‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेणो काम तेणो थाय …
संगीतकार नौशाद त्या वेळी महबूब खान यांच्या ’अनमोल घडी’ या सिनेमाला संगीत देत होते.गायिका अभिनेत्री नूरजहॉं प्रथमच त्यांच्याकडे गात होती. नूरजहॉं त्या काळची टॉपची कलावंत होती.तिच्या स्वरात एक मादक नशा होती. ज्या गाण्याची रिहर्सल चालली होती ते होतं ’जवां हैं मुहोब्बत हंसी हैं जमाना लूटाया है दिलने खुशीका खजाना’ ताडदेव स्थित फेमस स्टुडिओतील म्युझिक रूम मध्ये काम चालू होतं.
नौशाद अली व त्यांचे वादक मोठ्या उत्साहात होते कारण एवढी मोठी गायिका पहिल्यांदाच त्यांच्या कडे गात होती. तिचा तो नशीला स्वर वारंवार प्रत्येकाला ऐकावासा वाटत असल्याने वादक मुद्दाम चुकत पुन्हा पुन्हा ती गात होती!
तितक्यात सिनेमाचे दिग्दर्शक मेहबूब खान तिथे आले.गाणं जवळपास बसलं होतं. असे असताना मेहबूब यांनी नूरजहांला ही तान अशी वरती घे. अंतर्याच्या आधी इंटरल्यूड मध्ये या वाद्याचे पीसेस वाजवा. प्रील्यूड थोडा लाऊड वाटतोय. त्यात बदल करा. अशा सुचना करायला सुरूवात केली.
संगीतकार नौशाद यांना त्यांची ही अनावश्यक लूडबूड अजिबात आवडली नाही, पण सर्वांसमोर त्यांना काही सुचविणे त्यांना प्रशस्त वाटले नाही. दुसर्या दिवशी त्याच सिनेमाचे चित्रीकरण चालू असलेल्या सेट वर नौशाद पोचले. मेहबूब यांनी दिवाणखान्याचा सेट लावला होता व तिथे शूटींग चालू होतं. शॉट घेण्याच्या आधी ते कॅमेरामन फरदून इराणी याला म्हणाले ’या फ्रेम मध्ये हा गुलदस्ता येवू देवू नका. फिल्टर टाकून शॉट घ्या. फोकस दरवाजावर करा. कॅमेरा झूम करून पुढे न्या.’
दिग्दर्शक मेहबूब वैतागले. ’काय चाललयं इथे? दिग्दर्शक मी आहे की नौशाद?’ ते चिडून म्हणाले ’अरे भाई नौशाद तेरा काम पेटी बजानेका इधर तेरा क्या काम हैं?’ यावर हसून नौशाद मियां म्हणाले ’जनाब मैं कल से आपको यही समझाने की कोशिश कर रहा हूं लेकीन आप है जो मानते ही नही.’ यावर मेहबूब खान त्यांना काय म्हणायचे समजले व हसत हसत म्हणाले…
’सही फर्माया आपने ..हमारे गुजराती मे एक कहावत हैं…जेणो काम तेणो थाय, दूजा करे गोता खाय!’
चूक मान्य करण्यात ही मोठे पणा असतो तो पूर्वीच्या कलावंतामध्ये होता म्हणूनच इगोचा बाऊ न करता हि लोक वर्षानुवर्षे एकमेकांसोबत काम करू शकले. मेहबूब यांच्या पुढच्या सर्व म्हणजे अनोखी अदा, ऐलान, अंदाज, आन, अमर, मदर इंडीया, सन ऑफ इंडीया या सिनेमाला नौशाद यांचे कर्णमधुर संगीत होते.