Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आऊसाहेबांशी गप्पा फत्तेशिकस्तच्या निमित्ताने

 आऊसाहेबांशी गप्पा फत्तेशिकस्तच्या निमित्ताने
कलाकृती तडका मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

आऊसाहेबांशी गप्पा फत्तेशिकस्तच्या निमित्ताने

by Kalakruti Bureau 06/08/2020

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. २०१९मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका. चित्रपटासोबतच मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. फत्तेशिकस्त या लोकप्रिय चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १६ ऑगस्ट रोजी झी टॉकीजवर होणार आहे. चित्रपटगृहात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या घरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत साधलेला हा खास संवाद

१. या ऐतीहासीक चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा तुम्हाला विचारण्यात तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती?

  • इतिहास हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मी नेहमी असं म्हणते माझे आजोबा प्रख्यात कादंबरीकार गो. नी. दांडेकर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भरभरून प्रेम केलं आणि ते लोकांमध्ये वाटलं. त्यांच्याकडून हा वारसा मला मिळालेला आहे असा मला वाटतं. मी पहिल्यांदा जिजाऊ आऊसाहेबांची भूमिका साकारली आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप जास्त आनंद होतो. एक आई म्हणुन, एक माणूस म्हणुन जिजाऊ आईसाहेबांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. ही भूमिका मी आयुष्यभर जरी करत राहिले तरी मला असं वाटेल कि अजून शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे फत्तेशिकस्त मधील हि भूमिका साकारताना मला अत्यानंद झाला. मला दिग्पाल लांजेकरचा अभिमान वाटतो की त्याने महाराजांचं चरित्र अत्यंत योग्यरित्या प्रेक्षकांनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

२. तुमच्या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली?

  • आधी ही भूमीका साकारली असल्यामुळे भरपूर वाचन झालेलं होतं. पण प्रत्येक वेळेला नवीन पैलू दाखवण्याची संधी आपल्याला मिळते याचा जास्त आनंद होतो. जिजाऊ आऊसाहेब फक्त कारभार संभाळत नसत तर त्या प्रसंगी तलवारसुद्धा हातात घेत असत. मावळ्यांना वेळेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या संघटना तयार करत असत. या सगळ्या गोष्टी या सिनेमातून दाखवण्याची संधी मला मिळाली याचा मला जास्त आनंद होतो. त्यामुळे या वेळेला वेगळाच उत्साह होता. जिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातल कौशल्य दाखवण्याची संधी मला फत्तेशिकस्तच्या माध्यमातुन मिळाली.

३. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एखादा अविस्मरणीय किस्सा सांगा

  • किल्ले राजगडवर आम्ही शुटिंग केलं. ती घटना आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय होती. हा माझा सर्वात आवडता किल्ला आहे. मी आजोबांसोबत आणि त्यानंतरसुद्धा अनेकदा या किल्ल्याची सफर केलेली आहे. सुमारे २५ वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. या किल्यावर शूटिंग करण्याची संधी मिळाली हा खरोखर अंगावर काटा आणणारा क्षण होता. तिथे जाऊन तोच काळ जागं करणं हा खरंच खूप सुंदर अनुभव होता. आयुष्यभर सर्वांच्या आठवणीमध्ये हा प्रसंग राहील. महाराजांनी हा किल्ला कसा बांधला असेल? महाराज इथून राज्यकारभार कसा सांभाळत असतील? असे अनेक प्रश्न ज्यांनी हा किल्ला पहिल्यांदा चढला त्यांना पडत होते. सर्व कलाकारांनी आपल्या पाठीवर शूटिंगच सर्व सामान घेऊन किल्ला चढला. महाराजांचा इतिहास समोर येण्यासाठी आपलाही छोटा हातभार आहे हा विचार खूप आनंद देऊन जात होता.

४. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट

  • माझी एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक भयंकर खुश होत होते. एक आईच आपलं मुल अशाप्रकारे घडवू शकते. ज्या मातेने स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे आपलं स्वप्न मुलाच्या मनात सतत घोळवत ठेवलं आणि बिंबवलं आणि त्याच्याकडून ते पूर्ण करुन घेतलं अशा आईच्या एन्ट्रीसाठी मिळणारा प्रतिसाद हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. सिनेमाच्या शेवटी येणारं जिजाऊ आऊसाहेबांचं चित्र हा माझ्यासाठी एक थरारक अनुभव होता. या स्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब आहेत याचं भान मला आलं.

५. या चित्रपटाने बॉक्सऑफिस तर गाजवलंच पण आता पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षक घरबसल्या झी टॉकीजवर पाहू शकतील, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल

  • मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करते की फक्त शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर महाराजांचं चरित्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्यातल्या अनेक गोष्टी आपण अंगी बाळगायला शिकलं पाहिजे. कोरोनाच्या संकटातसुद्धा आपण महाराजांसारखं सकारात्मक राहून या संकटातुन आपली सुटका करून घेतली पाहिजे. ज्या माय लेकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्या साठी दिलं त्यांना कायम आपण त्रिवार वंदन केलं पाहिजे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि यानंतर जंगजौहर या सारख्या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करू. तुमच्या सर्वांची मदत फार मोलाची असणार आहे. तुमच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच आम्ही आपल्या समोर महाराजांचा इतिहास योग्यरित्या मांडू शकतो.
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 16 august fatteshikast Maharashtra marathi Movie raje shivaji zee marathi Zee Talkies Zee Yuva
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.