लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

“रामप्रसाद कीं तेहरवी” नात्यांची रेशीम गाठ…
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 1 जानेवारी 2021 रोजी राम प्रसाद की तेहरवी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नव्या वर्षात चित्रपट गृहात प्रथम प्रदर्शित होणारा हा एक कौटुंबिक चित्रपट असून अभिनेत्री सीमा पाहवा यांचा पहिला चित्रपट आहे. जियो स्टूडियो आणि दृश्यम फिल्म्सचा हा चित्रपट जवळपास हजार चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
कुटुंबाच्या प्रमुखाचं निधन झाल्यावर त्याचे क्रियाकर्म करण्यासाठी जमणारा गोतावळा आणि त्यातील प्रत्येकाचे आपापसातील संबंध, अशी राम प्रसाद की तेहरवी चित्रपटाची कथा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत.
दिग्दर्शक म्हणून सीमा पाहवा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. काही वर्षांपूर्वी सीमा यांच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी राम प्रसाद की तेहरवी या चित्रपटाची कथा लिहीतांना प्रेक्षकांसमोर मांडलाय.
उत्तर भारतातील भार्गव कुटुंबाची ही कथा आहे. या कुटुंबाचे प्रमुख, बाऊजी म्हणजेच राम प्रसाद भार्गव यांचे अचानक निधन होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पाच मुलं आणि अन्य कुटुंबिय एकत्र येतात. मग अंतिम संस्कार करण्यापासून ते तेराव्या पर्यंतच्या राम प्रसाद भार्गव यांच्या अंतिम प्रवासात या कुटुंबियांचे स्वभाव आणि हेवेदावेही पुढे येतात. आपला पती हा कुटुंबाचा प्रमुख असल्याची फक्त माहिती त्याच्या पत्नीला होती. पण या प्रमुख पदासाठी तो काय आणि कशी कसरत करत असेल याची जाणीव त्यांच्या पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर होते.
हे देखील वाचा: अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
कुंटुंबातील प्रत्येकाचे वेगळे मत असते. राम प्रसाद यांच्या मृत्यूनंतर सर्वजण आपलेच मत कसे बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. मग यातच राम प्रसाद यांचा तेराव्याचा कार्यक्रम कधी करायचा हा प्रश्नही कुटुंबासमोर पडतो. कारण त्याच दिवशी वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 31 डिसेंबरची पार्टी की तेरावे असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यातच अनेक वर्षांनी सर्व कुटुंबिय एकत्र आल्यावर त्यांच्यातील वादावादी, गप्पा, मजा मस्ती सुरु होते. अशावेळी एकाकी पडलेल्या राम प्रसाद भार्गव यांच्या पत्नीला आपल्या पतीची आठवण येते.

मनीष मूंदड़ा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक, कोंकणा सेन शर्मा, विनय पाठक, विक्रांत मेस्सी, मनोज पाहवा सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.
दिग्गज कलाकार आणि सोबतीला हलके फुलके संवाद यामुळे राम प्रसाद की तेहरवी बघण्यासारखा नक्कीच आहे.