दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘स्वराज’ सोबत का जमली सिद्धार्थ ची गट्टी?
भूमिका आणि कलाकार यांचे नेहमीच एक वेगळंच नातं असतं. एखादा कलाकार की भूमिका करत असताना तो स्वतःला विसरून त्या भूमिकेशी एकरूप होत असतो. ती भूमिका कधीकधी त्याला खूप काही शिकवून जाते, आणि अशा भूमिकेच्या शोधात प्रत्येक कलाकार असतो. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याला देखील अशीच भूमिका मिळाली आहे आणि ही नवी व्यक्तिरेखा म्हणजेच तो नव्या मालिकेत साकारत असलेला स्वराज. त्याच्यासाठी हा स्वराजचा रोल आता नवा फिलॉसॉफर असल्याचं त्याने शेअर केले आहे. सिद्धार्थ या त्याच्या ऑनलाइन नव्या रुपाला त्याचा फिलॉसॉफर का म्हणतोय हे ऐकणे देखील खूपच रंजक आहे.
हे देखील वाचा: संतोषने का मानले अवधूतचे आभार? जाणून घ्या खरं कारण
जिवलगा या मालिकेनंतर सिद्धार्थ चांदेकर आता एका नव्या मालिकेत रसिकांसमोर आला आहे. सांग तू आहेस का? असं त्याच्या या नव्या मालिकेचं नाव असून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात सिद्धार्थने देखील त्याच्या या नव्या मालिकेचे प्रमोशन त्याच्या सोशल मीडिया पेजवरून करायला दणक्यात सुरुवात केली आहे. ( सांग तू आहेस का? | Sang Tu Ahes Ka | Star Pravah )
स्वराजच्या ऑन स्क्रिन जीवनात ज्या काही घडामोडी घडणार आहेत आणि त्यातून जो काही त्याला धडा मिळणार आहे ते सगळं एक अभिनेता म्हणून मला स्वराज या नव्या व्यक्तीकडून शिकायला मिळत असल्याचं सिद्धार्थने सांगितले आहे.
कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल हा ठरलेला असतो. त्यातल्या त्यात अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी धडपडणारे कलाकार अगदी सुरुवातीच्या काळात ऑडीशन देण्यासाठी अनेकदा उंबरे झिजवतात. नकार पचवतात. खूप मेहनतीनंतर, खूप ठिकाणी हेलपाटे मारल्यानंतर त्यांच्या हाताला एखादी चांगली भूमिका मिळते. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात हे असं वळण नेहमी येतं. सिद्धार्थने देखील सुरुवातीच्या काळात मालिका, सिनेमा यामध्ये काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केला आहे आणि म्हणूनच स्ट्रगल नंतर सिद्धार्थ चांदेकर आज एक उत्तम अभिनेता म्हणून चाहत्यांसमोर आला आहे.
सांग तू आहेस का? या मालिकेमध्ये सिद्धार्थ हा एका यशस्वी अभिनेत्याची भूमिका साकारत असल्याने त्याला देखील या व्यक्तिरेखेची वेगळी उत्सुकता होती. या मालिकेमध्ये स्वराजच्या तोंडी एक वाक्य आहे ते असं की, स्ट्रगल हा अभिनेत्याला एक चांगला माणूस बनवतं, तर माणसाला एक चांगला अभिनेता बनवतं. सिद्धार्थ सांगतो मी स्वतः असेल किंवा अभिनय क्षेत्रातील अनेक मित्रमंडळींचा स्ट्रगल मी पाहिला आहे.
कितीही यशस्वी अभिनेता झाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवण्यासाठी तुम्हाला हा स्ट्रगलच जाणीव देत असतो. त्यामुळे या मालिकेतील नायकाचे जे तत्व आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मालिकेत अभिनेता स्वराज ही भूमिका म्हणून मी साकारत असताना त्याच्या व्यक्तिरेखेचे जे पैलू दिसणार आहेत त्यातून त्याचे तत्व व त्याचे विचार हे देखील खूप चांगले आहेत त्यामुळे माझ्यासाठी पडद्यावरचा स्वराज हा माझ्यातल्या अभिनेत्याला रोज काहीतरी नवे शिकवणारा माझा फिलॉसॉफर बनला आहे.
हे वाचलंत का: “दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…
अग्निहोत्र या मालिकेतून सिद्धार्थ चांदेकर याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्याच्यानंतर त्याचा झेंडा हा सिनेमादेखील खूप गाजला होता. गुलाबजाम या सिनेमाचा जॉनर सिध्दार्थने अप्रतिम निभावला.
सुशीलकुमार शिंदे यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित दुसरी बाजू या सिनेमातही सिद्धार्थने केलेली सुशीलकुमार शिंदे यांच्या तरुणपणाची भूमिका त्याच्या अभिनयाने कसदार झाली होती. अमृता खानविलकर आणि स्वप्निल जोशी यांच्यासोबतची जिवलगा ही त्याची यापूर्वीची शेवटची मालिका होती. सिद्धार्थला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेले त्याचे चाहते तो कधी नव्या मालिकेतून समोर येतो याची वाटच पाहत होते. सांग तू आहेस का या मालिकेमुळे त्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत सिद्धार्थचा साखरपुडा झाला असून सध्या त्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.
-अनुराधा कदम