Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“पिकू” ची २५ कोटी ते १४१ कोटींची पडद्यामाग ची कहाणी…

 “पिकू” ची २५ कोटी ते १४१ कोटींची पडद्यामाग ची कहाणी…
कहानी पुरी फिल्मी है

“पिकू” ची २५ कोटी ते १४१ कोटींची पडद्यामाग ची कहाणी…

by रश्मी वारंग 25/12/2020

विनोदी चित्रपटांची चाकोरी मोडत मिश्कील हास्याला अर्थपूर्ण जोड देणारा चित्रपट म्हणजे “पिकू”. ८ मे २०१५ रोजी प्रदर्शित या सुपरहिट चित्रपटाची ही पडद्यामागची कहाणी. १९८० साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक “सत्यजित रे” यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्मवर “पिकू” आधारीत आहे. कथा पटकथा जुही चतुर्वेदी यांची तर दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केलं आहे. चित्रपट लिहिताना त्यातून मध्यांतर काढून टाकण्याचा अभिनव प्रयोग करण्याचं शुजित सरकार यांच्या डोक्यात होतं पण भारतीय चित्रपटगृह मालकांनी या  संकल्पनेला अजिबात प्रतिसाद दिला नाही आणि त्यांच्या दबावामुळे मध्यांतरासह सरकार यांना चित्रपटाची स्क्रीप्ट पुन्हा लिहून काढावी लागली.

“पिकू” च्या मुख्य भूमिकेसाठी परिणिती चोप्रा हीचा विचार शुजित यांनी केला होता. पण परिणितीने नकार दिल्याने दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी दीपिका बंगाली भाषा शिकली. एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून‌ इरफान खान सारखा अभिनेता चित्रीकरणादरम्यान आपल्याशी फार हसून खेळून वागणार नाही अशी दीपिकाला भीती होती, जी अर्थातच खोटी ठरली. या चित्रपटातील त्यांची जोडी म्हणजे शुजित सरकारने घेतलेली मोठी रिस्क होती, पण ही जोडी सुपरहिट ठरली. दीपिका आणि अमिताभ बच्चन या बाप-लेकीची गंमतीशीर जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटातील अमिताभ, इरफान, दीपिका यांची जुगलबंदीही खास होती.

या चित्रपटातील अनेक प्रसंग खास चित्रीकरणाने लक्षात राहिले. त्यापैकी एक म्हणजे भाश्कोरदा झालेल्या अमिताभ यांचा सायकलप्रवास. आपल्याला राहून राहून आश्चर्य वाटतं की एवढ्या गर्दीत शुटींग होऊनही अमिताभना गर्दीचा त्रास कसा झाला नाही??? तर त्याचं कारण म्हणजे १०० कोलकाता पोलिस आणि ६०० एक्स्ट्राज अमिताभ यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेत वाहतूक सांभाळत होते. त्यामुळे ते शुटींग उत्तम पार पडलं.

हे हि वाचा : बेगम पारा: भारताची पहिली बोल्ड अभिनेत्री…

“पिकू” ची एक खास गोष्ट म्हणजे दीपिकाला ड्रायव्हिंग येत होतं, पण गाडी चालवायचा आत्मविश्वास कमी होता. शुटींग दरम्यान शुजित सरकारने खात्रीपूर्वक दीपिकाच्या ड्रायव्हिंगचा सीन जेव्हा सिनेमात टाकला तेव्हा तो हायवेवर ड्राईव्ह करण्याचा अनुभव दीपिकाला खूप काही शिकवून गेला आणि चित्रपटाच्या शुटींग नंतर मुंबईतील रस्त्यांवर ती आत्मविश्वासाने गाडी चालवू लागली. “पिकू” अनेक गोष्टी सहजपणे मांडतो.

बाप-मुलीचं नातं, स्त्री म्हणून नायिकेचं वेगळेपण, चाकोरीबाहेरचा रोमान्स आणि कोलकत्याचं देखणं सौंदर्य. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची उत्तम प्रतिक्रिया लाभली. दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अमिताभ यांचा तर तो चौथा राष्ट्रीय पुरस्कार ठरला. २५ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४१ कोटींची कमाई केली. ॠषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांच्या पठणीतल्या चित्रपटांची आठवण करुन देणारा पिकू सर्वार्थाने खास ठरतो…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movie Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.