‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अफसाना (१९५१)
- निर्मिती : श्री गोपाल पिक्चर्स
- निर्देशक : बी. आर. चोप्रा
- संगीतकार : हुस्नलाल भगतराम
- गीतकार : असद भोपाळी, एस के दीपक, गाफील हरनालवी
- कलाकार : अशोक कुमार, वीणा, जीवन, कुलदीप कौर, प्राण, कुक्कु, चमन पुरी
बी आर चोप्रांनी निर्देशित केलेला हा प्रथम चित्रपट! ‘अफसाना’ची कथा व संवाद इंद्रसेन जौहरचे होते.
त्याची मध्यवर्ती कल्पना होती, ‘प्रेम दिल से किया जाता है, रूप से नही’.
ही रतन आणि चमन या सारख्याच दिसणार्या जुळ्या भावांची (अशोक कुमार) कथा होती. लहानपणी, मेळ्यात एकमेकांपासून दुरावलेले. रतन अनाथाश्रमात वाढून मोठेपणी जज्ज, तर चमन घरच्या श्रीमंतीत वाढून आवारा टाईप तरुण बनतो.
मेळ्यात डोक्याला जखम झाल्याने रतन बालपणाची स्मृती आणि प्रेमिका मीराला (वीणा) विसरून पुढे कुलदीप कौरशी विवाह करतो. साध्याभोळ्या रतनला आपल्या पत्नीचे, कुलदीप कौरचे आपल्यास मित्राशी, मोहनशी (प्राण) अनैतिक संबंध आहेत, याचा पत्ताही नसतो.
पुढे योगायोगाने रतन व चमनची एका हॉटेलमध्ये भेट होते. खुनाचा आरोप असलेला चमन रतनला गुंगीचे औषध पाजून त्याचा वेश परिधान करून पळ काढतो.
रस्त्यात भीषण अपघातात खरा चमन मरतो. परंतु जज्ज रतन मृत्यू पावल्याची बातमी प्रसिद्ध होते. रतन घरी येतो तेव्हा आपल्या पत्नीला मित्राच्या बाहुपाशात पाहतो. तो त्यांचा अभिनव पद्धतीने सूड उगवतो व शेवटी बालपणाची प्रेमिका मिराशी (वीणा) विवाह करून सुखी होतो.
‘एका नामी जज्जची पत्नी त्याच्याच मित्राबरोबर विचार करते’, ही कल्पना त्या काळी नवी आणि धाडसी होती.
चोप्रांच्या अफसानाने रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यातील ‘अभी तो मै जवान हू’ गाण्याने आजही आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.