Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे

Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा,

…जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी

Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं

‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील अभिनेत्रीला करायचंय लग्न; मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल

कोणत्या गाण्यासाठी Anil Kapoor ने निर्मात्यांशी भांडून किशोर कुमारचा प्ले

Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सोहराई पोटरुचा ऑस्करमध्ये दबदबा…

 सोहराई पोटरुचा ऑस्करमध्ये दबदबा…
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

सोहराई पोटरुचा ऑस्करमध्ये दबदबा…

by सई बने 04/03/2021

एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारीत असलेला तामिळ चित्रपट सोहराई पोटरु हा ऑस्कर पुरस्काराच्या यादीत सर्वाधिक चर्चेचा चित्रपट ठरला आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित या चित्रपटात तामिळ सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका आहे. ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागात सोहराई पोटरु चित्रपटाचा समावेश झाला आहे. 

येत्या 15 मार्च रोजी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होणार आहे. सूर्याचे चाहतेही यामुळे उत्साहीत झाले आहेत. कोरोनामुळे सोहराई पोटरु हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. उत्तम कथा, सूर्याचा अभिनय, सुधा कोंगारा यांचं दिग्दर्शन आणि सोबत सुमधूर गाणी यामुळे ॲमेझॉनवरही हा चित्रपट सर्वाधिक बघितला गेला. त्यातच ऑस्करच्या स्पर्धेत चित्रपट आल्यानं सोहराई पोटरु चित्रपटाला सर्वाधिक पाहण्यात आल्याची  नोंद गुगलनं केली आहे. 

Suriya's Tamil film 'Soorarai Pottru' enters Oscar race - The Week
Soorarai Pottru

93व्या ऑस्कर (The Oscars 2021) पुरस्कारांच्या यादीत भारतीय भाषांच्या श्रेणीत सोहराई पोटरु (Soorarai Pottru) चित्रपटानं आपलं स्थान मिळवलं आहे. यासाठी तब्बल 366 चित्रपट होते. त्यात सोहराई पोटरु सरस ठरला. तामिळमध्ये ॲक्शनकिंग म्हणून सूर्या या अभिनेत्याची ओळख आहे. गजनी, सिंघम सारख्या सूपरहिट चित्रपटातून त्याच्या ॲक्शनसीनची मोठी चर्चा झाली होती.  मात्र सोहराई पोटरुमध्ये एक विमान कंपनी चालू करण्यासाठी धडपडणा-या सामान्य पायलटची भूमिका त्यानं साकारली आहे. मध्यमवर्गीय माणसानं घेतलेली मोठी झेप. त्यासाठी केलेले प्रयत्न, प्रतिस्पर्ध्यावर केलेली मात अशा अनेक अंगामधून सूर्याची भूमिका चोख ठरली आहे.

एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या जीवनावरील कथा असलेला हा चित्रपट कोरोनामुळे चांगलाच रखडला. सूर्या आणि त्याच्या सहकलाकारांचा ओटीटी माध्यमवर चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध होता. मात्र कोरोनाचा जोर वाढल्यानं अखेर चित्रपट ॲमेझॉन पाइमवर प्रदर्शित करण्यात आला. 

चित्रपटात सूर्या सोबत परेश रावल, अपर्णा बालमुराली, उर्वशी,  मोहन बाबू,  करुणास यांच्याही भूमिका आहेत. मदुराई, चेन्नई आणि चंदिगढ मध्ये चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सोहराई पोटरुला संगीत दिले असून त्यातील गाणी सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये समाविष्ट आहेत.  गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्येही सोहराई पोटरु चित्रपटाचा बोलबाला झाला. सर्वोकृष्ट अभिनयासह अनेक पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. भारतामधील अ‍ॅमेझॉन प्राइमच्या इतिहासात सोहराई पोटरु हा सर्वाधिक पाहिलेला प्रादेशिक भाषेचा चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच या चित्रपटाला आता ऑस्कर पुरस्कार मिळेल असा दावा सूर्याचे चाहते करत आहेत. अर्थात त्यासाठी 15 मार्चपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.