‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पैश्यापरी पैसा.. पोरापरी पोर!
आता सांगता येत नाही अन सहनही होत नाही असं काहीतरी झालंय.
या सुशांतसिंह राजपुतचं प्रकरण रोज नवी वळणं घ्यायला लागलंय. आधी वाटत होतं, आत्महत्या आहे.. मग वाटायला लागलं.. हत्या आहे.. मग वाटायला लागलं… सुशांतचं व्हायचं ते झालं, आता हे तर राजकारण सुरू आहे.. मग वाटायला लागलं.. बिहार पोलीस वेडे आहेत… त्यानंतर लक्षात आलं मुंबई पोलीस गप्प आहेत..
आरे.. बच्चे की जान लो गे क्या.. !!
आता हे कमी म्हणून का काय त्यात ईडीवाले आले. ईडीवाल्यांनी तर धुरळा पाडायला घेतलाय. त्यांनी लागलीच रियाची चौकशी करायला घेतली. सुशांतची बॅंक खाती.. त्यातले पैसे.. रियाच्या नावे असलेले पैसे.. तो रियावर खर्च करत असलेले पैसे.. आरारारारा..
पैसा जास्त आला की जरा घोळच होतो तसं झालंय. आता सध्या इडीनं जी चौकशी चालू केलीय, त्यात काय समोर आलंय? त्यात तीन मोठ्या गोष्टी समोर आल्यात…
गोष्ट एक – सुशांत रियाचा सगळा खर्च भागवत होता. रियाला पैसे देत होता.
गोष्ट दोन – सुशांत आपल्या आणखी एका मैत्रीणीच्या फ्लॅटचं भाडं भरत होता. हे भांड साधारण ३५ हजार प्रती महिना आहे.
गोष्ट तीन – आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडेच्या फ्लॅटचे हप्तेही सुशांत भरत होता.
आईच्या गावात.. !!!
हे असं कुठं असतं का.. एक नाही दोन नाही तर तीन तीन.. तीन तीन जणींना कुमार सुशांत पोसत होता. क्यू भाई? आता आतली बातमी अशी की सुशांतची आणखी एक मैत्रीण होती. म्हणजे एकूण चार जणी झाल्या. असू देत. त्यात आम्हाला काय म्हणायचं नाही. अरे पण हा खर्चं? आता हे प्रकार ईडीच्याच चौकशीत समोर आलेत म्हणून ठिकाय… नाहीतर आजून कुठून ही बाब समोर आली असती तर लोकांनी मात्र खोटं ठरवलं असतं ते मिडियाला!!! मिडियाचं कामच जे कळतं ते लोकांना सांगणं असं आहे नं. म्हणूनच इथे सुशांतबद्दल शंका यायला लागते…
अहं.. तो भारीच मुलगा होता हो. तो जबरा कलाकार होता. उमदा, हुशार.. पोरगा अकाली गेल्याचं दु:ख आहेच. पण त्याही पलिकडे आपल्या इतक्या मैत्रीणींची तो का अशी “व्यवस्था” करत होता ते काय कळायला मार्ग नाही. बरं तो करत होता ते होता, या मुलींना काहीच कंस वाटत नव्हतं??
आता नवी बाब अशी आहे, की अंकिता लोखंडे ताईंनी डायरेक्ट ट्विटरवर आपल्या फ्लॅटची कागदपत्रं टाकली आहेत. त्यात त्यांनी थेट सांगितलं आहे, की हे हप्ते मीच भरत असून, त्याच्याशी सुशांतचा काहीच संबंध नाही.
असं असेल, तर मग ईडीवाले सांगतात ते खरं की अंकिता ताईंचं ट्विट खरं… पाक भुसा झालाय डोक्याचा!!!
रियासोबत सुशांतचं कंपनी फॉर्म करणं.. त्यात सुशांतचा पैसा असणं.. रियाच्या भावाची त्या कंपनीत पार्टनरशिप असणं.. आणि सगळ्यात मह्त्वाचं.. मैत्रिणींच्या घराची भाडी भरणं.. मुंबईतली भाडी कमी नसतात.
ईडीनं आता जोर लावायला हवा. सवाल दिन ब दिन पेचिदा होता जा रहा है.
पैसा परी पैसा गेला आणि पोरा परी पोर गेलं.
काय करावं त्या बापानं…
नाही का?