‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
तिसरा पर्याय उर्मिलाचा!
हा काळ होता साधारण 1998 चा. त्यावेळी इंडस्ट्रीत खूप साऱ्या नट्या होत्या. त्यात होती मनीषा कोईराला, महीमा चौधरी अशा बऱ्याच. काजोल, करिश्मा वगैरे तर होत्याच. पण या सगळ्यात एक मराठी अभिनेत्री नावारुपाला आली होती… तिचं नाव उर्मिला मातोंडकर. उर्मिलांच्या रंगीलानं भल्याभल्यांना वेडं केलं. अनेकांची स्वप्न रंगबिरंगी केली. याच रंगीलाने चर्चा सुरू झाली ती राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाच्या असोसिएशनची. रामूच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला असायची. उर्मिला फक्त रामगोपाल वर्माचेच सिनेमे करते, असंही लोक बोलू लागले होते. पण खरा प्रकार तसा नव्हता.
रंगीला रिलीज होऊन आता २५ वर्षं झाली. त्यानंतर पुढच्याच चार वर्षात रामूनं खूप सिनेमे केले. त्यातला एक सत्या होता. सत्यामध्ये दिसली उर्मिला हे खरंय. पण या सिनेमात सत्याची मैत्रीण असलेल्या विद्यासाठी रामूच्या मनात वेगळाच चेहरा होता. त्या चेहऱ्याचं नाव होतं मनिषा कोईराला. सत्यामध्ये आधी मनिषा कोईराला असणार होती. बोलणं झालं. मनिषाला स्क्रीप्ट आपडली. आता रामूचं नावही होतं इंडस्ट्रीत. त्याने रंगीला सारखा बेस्ट सनेमा दिला होता. त्यामुळे मनीषाने स्क्रीप्ट ऐकल्यावर होकार दिला खरा. पण पुढे चित्रिकरणाच्या तारखा ठरल्यावर मात्र लफडा झाला. कारण मनिषा त्यावेळी इतर चित्रिकरणात व्यग्र होती. रामूचा झाला भ्रमनिरास. पण मग रामूने पकडलं महीमा चौधरीला. परदेस फेम महीमा. पण त्यावेळी महीमाचं मार्केट जोरात होतं. पण तिनेही सिनेमाला तारखांमुळे नकार दिला. आता रामूची पंचाईत झाली. सिनेमाचं शूट आता अवघ्या आठवड्यावर आलं होतं. पण सत्याची नायिका काही मिळत नव्हती.
मग रामूने उर्मिलाला विचारलं. कारण रामूकडे डुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी उर्मिलाही फुल फॉर्मात होती. कारण बॅक टू बॅक वेगळे सिनेमे तिने दिले होते. यात रंगीला, दौड, पिंजर अशा सिनेमांचा उल्लेख करता येईल. आणि मग नशिबाने उर्मिलाच्या त्याच तारखा मोकळ्या होत्या. झालं. रामूला विद्या मिळाली. उर्मिला रामूला माहीत असल्यामुळे तिच्यासोबत काम करणं सोपं गेलं आणि सत्या आकाराला आला.
तात्पर्य असं की या सत्यामध्ये उर्मिला तिसरा पर्याय ठरली. त्याआधी दोघींच्या गळाला हा सिनेमा लागू शकला नाही. शेवटी तो उर्मिलाच्या नशिबात होता. दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम.. असं म्हणतात ते उगाच नाही.
- धनंजय माने