचे आई वडील दोन्हीही गायक. शोभा निगम आणि अगम कुमार निगम हे ऑक्रेस्टामध्ये गायचे. लग्न किंवा अन्य सोहळ्यामध्ये सोनूचे आईवडील गाण्याचे कार्यक्रम करायचे. सोनूही लहानपणापासून आईवडीलांसोबत असायचा. एकदा एका कार्यक्रमात सोनूनं स्टेजवर येऊन गाणं म्हणण्याचा आग्रह वडीलांकडे धरला. अवघं चार वर्षाचा हा मुलगा थेट स्टेजवर गाणं कसं म्हणणार म्हणून वडील नाही म्हणत होते.पण शेवटी सोनूचा हट्ट जिंकला. तो माईक समोर उभा राहीला. महमंद रफी यांचे क्या हुआ तेरा वादा हे गाणं सोनू म्हणू लागला. त्याची त्या वयातील तयारी बघून प्रेक्षकांसह त्याच्या आईवडीलांनाही सुखद धक्का बसला. त्यानंतर सोनूचे रितसर गाण्याचे ट्रेनिंग सुरु झाले.
गाण्याबरोबर सोनू बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करु लागला. बेताब या चित्रपटातला छोटा सनी देओल आठवतो का…ती भूमिका सोनू निगमनं केली होती. सोनू अभ्यासातही हुशार. गाण्यातील त्याची प्रगतीही तेवढीच चांगली होती. भविष्यात उत्तम पार्श्वगायक होण्याची क्षमता असलेल्या आपल्या मुलाला घेऊन मग निगम कुटुंब मुंबईत आले. गुलाम मुस्तफा खान हे त्याचे गाण्याचे गुरु झाले. त्यांच्याकडे गाणं शिकत असतांना सोनू आपल्या कॅसेट घेऊन अनेक स्टुडीओमध्ये, चित्रपट दिग्दर्शकांकडे जायचे…पण सुरुवातीला या लहानशा मुलाकडे कोणीही लक्ष दिलं नाही.
शेवटी टीसीरीजे गुलशन कुमार यांच्या नजरेस सोनू आले. मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची कॅसेट सोनूच्या आवाजात काढण्यात आली. रफीसाहेबांची गाणी गाण्याची संधी सोनू यांना मिळाली. त्यांच्यासाठी ही मोठी संधी होती. 1995 मध्ये गुलशन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बेवफा सनम हा चित्रपट आला. चित्रपट फारसा चालला नाही, पण त्यातील अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का….हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी झाला. गायक होते सोनू निगम…सोनूला पार्श्वगायक म्हणून ही पहिली संधी मिळाली. त्या गाण्यातील वेदना…प्रेमात दुरावलेल्या प्रत्येकाला आपलीच वाटली. येथून सोनूची ओळख बॉलिवूडला होऊ लागली. दरम्यान सोनूला काही जाहीरातीही मिळाल्या. झी टीव्हीच्या सारेगमा या संगित कार्यक्रमाचा निवेदक म्हणून काम करण्याची संधी सोनूला मिळाली. हा सोनूसाठी मोठा ब्रेक होता.
बॉलिवूडमध्ये या उदयोन्मुख गायकाला चांगली गाणी मिळायला सुरुवात झाली. बॉर्डर चित्रपटातील संदेसे आते है…हमे तडपाते है…या गाण्यांनी सोनू निगम हा ब्रॅण्ड तयार झाला. तरीही सोनू याला मोहमंद रफी यांची सावली असाच उल्लेख केला जात असे. सोनू मोहंमद रफी यांचा चाहता होता. पण त्यांनी त्यांच्या गाण्याची स्टाईल कधी कॉपी केली नाही. त्याची गाण्याची स्वतंत्र पद्धत आहे…आवाजातील चढ उतारही तसेच….पण याकडे फारसे लक्ष देण्यात येत नव्हते. मात्र परदेस या चित्रपटामधील ये दिल..ये दिल दिवाना या गाण्यांनं सोनूनं स्वतःचा ठसा उमटवला. सोनू निगम म्हणजे शहारुख खानचा आवाज हे समिकरण नक्की झालं. चांगली गाणी त्यांच्याकडे आली….ती प्रसिद्ध झाली…आणि पुरस्कारही आले. सोनू हे हिंदीपुरते मर्यादीत राहीले नाहीत. त्यांनी कन्नडी, आसामी, बंगाली, उडीया, पंजाबी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, भोजपुरी, उर्दु, नेपाळी, छत्तीसगढी, मल्याळम, मराठी या भाषांमध्ये गाणी गायली. एवढ्या भाषेमध्ये गाणी गाणारे सोनू बहुधा एकमेव गायक असावेत. याशिवाय हिंदीसह उडीया, पंजाबी, कन्नडी भाषांमध्ये आपले स्वतंत्र अल्बमही काढले.
कभी खुशी कभी गममधील बोले चुडीयॉं, धडकन मधील दिल ने ये कहॉं है दिलसे, अग्निपथ मधील अभी मुझ मै कही, थ्री इडीयट मधील ऑल इज वेल, वीर झारा मधील दो पल या गाण्यामधून सोनू रसिकांच्या मनात कायमचा बसला. याशिवाय सोनूने काही स्वतंत्र अल्बमही काढले. त्यालाही भरभरुन प्रतिसाद मिळाला.
सोनूनं बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टिकेची झोड उठवली…बॉलिवूडमधील काही प्रमुख कलाकारांविरोधात सोनूने आवाज उठवला होता. वास्तविक अलिकडे काही महिन्यात बॉलिवूड आणि घराणेशाही हा चर्चेचा विषय झाला आहे. या विषयाला काही वर्षापूर्वी सोनू निगमनचं तोंड फोडलं होतं. तेव्हा सोनू एकटाच पण हिंमत्तीनं या विरोधात उभा राहीला. यामुळे अनेकांनी सोनूला सल्ला दिला की तुझ्या पायावर दगड पाडलास…आता तुझे करिअर संपले…पण सोनूनं या सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. काही महिने त्याला काम मिळाले नाही. पण सोनू डगमगला नाही. जे खरं आहे ते बोलणारच हा त्याचा बाणा होता. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर या सर्व प्रकरणातील खोली किती आहे, याची साधारण कल्पना सर्वसामान्यांना आली. या सर्वात सोनू निगमनं काय सहन केलं असेल याची कल्पनाही त्याच्या चाहत्यांना आली. सोनूला त्याच्या आवाजावर विश्वास होता. आपल्या आवाजातील सच्चेपणा कधीना कधी समोर येईल, हा त्याचा विश्वास आता सार्थ धरतोय. या सच्चा गायकाला भविष्यात सुमधूर गाणी गाण्याची संधी मिळो, ही कलाकृती मिडीयातर्फे शुभेच्छा…