‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
बॉलिवूडचा लाडका ‘करण जोहर’
बॉलिवूड आणि प्रेमकथा हे नात फार जुनं आहे. जगभरात जर कुठल्या देशात रोमान्स जास्त प्रमाणात प्रेक्षकांसमोर मांडला जातो तर तो भारतात.! वेगवेगळ्या भाषांमध्ये, विषयांमध्ये चित्रपटांमधून प्रेम मांडलेले आपल्याला दिसून येते. भारतातील हिंदी सिनेसृष्टीतले असे अनेक निर्माते, दिग्दर्शक आहेत जे प्रेमकथा लोकांसमोर प्रदर्शित करणार्यांमध्ये अग्रणी आहेत. यश चोप्रा, इम्तीयाज अली, अनुराग बासु, महेश भट. यातीलच एक नाव ‘करण जोहर’ (Karan Johar) जे आपण आवर्जून घेऊ शकतो. करण जोहर हा बॉलिवूड मधला सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, फॅशन डिझायनर, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आणि स्क्रीन रायटर आहे. आज करण जोहरचा जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने त्याच्या एकंदरीत २६ वर्षांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.
करण जोहर याचा जन्म २५ मे १९७४ मध्ये झाला. यश जोहर हिंदी सिनेमा निर्माते होते. त्यांचा करण हा मुलगा. यशजींनी स्वतःचे धर्मा प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. साधारण त्यांनी दोस्ताना, अग्नीपथ, गुमराह, कुछ कुछ होता हैं, कभी खुशी कभी गम असे अनेक मनोरंजनात्मक आणि प्रेम विषयावर आधारित सिनेमे रसिकांना दिले. पण त्यांच्या निधनानंतर सगळं प्रॉडक्शन हाऊस करण याने सांभाळायला सुरुवात केली.
करण (Karan Johar) याने त्याचे फिल्म इंडस्ट्रीमधले पहिले काम आदित्य चोप्रा बरोबर केले. तेव्हा त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या गाजलेल्या हिंदी सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टरचे काम केले होते. त्यानंतर त्याने स्वतःचे रोमॅंटिक कॉमेडी असलेला कुछ कुछ होता हैं, घरगुती विषयावर आधारित असलेला कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना केहेना, माय नेम इज खान असे सिनेमे डायरेक्ट केले. या सिनेमांसाठी त्याला अनेक फिल्मफेअर अवॉर्डस् मिळाले आहेत.
याच्या व्यतिरिक्त करण (Karan Johar) याने स्टुडंट ऑफ द इयर, ये जवानी हे दिवानी, हंपटी शर्मा की दुल्हनिया, ए दिल हैं मुश्किल, टू स्टेट्स, धडक, ओके जानु, कलंक असे सध्याच्या तरुणाईला आपलेसे वाटतील अशा चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांमध्ये त्याने तरुणाईच्या आयुष्यातील अडचणी, आजकालच्या ब्रेकअप-पॅचअप प्रेमकथा, ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल करून एन्जॉय करणारे यूथ असे अनेक विषय सहजरित्या दाखवले आहेत. फक्त प्रेमकथाच नाहीत, तर त्याने तरुणाईच्या लाडक्या विकी कौशल आणि आलिया भट ह्यांना घेऊन राझी सारखा एका भारतीय महिला स्पायवर आधारित सिनेमा प्रदर्शित केला. त्याने नुकताच सिंबा सारखा करोडी कोटी कमावलेला चित्रपटाची निर्मिती केली. साधारण करन जोहरने ६०च्यावर एक से एक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
त्याचबरोबर करण जोहर याला कॉस्च्युम डिजायनिंगच असलेले वेड फार जुन आहे. त्याला वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे घालायला प्रचंड आवडतात. या आवडीचे त्याने प्रॉफेशनमध्ये रुपांतरण केले आणि दिल तो पागल हैं, मोहब्बते, वीरझारा, ओम शांती ओम यासारख्या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनिंग चे काम केले.
त्याने बॉम्बे टॉकीज सारखा वेगळाच सिनेमा प्रदर्शित केला. आजकाल ट्रेंड आहे तो चित्रपटांबरोबर सिरीज वगैरे मनोरंजनाच्या साधनांचा. लोक अगदी मोठ्या प्रमाणात नेटफ्लिक्स, अमेझॉनचा वापर करतात. त्यामुळे त्याही क्षेत्रात तो मागे नाही. त्याने स्वतःची लस्ट स्टोरीज नावाची चार शॉर्ट स्टोरीज असलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला.
=====
हे देखील वाचा – सुनील दत्त: लाडका अभिनेता बनला कार्यक्षम नेता
=====
टेलिव्हिजन क्षेत्रातही करण जोहर (Karan Johar) मागे नाही. त्याचा स्टार वर्ल्डवर स्वतःचा ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रम आहे. जो सध्या प्रसिद्ध तर आहेच पण त्याच बरोबरीने प्रचंड प्रमाणात टीआरपी मिळणार्या मुलाखती संबंधित कार्यक्रमांमध्ये एक नंबरला आहे. तो झलक दिखला जा, इंडियाज गाँट टॅलेंट अशा शोजचा परीक्षक पण राहिलेला आहे. थोडक्यात, करण जोहर हा बॉलिवूडचा जान आहे. त्याने त्याच्या चित्रपटांमधून अनेक तरुण तरुणींना प्रेम करायला शिकवलं. अनेक नवीन कलाकारांना, गायकांना त्याने पहिली संधी दिले ज्यामुळे ते हिंदी जगताचा भाग होऊ शकले. करण जोहर हा सोशल असल्यामुळे त्याचे हिंदी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात मित्र आहेत. शाहरुख खान, काजोल, करीना कपूर, फराह खान ही त्याची खास घरातली माणस आहेत. या सगळ्यांच्या मदतीने आणि पाठिंब्याने तो आज बॉलिवूडच्या पहिल्या ५ मोठ्या निर्मात्यांमध्ये गणला जातो.
अशा या बॉलिवूडच्या लाडक्या करणला (Karan Johar) वाढदिवसाच्या शुभेच्छा. हिंदी चित्रपटसृष्टीत तुझ्या कामाची झलक आम्हाला बघता येऊ दे, तुझ्या चित्रपटांमधून आम्हाला कभी खुशी कभी गम अनुभवता येऊ दे हेच आम्हाला फॅन्सना तुला सांगायचे आहे.
- विपाली पदे