मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
सलमाननं या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं…
बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) मार्च महिन्यापासून टायगर ३ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरवात करणार आहे.
सलमाननं या नव्या टायगरपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है… या टायगर चित्रपटांच्या मालिकेत हा आणखी एक टायगरपट सलमान करत आहे. अर्थात या चित्रपटातही त्याची अभिनेत्री कटरीना कैफ आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले नुकताच झाला. त्यामुळे सलमाननं आपलं सर्व लक्ष टायगर ३ वर दिलं आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक बिग बजेट चित्रपट म्हणून टायगर ३ चा आधिच बोलबाला झाला आहे. यशराज फिल्मच्या या चित्रपटात स्टंटसीन अधिक प्रभावी दाखवण्यासाठी परदेशातून एक स्पेशल टीम बोलवण्यात आली आहे. ही टीम आता सलमानला त्याच्या फार्म हाऊसवर ट्रेनिंग देत आहे.
यशराज फिल्मला (Yash Raj Films) पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा मोठा समारंभ होणार होता, आणि यात टायगर ३ ची घोषणा होणार होती. मात्र कोरोनामुळे हा सोहळा आवरता घेतला असला तरी यशराजतर्फे आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून टायगर ३ या चित्रपटाची तयारी सुरु आहे. चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण दुबई आणि परदेशातील अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे. गुप्तहेराच्या भुमिकेत असलेल्या सलमानला आता नवीन ॲक्शन सीन शिकवण्यासाठी परदेशी एक्सपर्टची टीमच तैनात करण्यात आली आहे. तसंच सलमानसाठी काटेकोर डायट शेड्यूलही आखून देण्यात आलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष शर्मा (Maneesh Sharma) आणि निर्माता आदित्य चोपडा (Aditya Chopra) यासर्वांवर वैयक्तीक लक्ष ठेऊन आहेत. स्वतः आदित्य चोपडा या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर गेली दोन वर्ष काम करत आहेत.
सलमानही टायगर ३ चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. शहारुख खानच्या पठानमध्ये सलामान आहे. पठाणचे शूट पूर्ण करुन आता सलमान पूर्ण वेळ टायगर ३ साठी देत आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये चित्रपटाचे काही चित्रिकरण होणार असून नंतर मात्र टायगरची सर्व टीम दुबई आणि इंस्तांबूलला रवाना होणार आहे.
हे देखील वाचा: इंडस्ट्रीतला दबंग सलमान
टायगर ३ चित्रपट यशराजचाही सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट ठरणार आहे. २०० करोड रुपयांचे बजेट चित्रपटाचे असले तरी कोरोनामुळे बहुतांशी चित्रिकरण परदेशात होणार आहे. त्यामुळे हे बजेट वाढण्याची शक्यता आहे. अर्थात या बजेटमधील अर्ध बजेट सलमानच्या मानधनात जाणार आहे. याशिवाय सलमान टायगर ३ ला जो फायदा होणार आहे त्यातही भागीदार असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये टायगर जिंदा है या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली होती. ४०० करोडच्या आसपास ही कमाई होती. त्यामुळेच हा नवा टायगरपट पुन्हा सलमान खानच्या यशात आणि कमाईत भर टाकणार हे नक्की…