‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी
बऱ्याचवेळा इंटरनेटवरील कविता दुसऱ्याच नावाने पोस्ट केल्या जातात. अलीकडे अमिताभ बच्चन यांनाही असाच अनुभव आला. अमिताभ यांनी चुकून आपल्या ट्विटमध्ये आपल्या वडिलांची कविता म्हणून प्रसून जोशी यांची कविता शेअर केली होती. मात्र ही चूक लक्षात आल्यावर अमिताभ बच्चन यांनी सर्व चाहत्यांची माफी मागितली.
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोना वायरस सोबतची लढाई जिंकून घरी परतले आहेत. दरम्यान ते सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात होते. घरी परतल्यावर देखील मनोरंजक पोस्ट करत ते आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत. याचदरम्यान त्यांनी एका पोस्टद्वारे आपल्या फॉलोअर्सची माफी मागितली. त्यांच्या आधीच्या पोस्ट मधल्या कविते संदर्भात ही माफी होती. या पोस्ट मध्ये त्यांनी कवीचं नाव चुकीचं लिहिलं होतं, याबाबत माफी मागून त्यांनी स्पष्टीकरण दिले.
सहसा कलाकार आणि मान्यवरांकडून अशा प्रकारे माफी मागितली जात नाही. यामुळे अमिताभ यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवर त्यांनी एक कविता पोस्त केली होती. मात्र ही कविता प्रसून जोशी यांची होती. त्यावर अमिताभ बच्चन यांनी याबद्दल माफी मागितली आहे.
चूक लक्षात आल्यावर अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली, ज्यात लिहिलं होतं – ‘CORRECTION : काल T 3617 वर जी कविता छापली होती, त्याचे लेखक बाबूजी (अमिताभ यांचे वडील) नाहीत. ते चुकीचे होतं, त्या कवितेची रचना कवी प्रसून जोशीने केली आहे. यासाठी मी क्षमाप्रार्थी आहे. त्यांची (वडिलांची) कविता ही आहे. त्यांनी हात जोडणाऱ्या इमोजीचा देखील वापर केला. याचसोबत अमिताभ यांनी त्यांचे पिता हरिवंशराय बच्चन यांची कविता शेयर केली.’
अमिताभ बच्चन सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या कायम संपर्कात असतात. हॉस्पिटलमधून सुद्धा आपल्या तब्येतीबाबत ते फॅन्सना अपडेट देत असत. त्यावेळी ते सोशल मिडियावर एवढे ऍक्टिव्ह असायचे की जी खोटी बातमी पसरत होती त्याबद्दल पण त्यांनी लगेच उत्तर दिलं.