‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पंचमचं ‘मॅजिक’
पंचमदा यांनी ज्या कलात्मकतेने त्यांनी ’रैना बीती जाय शाम ना आये…’ ची सुरावट बनवली त्याच कल्पकतेने त्यांनी ’दम मारो दम…’ ची धुन बनवली. स्वत: ते अनेक वाद्य वाजवित असत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ’दोस्ती’ (१९६४) या चित्रपटातील ’जानेवालो जरा मुडके देखो मुझे’ या व इतर गाण्यातील माऊथ ऑर्गन त्यांनी ’दोस्ती’ खातर वाजविला! सचिनदा च्या ’सोलवा साल’ मधील ’है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील माऊथ ऑर्गन वरील करामत पंचमदाचीच.
एका गाण्याचा किस्सा फार मनोरंजक आहे. शक्ती सामंत यांच्या अजनबी (१९७४) मधील ’हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले’ या किशोर – लताच्या गाण्याचे रेकॉर्डींग होतं. त्या वेळी नेमका वादकांचा संप चालू होता. गाणं तातडीने ध्वनीमुद्रीत करणं आवश्यकच होतं. अशा कसोटीच्या वेळी पंचमने जबरदस्त आयडीया लढवली. त्यांच्या कडे रणजित गझमेर नावाचा एक नेपाळी वादक होता; जो मादल नावाचं वाद्य वाजवित असे. पंचमने रणजितला बोलावले आणि सांगितले ’चलो रणजित रेकॉर्डींग करते है’. रणजित म्हणाला” पर दादा बिना म्युझिशियन्स के ये कैसे पॉसिबल होगा?’ त्यावर पंचम म्हणाले, ’तू सिर्फ मादल बजा’ आणि मादलच्या र्हीदम वर आख्खं गाणं रेकॉर्ड झालं. गाण्यातील प्रील्युड व इंटरल्युड मधील रेल्वेचा आवाज पंचमने एकावर एक सॅण्ड पेपर घासून तयार केला! त्यानंतर कोरसचा आवाज काही व्हायोलीन, बासरीचे व इतर वाद्याचे पीसेस त्यात मिक्स करून गाणं तयार झालं! आज हे गाणं ऐकताना कुठेही हा ’जुगाड’ लक्षात येत नाही. ही असली अफाट कल्पकता पंचमच करू शकत होता.